Geo Tagging : ‘जिओ टॅगींग’द्वारे होणार पीक नोंदणी

हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेसंबंधी केळीसह इतर फळ पिकांसाठी विमा संरक्षण घेतांना यंदापासून विमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांच्या थेट शेतात जावून केळी पिकाची पाहणी (जिओ टॅगींग) करण्यात येणार आहे.
Crop Registration
Crop RegistrationAgrowon

जळगाव ः हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेसंबंधी (Fruit Crop Insurance Scheme) केळीसह (Banana) इतर फळ पिकांसाठी विमा संरक्षण (Insurance Cover) घेतांना यंदापासून विमा योजनेत (Crop Insurance Scheme) सहभागी झालेल्या शेतकऱ्यांच्या थेट शेतात जावून केळी पिकाची पाहणी (जिओ टॅगींग) (Geo Tagging For Crop Registration) करण्यात येणार आहे. त्यात अक्षांश - रेखांश तपासले जातील. तसेच उतारा, गटाचा नकाशा आदीची पाहणी झाल्यानंतर विमा मंजूर करण्यात येणार असल्यामुऴे अवैध प्रकरणांना आळा बसणार आहे.

Crop Registration
E Peek Pahani : पावणेतीन लाख शेतकऱ्यांची ई-पीक नोंद

जिल्ह्यात ५० ते ५३ हजार हेक्टरवर केळीची लागवड केली जाते. केळी लागवड करणारे शेतकरी गारपीट, वादळ, थंडी, उष्णता यासंबंधीच्या समस्यांमध्ये पिकाचे नुकसान झाल्यास वित्तीय अडचणीत येतात. यामुळे समस्यांपासून पिकाला विमा संरक्षण घेतले जाते. जिल्ह्यात दरवर्षी ४९ ते ५० हजार शेतकरी विमा योजनेत सहभागी होतात.

२०२१-२२ मध्ये ४९ हजार शेतकरी या योजनेत सहभागी झाले होते. ३३४ कोटी रुपये परताव्यापोटी जिल्ह्यात यंदा मिळाले. २०२२-२३ मध्येही एवढेच शेतकरी या योजनेत सहभागी होतील, असे दिसत आहे. ३१ ऑक्टोबरपर्यंत योजनेत सहभागी होता येईल. परंतु ज्या शेतकऱ्यांनी केळी लागवड केली आहे, त्यांनीच या योजनेत सहभाग घ्यावा, असे आवाहन विमा कंपनीने यंदा केले आहे.

Crop Registration
E Peek Pahani : त्रेपन्न लाख हेक्टरवर झाली ई-पीक पाहणी

लागवड न करताच योजनेत सहभाग घेतल्याचे समोर आल्यास शेतकऱ्यांचा योजनेतील सहभाग संपुष्टात येऊन विमा हप्ताही जप्त होईल, असेही विमा कंपनीने म्हटले आहे. जिल्ह्यात केंद्र सरकारची भारतीय कृषक विमा कंपनी (एआयसी) या योजनेचे काम करीत आहे. विमा योजनेत सहभागी शेतकऱ्यांच्या थेट शेतात जावून केळी पिकाची पाहणी (जिओ टॅगींग) केली जाईल.

त्यात अक्षांश - रेखांश तपासले जातील. तसेच उतारा, गटाचा नकाशा आदीची पाहणी होईल. यात शेतात केळी पीक नसल्यास संबंधित विमाधारक शेतकऱ्याचा योजनेतील सहभाग संपुष्टात येईल. तसेच शेतकऱ्याने कंपनीकडे सादर केलेली विमा हप्त्याची रक्कमही जप्त होईल.

शेतकरी संघटना म्हणते, लागवडीला मुदत द्या

विमा कंपनीच्या कार्यपद्धतीसंबंधी रघुनाथदादा प्रणीत शेतकरी संघटनेचे किरण पाटील म्हणाले की, काही शेतकऱ्यांची केळी लागवड पावसाने रखडली. काहींचे कुकंबर मोझॅक विषाणूने नुकसान झाल्याने बागा फेकाव्या लागल्या. काही शेतकरी आपल्या गटात किंवा शेतात एकाच वेळी सर्व लागवड न करता टप्प्याटप्प्याने केळी लागवड करतात. यामुळे विमाधारक शेतकऱ्यांना विमा योजनेत सहभागी झाल्यानंतर किमान दोन महिने केळी लागवडीसाठी मुदत द्यावी तसेच विमा योजनेत सहभागाची मुदतही डिसेंबरपर्यंत द्यावी.

आमच्या वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशानुसार तसेच निश्चित नियमानुसार विमाधारक शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन केळी किंवा संबंधित विमा संरक्षित पिकाची पाहणी (जिओ टॅगींग) केली जाईल. यात ज्या पिकासाठी विमा संरक्षण घेतले आहे, तेच पीक शेतात नसल्यास संबंधित शेतकऱ्याचा विमा योजनेतील सहभाग रद्द केला जाईल किंवा संपुष्टात आणला जाईल.
कुंदन बारी, समन्वयक, भारतीय कृषक विमा कंपनी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com