Artificial Intelligence  : एआय, रोबोटिक शेतीमुळे मजूर बेरोजगार होतील का?

सध्या देखील शेतकरी अॅन्ड्रॉईडच्या स्मार्टफोनवर गुगल असिस्टंटची मदत घेऊन कोणतीही माहिती मागवू शकतात. तेथे आर्टिफिशियल इन्टेलिजन्सचा वापर करण्यात आलेला आहे.
Artificial Intelligence
Artificial IntelligenceAgrowon

नानासाहेब पाटील

आर्टिफिशियल इंटिलिजन्टस (Artificial Intelligence) किंवा रोबोटिक शेतीमुळे (Robot In Agriculture) मजुरांचे प्रश्न अजून बिकट होतील का, अशी शंका अनेक जणांना वाटते. परंतु मला तसे अजिबात वाटत नाही. कारण, देशात सध्या असे रोबोट (Robot) तयार होत नसून आयात देखील होत नाहीत. 

आर्टिफिशियल इन्टेलिजन्सचा वापर शेतकऱ्यांसाठी तणनियंत्रण, फवारणी, मृदा तपासणी, कीड-रोग,अन्नद्रव्य व्यवस्थापनाची कामे तसेच काढणी (पिकर्स) यंत्रे यात होण्याची गरज आहे.

त्यासाठी भारतात वाव देखील आहे. आंबा (Mango), डाळिंब (Pomegranate), कपाशीसाठी (Cotton) काढणी यंत्रे देशात आलीच पाहिजेत. त्याविषयी कोईम्बतूर येथे एक स्टार्टअप कंपनी सुरू झाली असून या समस्येवर ती काम करते आहे.

देशातील पिकांची नेमकी स्थिती, उत्पादन, उत्पादकतेचे अंदाज याविषयी अचूक भाष्य करण्यासाठी आर्टिफिशियल इन्टेलिजन्सचा वापर होत राहील.

ड्रोन्सचा (Drone) वापर वाढत राहील. शेती क्षेत्रामधील मार्केटिंग (Farming Marketing), सर्विस कंपन्यांमध्ये तसेच पुरवठा साखळीमध्ये आर्टिफिशियल इन्टेलिजन्स मोठ्या प्रमाणात वापरले जाईल, हे नक्की. त्यातून बेरोजगारीचे कोणतेही प्रश्न निर्माण होतील असे मला वाटत नाही.

आर्टिफिशियल  इन्टेलिजन्स  किंवा रोबोटसमुळे कामधंदे जातील असे वाटत नाही. मात्र, माणसांचे सध्याचे कामाचे स्वरूप बदलेल.

उदाहरणार्थ एखाद्या पॅक हाऊसमध्ये लोडिंग-अनलोडिंगचे काम माणूस करीत असल्यास भविष्यात तेथे रोबोट असेल पण माणूस देखील राहील.

तो इतर वेगळ्या कामात गुंतलेला असेल. शेती क्षेत्रातील बॅंका, विमा, कृषी सल्ला, विद्यापीठे व कृषी खाते यामध्ये अनेक टप्प्यांवर आर्टिफिशियल  इन्टेलिजन्सचा  वापर वाढलेला असेल. 

Artificial Intelligence
Agriculture Drone: मारुत ड्रोनला कृषी ड्रोन म्हणून DGCA ची मंजुरी

सध्या देखील शेतकरी अॅन्ड्रॉईडच्या स्मार्टफोनवर गुगल असिस्टंटची मदत घेऊन कोणतीही माहिती मागवू शकतात. तेथे आर्टिफिशियल  इन्टेलिजन्सचा वापर करण्यात आलेला आहे.

भविष्यात शेतकऱ्यांना कोणतीही माहिती मिळवण्यासाठी प्रत्यक्षात माणसाशी बोलण्याची गरजच भासणार नाही.

आर्टिफिशियल  इन्टेलिजन्स  किंवा रोबोटचा शिरकाव जगभर विविध सेवांमध्ये होताना काही प्रमाणात रोजगार जातील मात्र, नवे रोजगार देखील तयार होतील.

तंत्रज्ञानाचा इतिहास पाहिला तर अमेरिकेत देखील इंटरनेट आल्यावर अनेकांचे रोजगार गेले. टायपिस्ट, स्टेनो, पर्सनल असिस्टंट यांचे रोजगार गेले पण दुसऱ्या बाजुला कॉम्युटर्स-हार्डवेअर उत्पादन क्षेत्रात मोठया प्रमाणात रोजगार तयार झालेच ना?

इंटरनेट व वैयक्तिक संगणकामुळे 19 दशलक्ष लोकांना रोजगार मिळाला. जगात जो काही अभ्यास झालेला आहे त्यानुसार 2016 ते 2030 या कालावधीत फ्रान्स, जपान, अमेरिकेत 30 टक्के लोकांचे रोजगार केवळ ऑटोमेशनमुळे जातील.

मात्र, भारतात त्याचा काहीही परिणाम होणार नाही. भारतात रोजगाराभिमुख वयोगट (वर्किंग एज पॉप्युलेशन) जगात सर्वात जास्त असेल तसेच नवे रोजगार देखील तयार झालेले असतील.

अर्थात, भविष्यातील बदलते रोजगार पाहून आपल्या शिक्षण पध्दतीत मोठे बदल करावे लागतील.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com