Nanotechnology : रोगांचा धोका टाळणारे नॅनो कणयुक्त कपडे विकसित

चांदी, तांब्याच्या नॅनो कणांचा केला कॉटन कपड्यांमध्ये वापर
Nanotechnology
NanotechnologyAgrowon

‘कोविड १९’ (Covid 19) या महामारीमुळे जागतिक पातळीवर एकूण मानव समाजाला मोठा धक्का दिला आहे. अशा अचानक येणाऱ्या जिवाणू, विषाणू आणि अन्य सूक्ष्मजीवांच्या धोक्यापासून बचाव करण्यासाठी अत्याधुनिक साधने निर्मितीच्या (Advance Technology Production) विचारांना चालना मिळाली आहे. गेल्या काही वर्षांपासून सूक्ष्मजीवविरोधी साधनांच्या विकासामध्ये कार्यरत अमेरिकन संशोधन (American Research Center) सेवेतील दोन शास्त्रज्ञांनी कापसापासून तयार केलेल्या कपड्यांमध्येच सूक्ष्मजीवविरोधी चांदी आणि तांब्याच्या ऑक्साइडचे अतिसूक्ष्म कण (नॅनो पार्टिकल) (Nano Particle) अंतर्भूत करण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे.

न्यू ओरलेन्स (लॉस एंजेलिस) येथील अमेरिकन संशोधन सेवेच्या दक्षिणी प्रादेशिक संशोधन केंद्रातील अभियंत्या डॉ. सुंघयुन नाम गेल्या काही वर्षांपासून कॉटनच्या कपड्यांमध्ये चांदीच्या नॅनो कणांचा वापर करण्यासंदर्भात संशोधन करत आहेत. अर्थात, अशा प्रकारे नॅनो कणांचा समावेश असलेले काही कपडे बाजारामध्येही उपलब्ध होऊ लागले आहेत. मात्र त्यामध्ये नॅनो कणांचे केवळ आवरण असते. त्यामुळे काही काळातच (कपडे भिजल्यानंतर, धुतल्यानंतर किंवा वापरानंतर) त्याची सूक्ष्मजीव विरोधी कार्यक्षमता कमी होते.

या नव्या तंत्रज्ञानाचे वैशिष्ट्ये ः

नाम यांच्या तंत्रज्ञानामध्ये कपाशीच्या धाग्यामध्येच सूक्ष्मजीवविरोधी धातूंच्या सूक्ष्मकणांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये १) सूक्ष्मजीव कमी करणारे घटक, २) सूक्ष्म कणांना स्थिरता देणारे घटक अशा दोन प्रकारचे घटक अंतर्भूत केलेले असतात. या कामासाठी पूर्वी रासायनिक चिकटद्रव्यांचा (अॅडिटिव्हज) समावेश करावा लागत असे.

या नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानामुळे हे कपडे वॉशिंग मशिनमधून कितीही वेळा धुतले तरी त्याचे सूक्ष्मजीव विरोधी गुणधर्म कमी होत नाहीत.

त्यामुळे ग्राहकांना सतत नवे कपडे विकत घ्यावे लागणार नाहीत. तसेच यात रसायनांचा वापर नसल्याने आणि त्यांचा कचरा वाढण्याची शक्यता नसल्यामुळे पर्यावरणासाठीही फायदेशीर ठरतील.

यात वापरलेले धातूचे नॅनो कण हे जैवविघटनशील असणार आहेत. त्यामुळे प्रदूषणाची समस्याही राहणार नाही, असे दावे शास्त्रज्ञांनी केले आहेत.

चांदीप्रमाणेच तांब्याच्या सूक्ष्म कणांवर केले काम ः

या संशोधनामध्ये रसायनतज्ज्ञ डॉ. मॅथ्यू हिल्ल्येर यांचेही महत्त्वाचे योगदान असून, ते तंत्रज्ञानाच्या प्रसारासाठी प्रयत्न करत आहेत. त्याच सोबत सुंघयुन नाम यांच्यासह अन्य धातूंच्या कणांचा त्यात वापर करण्यासंदर्भात प्रयोग सुरू आहेत. चांदीच्या कणांचे मिश्रण असलेल्या कापडाचे पेटंट नाम यांच्याकडे आहे. मात्र

चांदीचे सूक्ष्म कण हे तांब्याच्या तुलनेमध्ये महाग पडतात. त्यामुळे तांबे आणि ऑक्सिजन या मुलद्रव्यांच्या प्रक्रियेतून तयार होणारे कॉपर ऑक्साइड अधिक स्वस्त आणि फायदेशीर ठरते. (सामान्यतः त्याला क्युप्रस ऑक्साइड या नावाने ओळखले जाते.) या कपड्यांच्या पेटंटसाठी हिल्ल्येर यांनी अर्ज केलेला आहे.

चांदीचे नॅनो कण गोलाकर असतात. तर तांब्याचे नॅनो कण हे फुलांसारखे दिसतात. त्यामुळे त्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर घेतलेल्या प्रतिमाही चांगल्या दिसतात.

उपयोग ः

-या कपड्यांचा वापर वैद्यकीय कारणांसाठी मास्क, हातमोजे, अॅप्रन किंवा कपडे अशा बाबींसाठी करता येईल. जखमांना बांधल्या जाणाऱ्या पट्ट्यांमध्येही ते वापरता येईल.

- विविध खेळांच्या कपड्यांमध्ये, शू लायनर म्हणून, जमिनीवरील जाजम, चटयांमध्येही त्यांचा वापर करता येईल. यामुळे सूक्ष्मजीवविरोधी गुणधर्मांसोबतच कपड्यांना घामामुळे किंवा ओलसरपणामुळे येणारा कुबट वास, जंतू यांची वाढ रोखता येते.

-सैन्यदलांच्या ड्रेसमध्येही या कापडाचा वापर करता येईल. यामुळे अनेक दिवस न धुताही कपड्यांचा वापर करता येईल.

-सध्या पॉलिस्टर, पॉलिप्रोपेलिन अशा कृत्रिम धाग्यांचा वापर वाढत असताना कॉटनच्या कपड्यांचा वापर वाढवण्यामध्ये असे आधुनिक तंत्रज्ञान महत्त्वाचे ठरणार आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com