Paddy : यंत्राद्वारे भात लागवड करून खर्चात बचत करावी

कृषी विभागाच्या राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत यंत्राद्वारे भात लागवड प्रात्यक्षिक कामथडी येथील शेतकरी राहुल इंगुळकर यांच्या शेतात राबविण्यात आले.
Paddy
PaddyAgrowon

नसरापूर, ता. भोर ः शेतकऱ्यांनी यंत्राद्वारे भात लागवड (Paddy Planting Through Machinery) करून उत्पादन खर्चात (Production Cost) बचत करावी, असे आवाहन भोर तालुका कृषी अधिकारी देवेंद्र ढगे यांनी कामथडी (ता.भोर) येथे यांत्रिक भात लागवड (Paddy Cultivation) प्रात्यक्षिकाच्या वेळी बोलताना केले.

Paddy
Paddy : देशात सरासरीऐवढी भात लागवड होईल

कृषी विभागाच्या राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत यंत्राद्वारे भात लागवड प्रात्यक्षिक कामथडी येथील शेतकरी राहुल इंगुळकर यांच्या शेतात राबविण्यात आले. या वेळी पंचायत समिती भोरचे माजी सभापती लहुनाना शेलार, तालुका कृषी अधिकारी देवेंद्र ढगे, नसरापूर मंडल कृषी अधिकारी, राजेंद्र डोंबाळे, कृषी पर्यवेक्षक ज्ञानदेव गोरवे, कृषी सहायक राहुल दिघे, विष्णू शिनगारे उपस्थित होते.

Paddy
Paddy : सिंधुदुर्गमधील ३४२ गावांची भातकापणीसाठी निवड

या वेळी तालुका कृषी अधिकारी ढगे यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ‘‘भात हे भोर तालुक्यातील प्रमुख पीक आहे. भात शेतीसाठी मोठ्या प्रमाणात मजुरांची गरज भासते, परंतु सध्या मजुरांची कमतरता जाणवत आहे. योग्य पाऊस झाला की प्रत्येक शेतकऱ्याची भात लागवडीची लगबग सुरू होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी यांत्रिकी भात लागवडीचा अवलंब करावा, यामुळे खर्चात बचत होते व योग्य वयातील रोपांची लागवड केल्यामुळे उत्पादनात वाढ होते.’’

मंडळ कृषी अधिकारी राजेंद्र डोंबाळे यांनी यंत्राद्वारे भात लागवड करण्यासाठी रोपवाटिका कशी तयार करावी याबाबत माहिती दिली. तसेच, भात लागवड यंत्र खरेदी करण्यासाठी कृषी विभागाच्या यांत्रिकीकरण योजनेतून शेतकऱ्यांनी अर्ज करावा, असे आवाहन केले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com