ऊस वाहतुकीच्या ट्रॅक्टर्ससाठी सीएनजी कीटचे वाटप

येत्या गळीत हंगामात अधिकाधिक ऊस वाहतूक ही जैव इंधनावर करून प्रदूषण कमी करण्यासाठी नॅचरल शुगरच्या सीएनजी प्रकल्पातून उत्पादित होणाऱ्या सीएनजी गॅसवर ऊस वाहतुकीची वाहने चालवायची आहेत.
Sugarcane
SugarcaneAgrowon

शिराढोण ः ‘‘सभासद शेतकऱ्यांना ऊस वाहतुकीच्या (Sugarcane Transport) ट्रॅक्टरसाठी नॅचरल उद्योग समूहातर्फे (Natural Industry) उत्पादित सीएनजी किटचे (CNG Kit For Tractor) वाटप सोमवारी (ता.१५) करण्यात आले. ऊस वाहतुकीसाठी रीतसर करार केलेल्या सभासदांना हे कीट देण्यात झाले.

Sugarcane
Sugarcane : सांगलीत आडसाली ऊस लागवड संथ गतीने

देशाच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनी नॅचरल शुगरचे संस्थापक अध्यक्ष कृषिरत्न बी. बी. ठोंबरे यांच्या हस्ते नॅचरल शुगर येथे ध्वजवंदन करण्यात आले. या वेळी ज्येष्ठ संचालक ज्ञानेश्‍वरराव काळदाते, महाव्यवस्थापक यू. डी. दिवेकर, एन. साई मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष संभाजीराव रेड्डी उपस्थित होते.

‘‘येत्या गळीत हंगामात अधिकाधिक ऊस वाहतूक ही जैव इंधनावर करून प्रदूषण कमी करण्यासाठी नॅचरल शुगरच्या सीएनजी प्रकल्पातून उत्पादित होणाऱ्या सीएनजी गॅसवर ऊस वाहतुकीची वाहने चालवायची आहेत. त्यासाठी येत्या हंगामामध्ये एकूण ५०० ट्रॅक्टर्सना सीएनजी किटचे वाटप करण्यात येईल,’’ अशी माहिती ठोंबरे यांनी दिली.

ठोंबरे म्हणाले, ‘‘भविष्यात जास्तीत जास्त वाहने ही सीएनजीवर चालविल्याने आपला भाग शून्य प्रदूषित होण्यात नॅचरल शुगरचा महत्त्वाचा सहभाग राहील. या प्रयत्नास ट्रॅक्टर मालकांनी सीएनजी कीट बसवण्यास प्रतिसाद द्यावा. जैव इंधनाच्या वापरातून शून्य प्रदूषण व इंधनात आत्मनिर्भर होण्याची गरज आहे. म्हणजेच खऱ्या अर्थाने आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करणे होईल. भविष्यात साखर कारखान्यातील उत्पादित टाकाऊ पदार्थांपासून इंधननिर्मिती करण्याचा संकल्प पूर्ण होईल. नॅचरल सीएनजी वापरामुळे देशाचे परकीय चलनही काही प्रमाणात वाचेल. प्रदूषणासही आळा बसण्यास मदत होईल.’’

कारखान्याचे संचालक पांडुरंग आवाड यांनी सूत्रसंचालन केले. प्रवर्तक दिलीपराव भिसे यांनी आभार मानले.

‘येणारा गळीत हंगाम नॅचरल शुगरसाठी आव्हानात्मक आहे. गाळप हंगाम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी ऊस उत्पादक सभासद आणि कर्मचाऱ्यांनी सहकार्य करावे.

- ठोंबरे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com