वैशिष्ट्यपूर्ण वाणांसह तंत्रज्ञान देणारे परभणीचे सोयाबीन संशोधन केंद्र

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने सोयाबीनचे ११ वाण प्रसारित केले आहेत. बदलत्या हवामान स्थितीत तग धरणारे, अधिक उत्पादनक्षम व अन्य वैशिष्ट्यांनी परिपूर्ण हे वाणमहाराष्ट्रासह विविध राज्यांतील शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरले आहेत. बीजोत्पादन, व्यवस्थापन, यांत्रिकीकरण यातील तंत्रज्ञान उपलब्ध केल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत मिळत आहे.
प्रक्षेत्रावर सोयाबीन लागवड तंत्रज्ञानाची प्रात्यक्षिके.
प्रक्षेत्रावर सोयाबीन लागवड तंत्रज्ञानाची प्रात्यक्षिके.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने सोयाबीनचे ११ वाण प्रसारित केले आहेत. बदलत्या हवामान स्थितीत तग धरणारे, अधिक उत्पादनक्षम व अन्य वैशिष्ट्यांनी परिपूर्ण हे वाण महाराष्ट्रासह विविध राज्यांतील शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरले आहेत. बीजोत्पादन, व्यवस्थापन, यांत्रिकीकरण यातील तंत्रज्ञान उपलब्ध केल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत मिळत आहे. मराठवाड्यातील कोरडवाहू क्षेत्रातील शेतकऱ्यांत सामाजिक व आर्थिक सुधारणा व्हाव्यात यासाठी तत्कालीन मराठवाडा कृषी विद्यापीठात १९७५ मध्ये भारतीय कृषी संशोधन परिषदेतर्फे (आयसीएआर) अखिल भारतीय समन्वित सोयाबीन संशोधन प्रकल्प सुरू झाला. राज्यातील हा सर्वांत पहिला संशोधन प्रकल्प आहे. हे केंद्रही भारतातील सोयाबीनच्या प्रमुख संशोधन केंद्रांपैकी आहे. उल्लेखनीय कामगिरी सन १९८४-८५ मध्ये राज्यात सोयाबीनचे क्षेत्र ३५ हजार हेक्टर व उत्पादकता प्रति हेक्टर ३ क्विंटल ४३ किलो होती. सन २०१९-२० मध्ये क्षेत्र ३७ लाख ३० हजार हेक्टर तर हेक्टरी सरासरी उत्पादकता १० क्विंटल ५५ किलोपर्यंत वाढली. कृषी विद्यापीठांकडील नवनिर्मित वाण, तंत्रज्ञान व शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे प्रसार ही त्यामागील कारणे आहेत. देशातील विविध संशोधन संस्थांमार्फत सोयाबीनचे ११० वाण प्रसारित झाले. पैकी अखिल भारतीय समन्वित सोयाबीन संशोधन प्रकल्पांतर्गत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील केंद्राच्या ११ वाणांचा समावेश आहे. तत्कालीन प्रभारी अधिकारी व पैदासकार डॉ. ए. आर. सिंग, एस. एम. सुदेवाड, डॉ. पी.आर. खापरे, डॉ. आय. एस. माद्रप, डॉ. के. एस. बेग यांचे महत्त्वपूर्ण योगदान त्यामागे आहे. केंद्राचे प्रभारी अधिकारी तथा पैदासकार डॉ. एस. पी. म्हेत्रे, कीटकशास्त्रज्ञ डॉ. आर. एस. जाधव, सहायक पैदासकार आर. एस. घुगे, वरिष्ठ संशोधक दत्तात्रय सुरनर, भाऊसाहेब रंधवे येथे कार्यरत आहेत. परभणी संशोधन केंद्रातील प्रमुख विकसित वाण

 • एमएयूएस ७१ (समृद्धी)
 • पीक कालावधी- ९३ ते १०० दिवस
 • सरासरी उत्पादन तिहेक्टरी १८ ते ३० क्विंटल
 • पक्वतेनंतर १२ ते १५ दिवस शेंगा तडकण्यास सहनशील
 •  रोग व किडींना प्रतिकारक
 • जेएस ३३५ पेक्षा १५ टक्के अधिक उत्पादन
 •  कमी ओलाव्यास प्रतिकारक
 •  बदलत्या हवामानामध्ये तग धरणारा  
 • एमएयूएस ८१ (शक्ती)
 • पीक कालावधी- ९३ ते ९७ दिवस
 • सरासरी हेक्टरी उत्पादन २५ ते ३० क्विंटल
 • शेंगा तडकण्यास सहनशील, कीड- रोगास प्रतिकारक
 • एमएयूएस १५८

 • पीक कालावधी ९३ ते ९८ दिवस
 • सरासरी उत्पादन हेक्टरी २६ ते ३१ क्विं.
 • शेंगा तडकण्यास व खोडमाशीस प्रतिकारक
 • एमएयूएस १६२

 • पीक कालावधी १०२ ते १०३ दिवस
 • सरासरी हेक्टरी उत्पादन २५ ते ३० क्विंटल
 • हार्वेस्टरद्वारे काढणीस उपयुक्त
 • शेंगा तडकण्यास १२ ते १५ दिवस सहनशील
 • एमएयूएस ६१२

 • पीक कालावधी ९३ ते ९८ दिवस
 • सरासरी उत्पादन हेक्टरी ३२ ते ३५ क्विंटल
 • परिपक्वतेनंतर १२ ते १५ दिवस शेंगा तडकण्यास सहनशील
 • तीन दाण्यांच्या शेंगाचे प्रमाण अधिक
 • कमी ओलाव्यास प्रतिकारक
 • बदलत्या हवामानात तग धरणारा, किडी- रोगांना प्रतिकारक
 • देशभर प्रसार केंद्राच्या प्रमुख वाणांचा राज्यातील विविध भाग, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, गुजरात, छत्तीसगड, राजस्थान, उत्तर प्रदेश,झारखंड, पश्‍चिम बंगाल, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, नागालॅंड, मणिपूर, मेघालय आदींपर्यंत प्रसार झाला आहे. केंद्रातील महत्त्वाच्या तंत्रज्ञान शिफारशी ७५ ते १०० मिमी. पाऊस झाल्यानंतर १५ जून ते १५ जुलै या कालावधीत पेरणी. दोन ओळींतील ४५ सेंमी, तर दोन रोपांतील अंतर ५ सेंमी. पेरणीची खोली ३ ते ४ सेंमी. एकरी बियाणे प्रमाण २६ किलो. रुंद वरंबा सरी (बीबीएफ) पद्धतीमुळे मूलस्थानी जलसंधारण होते. अवर्षणाच्या स्थितीत पीक तग धरून राहते. अतिवृष्टीमध्ये सऱ्यांमधून पाणी वाहून जाते. एकरी २२ किलो बियाणे लागते. पेरणीसोबत एकरी १२ किलो नत्र, २४ किलो स्फुरद, १२ किलो पोटॅश, ८ किलो गंधक, १० किलो झिंक सल्फेट, ४ किलो बोरॉन देण्याची शिफारस. पावसाचा दीर्घ खंड पडल्यास पोटॅशिअम नायट्रेट १ आणि २ टक्के द्रावणाची फवारणी ३५ व्या आणि ५५ व्या दिवशी. आंतरपीक शिफारशी- सोयाबीन अधिक तूर (४- १), ओलिताखाली सोयाबीन अधिक कापूस (१- १ ओळ) बीजोत्पादन

 • दरवर्षी विद्यापीठ प्रक्षेत्रावर सुमारे ७०० हेक्टरवर विविध वाणांच्या पैदासकार, पायाभूत, प्रमाणित वाणांचा बीजोत्पादन कार्यक्रम.
 • सुमारे २ हजार क्विंटल पैदासकार बियाण्याचा शासकीय कंपनी, राष्ट्रीय तसेच अन्य राज्यांतील बियाणे महामंडळांना पुरवठा केला जातो.
 • शेतकरी व शेतकरी उत्पादक कंपन्यांना एक ते दीड हजार क्विटंल बियाणे पुरवठा लक्ष्यांक.
 • तीन वर्षांपासून बीजोत्पादनाचे बहुतांश क्षेत्र ‘बीबीएफ’ खाली.
 • सीड हब

 • ‘आयसीएआर’ ने परभणी येथे सोयाबीन सीड हब मंजूर केले आहे. त्या अंतर्गत
 • न्यूक्लियस, पैदासकार (ब्रीडर सीड) व प्रमाणित बियाणेनिर्मितीवर भर.
 • यंदा न्यूक्लियस बियाणे उत्पादनासाठी २० हेक्टरवर नवे प्रक्षेत्र विकसित करण्यात आले.
 • त्या ठिकाणी यंदा सुधारित बीबीएफ यंत्राव्दारे दोन सरींमध्ये वरंब्यावर ५ ओळी पेरणी करण्यात आली.
 • नवे वाण अधिक उत्पादनासोबत पावसाचे उशिरा आगमन, दीर्घ खंड, अतिपाऊस, वाढते तापमान यामध्ये तग धरणाऱ्या, किडी- रोगांस प्रतिकारक्षम वाणांची निर्मिती केली जात आहे. एमएयूएस ७२५, एमएयूएस ७३१, एमएयूएस ७३२ या वाणांच्या चाचण्या २०१६-१७ पासून सुरू आहेत. हे वाण कोरडवाहूसाठी जास्त उत्पादनक्षम आहेत (प्रतिहेक्टरी २७ ते ३२ क्विंटल). त्यांचा कालावधी ९५ ते १०० दिवसांचा आहे. ३ ते ४ दाणे असलेल्या शेंगांचे प्रमाण चांगले आहे. विविध किडी- रोगास मध्यम प्रतिकारक व बदलत्या हवामानात तग धरणारे आहेत. विस्तार कार्य

 • मराठवाड्याच्या विविध भागांत दरवर्षी ५० आद्यरेषीय प्रात्यक्षिके. त्याद्वारे शेतकऱ्यांपर्यंत नव्या तंत्रज्ञान शिफारशींचा प्रसार.
 • कोरोना संकटामुळे सध्या ऑनलाइन चर्चासत्रांवर भर.
 • डॉ. एस. पी. म्हेत्रे- ७५८८१५६२१०, ९४२१४६२२८२ डॉ. आर. एस. जाधव- ७५८८०५३९३९

  Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

  ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

  Related Stories

  No stories found.
  Agrowon
  www.agrowon.com