Kisan Drone : स्टार्टअप्स आणि कृषी रसायन क्षेत्रात समन्वय हवा

आता शेतकऱ्यांना अधिकाधिक प्रमाणात ड्रोन (Drone) उपलब्ध होतील, याकडे लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. कृषी क्षेत्रातील ड्रोन उत्पादन आणि सेवेसाठी सध्या २०० हून अधिक स्टार्टअप्स कार्यरत आहेत.
Kisan Drone
Kisan DroneAgrowon

शेतकऱ्यांना अधिकाधिक प्रमाणात ड्रोन (Agriculture Drone) उपलब्ध करून देण्यासाठी कृषिरसायन उद्योग क्षेत्र आणि कृषी तंत्रज्ञान क्षेत्राने राज्यांसोबत समन्वय साधण्याची गरज केंद्र सरकारने व्यक्त केली. ड्रोन तंत्रज्ञानावर आयोजित परिसंवादात कृषी रसायन क्षेत्राने काही सूचना केल्या. तर कृषी तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रतिनिधींनी आपल्या अपेक्षा व्यक्त केल्या. यावेळी शेतकऱ्यांना ड्रोन उपलब्ध करून देण्यासाठी काय करायला हवे, याबाबत सरकारकडून काही सूचना देण्यात आल्या.

शेतीमधील विविध फवारण्यांसाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा (Drone Technology) वापर करण्यात येणार आहे. केंद्र सरकारकडूनही त्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. यासंदर्भात थिंकॲग (ThinkAg) आणि क्रॉप लाईफ इंडिया (CropLife India) यांच्यातर्फे 'ॲगलॅब - कनेक्टिंग इंनोव्हेटर्स' हा परिसंवाद आयोजित करण्यात आला. वृत्तसंस्थेने यासंदर्भातील वृत्त दिले.

या परिसंवादात कृषी रसायन क्षेत्राने (Agrochemical Industry) फवारणीसाठी मोठ्या प्रमाणात ड्रोन तंत्रज्ञानाचा (Drone Technology) वापर करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात ड्रोन उपलब्ध व्हावेत यासाठी राज्यांसमवेत काम करण्याचा सल्ला केंद्र सरकारने कृषी रसायन उद्योग क्षेत्राला दिला. कृषी रसायन क्षेत्रातील प्रातिनिधींसह कृषी तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रतिनिधींनीही या परिसंवादात सहभाग घेतला.

आता शेतकऱ्यांना अधिकाधिक प्रमाणात ड्रोन (Drone) उपलब्ध होतील, याकडे लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. कृषी क्षेत्रातील ड्रोन उत्पादन आणि सेवेसाठी सध्या २०० हून अधिक स्टार्टअप्स कार्यरत आहेत. हे स्टार्टअप्स यात निर्णायक भूमिका बजावू शकतील, असा विश्वास केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या सहसचिव शोमिता बिस्वास (Shomita Biswas) यांनी व्यक्त केला. देशातील विविध राज्यांसोबत समन्वय साधने आणि स्वतःची कस्टम हायरिंग सेंटर (CHC) सुरु हा करणे हा या स्टार्टअप्ससाठी पुढचा टप्पा असेल, असे बिस्वास यांनी सांगितले.

कृषी क्षेत्रातील ड्रोन तंत्रज्ञानाचा (Drone Technology) वापर करण्यासाठी केंद्र सरकारकडून जे अभियान राबवले जात आहे त्यात ग्रामीण भागातील युवकांना सहभागी करून घेण्यात येत असल्याचे बिस्वास यांनी सांगितले. कुठलाही बी.एससी पदवीधारक अथवा कृषी पदवीधारक स्वतःचे कस्टम हायरिंग सेंटर (CHC) सुरु करू शकणार आहे. त्याला केंद्र सरकारच्या अनुदानाच्या मदतीने स्वतःचे ड्रोन खरेदी करता येणार आहे. स्वतःचे ड्रोन शेतकऱ्यांना फवारणीसाठी भाडेतत्वावर देऊन त्याला व्यवसाय करता येणार आहे. या माध्यमातून त्याला स्वतःला रोजगार मिळणार आहे अथवा उद्योजक होऊन त्याला इतरांना रोजगार देता येणे शक्य होणार आहे.

हे युवकच ड्रोन तंत्रज्ञानाचे (Drone Technology) दूत ठरणार आहेत. कृषी तंत्रज्ञान क्षेत्रातील स्टार्टअप्समध्येही युवकांना अधिक प्रमाणात सहभागी करून घेणे शक्य होणार आहे. गावपातळीवर रोजगार उपलब्ध झाल्याने हा निर्णय कृषी अर्थकारणाला (Agricultural Economy) चालना देईल, अशी अपेक्षा बिस्वास यांनी व्यक्त केली.

किसान ड्रोनच्या (Kisan Drone) वापरामुळे पर्यावरणाला अनुकूल अशी इकोसिस्टम तयार होणार आहे. कृषी तंत्रज्ञान क्षेत्रातील नव्या कल्पना आणि कृषी रसायन क्षेत्राच्या भागीदारीमुळे हे सहजशक्य असल्याचा विश्वास यावेळी क्रॉप लाईफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी असीतवा सेन यांनी व्यक्त केला.

ड्रोन तंत्रज्ञानांच्या (Drone Technology) माध्यमातून फवारणी, पिकांच्या आरोग्याची तपासणी आणि डाटा कलेक्शन यांसारख्या गोष्टी अधिक सोप्या होणार आहेत. या तंत्रज्ञानामुळे भारतीय कृषी क्षेत्रात पारदर्शकता निर्माण होणार असल्याचे थिंकॲगचे सह-संस्थापक हेमेंद्र माथूर यांनी सांगितले.

ड्रोन कॅमेऱ्यातून काढण्यात आलेली छायाचित्रे (Pictures) सर्वांसाठी खुली असावीत, जेणेकरून पिकांच्या छायाचित्रांच्या अभ्यासावरून पिकांचे आरोग्य, पेरणी क्षेत्र, उत्पादनक्षमता अशा अनेक घटकांवर काम करता येईल. यासाठी ड्रोनचालक, छायाचित्रे साठवणुकीची यंत्रणा यांच्यात समन्वय ठेवला जावा, अशी अपेक्षा माथूर यांनी व्यक्त केली.

ड्रोनचा ऑपरेशनल खर्च वाचवण्यासाठी (८ ते १० लाखांवरून २.५ ते २.८ लाखांवर) बॅटरीवर चालणाऱ्या पेट्रोल इंजिन बेस्ड ड्रोन विकसित केले जात आहेत. हे ड्रोन ६५० मिलिलिटर पेट्रोलमध्ये ३० ते ३५ एकरवर फवारणीसाठी वापरले जाऊ शकते. दिवसाकाठी सलग आठ तास याचा वापर केला जाऊ शकतो, असे दक्ष अनमॅनड सिस्टिम्सचे मुख्य व्यावसायिक अधिकारी राजा रामन म्हणाले.

सहा बॅटरीजवर चालणारा रोबोसुद्धा फवारणीचे काम करू शकणार आहे. हा रोबो दिवसाकाठी ३० एकर शेतात फवारणी करू शकेल, असे यावेळी टेकवर्ड एव्हीगेशनचे प्रमुख सौरभ श्रीवास्तव यांनी सांगितले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com