पिकांवर फवारणीसाठी स्वयंचलित डिजिटल यंत्र

स्वयंचलित डिजिटल यंत्र मोबाईल फोनद्वारे नियंत्रित करता येते.
Digital Automatic Spray Machine
Digital Automatic Spray MachineAgrowon

परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने सौरऊर्जेवर (Solar Energy) आधारित स्वयंचलित फवारणी यंत्र (Digital Automatic Spray Machine) विकसित केले आहे. हे यंत्र मोबाईल फोनद्वारे (Mobile Phone) नियंत्रित करता येते. या यंत्राचा वापर मूग, उडीद, सोयाबीन, तूर, हरभरा, ज्वारी, करडई, भुईमूग, गहू, मका, बाजरी इ. पिकामध्ये सुलभपणे करता येतो.

शेतीतल्या वाढत्या उत्पादनखर्चामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. मजुरांचा तुटवडा, कीड-रोगांचा वाढता प्रादुर्भाव या कारणांमुळे उत्पादन खर्चात वाढ होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडून जाते. विशेषतः लहान शेतकऱ्यांना त्याचा मोठा फटका बसतो. यावर उपाय म्हणून आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित यंत्रांचा वापर करण्याचा सल्ला शास्त्रज्ञांकडून दिला जातो. त्या अनुषंगाने हे स्वयंचलित फवारणी यंत्र महत्त्वाचे ठरणा आहे.

Digital Automatic Spray Machine
फवारणी, धुरळणी अवजारांची हाताळणी, देखभाल

स्वयंचलित फवारणी यंत्राची वैशिष्ट्येः

- हे यंत्र पूर्णपणे स्वयंचलित असून सौरऊर्जेवर चालते.

- हे यंत्र १२ व्होल्ट क्षमतेच्या बॅटरीवर चालते. बॅटरी चार्ज होण्यासाठी साधारण तीन तास लागतात.

- एकदा पूर्ण चार्ज झाल्यानंतर हे यंत्र ६ तासांपर्यंत काम करू शकते.

- या यंत्राद्वारे एका तासामध्ये साधारण २० ते २२ गुंठे क्षेत्रावर फवारणी करता येते.

- यंत्राचे वजन साधारण ११० किलो असून यंत्रावर ४० लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बसवण्यात आली आहे.

- फवारणीसाठी यंत्रामध्ये ६ बूम नोझल बसविण्यात आले आहेत. हे यंत्र एकावेळी ७५ ते ८० किलो इतके वजन उचलू शकते.

- यंत्रामध्ये ३६० अंशांमध्ये गोल फिरणारे कॅमेरे बसविले आहेत. त्यामुळे फवारणीसोबतच पिकाचे निरीक्षण करणे शक्य होते.

- यंत्रावर विविध प्रकारचे आवाज येणारे स्पीकर बसवले आहेत. त्यामुळे वन्य प्राणी आणि पक्ष्यांपासून होणारे पिकाचे नुकसान टाळता येते.

- या यंत्राने दीड किमी प्रति तास या वेगाने फवारणी होते. मोबाईल फोनद्वारे यंत्र नियंत्रित करता येते.

- यंत्राची रुंदी १.७ मीटर असून एकावेळेस त्याच्या आकाराएवढ्या क्षेत्रावर फवारणी करणे शक्य होते.

- मूग, उडीद, सोयाबीन, तूर, हरभरा, ज्वारी, करडई, भुईमूग, गहू, मका, बाजरी इत्यादी पिकांमध्ये फवारणी करण्यासाठी या यंत्राचा उपयोग होतो.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com