Flower Production Technology : फूल संशोधनाचा स्वयंचलित इंडो डच प्रकल्प कार्यान्वित

अत्याधुनिक पद्धतीने निर्यातक्षम फुलशेतीत येणाऱ्या तरुण शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञान मिळावे, यासाठी इंडो डच सहकार्य प्रकल्पाच्या राष्ट्रीय कृषी विकास अभियाना अंतर्गत हा प्रकल्प तळेगाव दाभाडे येथील पणन मंडळाच्या राष्ट्रीय सुगीपश्‍चात तंत्रज्ञान संस्थेमध्ये साकारला आहे.
Flower Farming
Flower Farming Agrowon

Flower Production Technology पुणे ः निर्यातक्षम फूल उत्पादनाचे (Exportable Flower Production) क्लस्टर होत असलेल्या मावळ तालुक्यात पुष्पोत्पादनाच्या (Floriculture) एकात्मिक विकास अभियानांतर्गत फूल संशोधनाचा (Flower Research) आणखी अद्वितीय (सेंटर फॉर एक्सलन्स) प्रकल्प कार्यान्वित झाला आहे.

संपूर्णतः संगणकीकृत आणि स्वयंचलित असलेल्या प्रकल्पाचा फूल उत्पादकांना फायदा होत आहे. प्रकल्प कार्यान्वित झाल्यापासून २५८ शेतकऱ्यांनी प्रशिक्षण घेतले आहे.

भविष्यातील निर्यातदार फूल उत्पादक या प्रशिक्षणातून घडत आहेत. या प्रकल्पासाठी इंडो डच प्रकल्पांतर्गत केंद्र सरकारकडून १२ कोटी, तर पणन मंडळाने तीन कोटींचा निधी दिला आहे.

अत्याधुनिक पद्धतीने निर्यातक्षम फुलशेतीत येणाऱ्या तरुण शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञान मिळावे, यासाठी इंडो डच सहकार्य प्रकल्पाच्या राष्ट्रीय कृषी विकास अभियाना अंतर्गत हा प्रकल्प तळेगाव दाभाडे येथील पणन मंडळाच्या राष्ट्रीय सुगीपश्‍चात तंत्रज्ञान संस्थेमध्ये साकारला आहे.

Flower Farming
Floriculture : ‘एलईडी’ च्या झोतात उजळली ‘शेवंती’ ची शेती

राष्ट्रीय सुगीपश्‍चात तंत्रज्ञान संस्थेचे संचालक डॉ. भास्कर पाटील म्हणाले, ‘‘डच तंत्रज्ञानाने आणि भारतीय तंत्रज्ञानाने फुलांची पॉलिहाउसमधील आणि प्रक्षेत्रावर केलेल्या लागवडीचा तुलनात्मक अभ्यास आणि संशोधन या प्रकल्पाद्वारे होत आहे.

या संशोधनामध्ये शेतकऱ्यांचा देखील सहभाग घेतला जात आहे. त्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. प्रशिक्षणामध्ये डच तंत्रज्ञानानुसार कमीत कमी पाणी आणि निविष्ठांचा वापर करून फुलांचे उत्पादन घेतले जाईल.

Flower Farming
Plastic Flower : एकवेळ वापर उत्पादनात प्लॅस्टिक फुले समाविष्ट करा

यासाठी एक एकरावर डच तंत्रज्ञानाने संपूर्णतः संगणकीकृत स्वयंचलित पॉलिहाउस उभारण्यात आले आहे. शेजारी भारतीय तंत्रज्ञानाचा वापर करून पॉलिहाउस उभारण्यात येत आहे.

तर तेवढ्याच क्षेत्रावर उघड्या जागेवर गुलाब, जरबेरा आणि कार्नेशन, निशिगंधाची लागवड केली आहे. या तीनही वाणांवर विविध वातावरणात आणि तंत्रज्ञानाचा कोणता परिणाम होतो आणि कोणते उत्पादन दर्जेदार होते. याचा अभ्यास केला जात आहे.’’

Flower Farming
Flower Farming : मुदखेडला फूल उत्पादक शेतकऱ्‍यांचे आंदोलन

प्रकल्पाची वैशिष्ट्ये ः

- फुलांच्या अर्थकारणानुसार उत्पादकता वाढविणे

- फुलांच्या विविध वाणांची लागवड आणि संशोधन

- स्वयंचलित तंत्रज्ञानाच्या वापरातून कमीत कमी पाणी आणि निविष्ठांचा वापर

- शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण

- फुलांचे काढणी पश्‍चात नुकसान टाळणे

- कीड, रोगांच्या व्यवस्थापनासाठी तंत्रज्ञानाचा वापर

- आंतरराष्ट्रीय बाजारपेठेशी संलग्न उत्पादन

आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय फुलांचा दबदबा निर्माण व्हावा. त्या दृष्टीने मागणीनुसार निर्यातक्षम फुले उत्पादन संशोधन आणि प्रशिक्षणासाठी हे केंद्र राज्यातील शेतकऱ्यांना वरदान ठरेल. कृषी विभागासोबत समन्वय साधत या ठिकाणी तीन दिवसांचा निवासी प्रशिक्षण कार्यक्रम राबवीत आहोत. त्यासाठी अत्याधुनिक शेतीमध्ये रस असणारे तरुण शेतकरी, उद्योजक आणि उच्चशिक्षित तरुण आकर्षित होत आहेत.

- डॉ. भास्कर पाटील, संचालक, राष्ट्रीय सुगीपश्‍चात तंत्रज्ञान संस्था, तळेगाव दाभाडे, जि. पुणे

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com