Agriculture Machinery Care: कृषी अवजारांची निगा अन् देखभाल कशी राखाल

कोणतेही यंत्र किंवा अवजार विकत घेतल्यानंतर अधिक काळ चालण्यासाठी त्याची देखभाल आवश्यक असते. देखभालीविना अवजारांची उपयुक्तता, कार्यक्षमता कमी होत जाते.
Agriculture Mechanixation
Agriculture MechanixationAgrowon

कोणतेही यंत्र (Agriculture Machine) किंवा अवजार (Agriculture Implements) विकत घेतल्यानंतर अधिक काळ चालण्यासाठी त्याची काळजी (Machinery Maintenance) आवश्यक असते. देखभालीविना अवजारांची उपयुक्तता, कार्यक्षमता कमी होत जाते. कामही चांगले होत नाही, तसेच ते चालण्यासाठी अधिक ऊर्जाही लागते. अवजारांची देखभाल आणि निगा कशी घ्यावी, याची माहिती या लेखातून घेऊ.

पल्टी नांगराची देखभाल ः

१. नांगराचे वारंवार झिजणारे भाग (उदा. फाळ, लॅण्डसाईड आणि मोल्ड बोर्ड इ. ) वेळच्या वेळी दुरुस्त करावेत. दुरुस्ती करणे शक्य नसल्यास त्वरित बदलावेत.

२. नांगराचे काम झाल्यानंतर पुढील हंगामापर्यंत ठेवण्यापूर्वी फाळ आणि मोल्ड बोर्डच्या पृष्ठभागावर हलके ग्रीस किंवा खराब वंगण तेल लावू ठेवावे. यामुळे नांगराचे गंजण्यापासून संरक्षण होईल.

३. फाळाची झीज झाल्यास त्यास पुढे सरकवून घ्यावे.

४. नांगर वापरण्यापूर्वी सर्व नट्स-बोल्ट्स घट्ट बसवावेत.

५. ट्रॅक्टरशी नांगराची जोडणी योग्य प्रकारे केल्यास ओढण्यासाठी वाढीव शक्ती लागत नाही.

६. ग्रीस निपल्स स्वच्छ करावेत. सर्व ग्रिसिंग पार्टंना ग्रीस लावावे.

७. धातूचे सर्व भाग रंगवावेत. सुगीपश्चात नांगर शेडमध्ये ठेवावा.

८. जर नवीन नांगर असल्यास दोन तास काम केल्यानंतर सर्व नट बोल्ट चेक करावेत.

पेरणी व टोकण यंत्राची काळजी ः

- वापरण्यात येणाऱ्या विविध बिया व खतांसाठी बियाणे वितरण यंत्रणेची योग्यता तपासा.

-प्रमाणित बियांची मात्रा मिळविण्यासाठी बियाणे वितरण यंत्रणेचे समायोजन (कॅलिब्रेशन) करावे.

-बियांची पेरणी प्रमाणित खोलीवर होते की नाही, हे तपासत राहावे.

-बियांची पेरणी झाल्यानंतर त्यावर मातीची हलकी पसरण होईल याची काळजी घ्यावी.

-बियाणे व खत वितरण करणाऱ्या नळ्या व्यवस्थित साफ कराव्यात.

-पेरणी व टोकण यंत्र चालविताना प्रमाणित व कॅलिब्रेशन केलेल्या गतीवर चालवावे.

-चालकाने पेरणी व टोकण करण्यापूर्वी बियाणे यंत्रणेची तरफ समायोजन (कॅलिब्रेशन) केलेल्या मापावर लावावी.

- हंगामातील पेरणीचे काम झाल्यानंतर संपूर्ण यंत्राची तपासणी करावी. झिजलेल्या व तुटलेल्या भागांची यादी करून त्यांची दुरुस्ती अथवा बदली करावी.

- काम झाल्यानंतर गती देण्याच्या कामी वापरल्या जाणाऱ्या चेन मोकळ्या करून हलक्या तेलाच्या डब्यात साठवणूक करावी.

- यंत्र चालू असताना गती मिळणाऱ्या सर्व भागांवर दररोज ग्रिसिंग करावे. दररोज सर्व नट व बोल्टस काम झाल्यानंतर आवळावेत.

- काम झाल्यानंतर बियाणे व खतांचे डबे साफ करून घ्यावेत.

- ठराविक कालावधीनंतर बियाणे वितरण यंत्रणा, ट्यूब्ज इ. साफ करावेत.

-जुन्या व वाकलेल्या नळ्या बदलाव्यात.

Agriculture Mechanixation
Agriculture Mechanization : यांत्रिकीकरण करूया गतिमान

रोटाव्हेटरची निगा व देखभाल

अ) दररोजची देखभाल

- रोटाव्हेटरच्या सर्व फिरणाऱ्या भागांना वंगण द्यावे. सर्व ग्रिसिंग पॉइंटवर ग्रीस लावावे.

-गिअर बॉक्समधील वंगण तेलाची पातळी तपासावी.

- पाते (ब्लेड) ढिले, वाकलेले अथवा मोडलेले नसल्याची नियमित खात्री करावी.

- रोटरच्या बेअरींगमध्ये गवत किंवा पालापाचोळा अडकलेला नसल्याची खात्री करावी.

ब) ठराविक कालांतराने करावयाची देखभाल

-रोटरच्या पात्यांची (ब्लेडची) स्थिती तपासावी. वाकलेली पाती सरळ करून परत जोडावीत. खराब पाती बदलावीत.

-गिअर बॉक्समधील वंगण तेलाची पातळी तपासावी. गिअर बॉक्समधील सर्व वंगण तेल बाहेर काढावे. स्वच्छ प्रमाणित ग्रेडच्या तेलाने गिअर बॉक्स योग्य पातळीपर्यंत भरावा.

- सर्व शाप्ट बेअरींगची तपासणी करून, त्यांना वंगण द्यावे.

- साइड कव्हर काढून साइड चेन - स्प्रॉकेट अथवा गिअरमधील सर्व भागांची स्थिती तपासावी. त्यांना वंगण द्यावे.

Agriculture Mechanixation
Mechanization : कृषी यांत्रिकीकरणासाठी किती अनुदान मिळतं ?

भात लागवड यंत्राची देखभाल ः

- प्रत्येक दिवशी काम झाल्यानंतर भात लागवड यंत्र स्वच्छ धुवून घ्यावे.

- फिरणाऱ्या भागांवरील चिखल व्यवस्थित साफ करावा.

- यंत्र स्वच्छ धुवून वाळल्यानंतर सर्व फिरणाऱ्या व घसरणाऱ्या भागांना वंगण द्यावे.

- कामे सुरू नसलेल्या काळामध्ये ठराविक सर्व्हिसिंग करावी. पाऊस आणि उन्हापासून संरक्षणासाठी शेडमध्ये ठेवावे.

- काम नसल्यास बॅटरीचे कनेक्शन वेगळे करून कोरड्या व उन्हापासून दूर जागेत ठेवावीत.

- स्वयंचलित व पॉवरटिलर भात लागवड यंत्राचे काम मोठ्या कालावधीसाठी नसेल तर इंधन टाकीतील इंधन काढून ठेवावे.

मळणी यंत्राबाबत दक्षता व काळजी ः

- मळणी यंत्राच्या सिलींडर आणि कॉन्केव्ह या दोन्ही भागातील अंतर योग्य असल्याची खात्री करून घ्यावी.

- यंत्र सुरू करण्यापूर्वी यंत्राचा कोणता भाग लूज नसल्याची खात्री करावी.

-मळणी यंत्र ठेवताना शक्यतो वाऱ्याच्या दिशेला भुस्सा बाहेर पडेल, असे ठेवावे.

- मळणी यंत्राच्या फिरण्याची दिशा यंत्रातील चिन्हाप्रमाणे असल्याची खात्री करावी.

- मळणी यंत्राच्या सर्व बेअरिंगजना आणि फिरणाऱ्या भागाला योग्य ते वंगण घालावे.

-मळणी करण्याचे पीक जास्त वाळलेले अथवा जास्त ओले असू नये.

- मळणी यंत्राचे काम पूर्ण झाल्यानंतर यंत्र स्वच्छ ठेवावे.

- ढिले झालेले नट बोल्टस घट्ट करावेत.

-आवश्यक त्या भागांना वंगण घालावे.

-मळणी यंत्र सावलीत ठेवावे.

- मशिनची साफसफाई, सर्व्हिसिंग किंवा दुरुस्ती करण्यापूर्वी युनिटची वीज खंडित केल्याची खात्री करावी.

-मळणी यंत्रावर काम करताना महिलांचा साडी, पदर, ओढणी किंवा पुरुषांचे मफलर, गमछा, खांद्यावरील टॉवेल इ. यंत्राच्या फिरत्या भागात येऊन मोठ्या प्रमाणात अपघात होतात. फिरत्या भागाशेजारी करणाऱ्या व्यक्तींचे कपडे घट्ट, शरीराबरोबर असल्याची खात्री करावी.

पॉवर विडर यंत्राची देखभाल ः

- यंत्र वापरण्यापूर्वी सर्व नट बोल्टस तपासून आवश्यकतेनुसार घट्ट करावेत.

-यंत्राच्या फिरणाऱ्या भागांना नियमित वंगण करावे.

-वापरापूर्वी सर्व पात्यांना धार करावी. पाते व्यवस्थित घट्ट बसल्याची खात्री करावी.

- कंपनीच्या नियमांनुसार इंजिनचे फिल्टर बदल, ऑइल बदल, एअर क्लीनर, इंधन पंपाची स्वच्छता इ. याकडे लक्ष द्यावे.

-वापरानंतर यंत्र शेडमध्ये ठेवावे.

डॉ. तुळशीदास बास्टेवाड

(प्राध्यापक व प्रमुख संशोधक, अखिल भारतीय समन्वित कृषी अवजारे व यंत्रे संशोधन प्रकल्प, डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, राहुरी.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com