ट्रॅक्टरची देशांतर्गत विक्री घटली: निर्यात मात्र जोमाने

सरकारी हमीभावात करण्यात आलेली सातत्यपूर्ण वाढ, रब्बी हंगामातील उत्पादनांची हमीभावाने खरेदी आणि मान्सूनचे वेळेवर आगमन या घटकांमुळे ट्रॅक्टर उद्योग क्षेत्रात सकारात्मक वातावरण आहे.
ट्रॅक्टरची देशांतर्गत विक्री घटली: निर्यात मात्र जोमाने
TractorAgrowon

देशांतर्गत ट्रॅक्टरच्या (Tractor) विक्रीत मे २०२२ मध्ये ८ टक्क्यांची घसरण झाल्याचे नोंदवण्यात आले आहे. मे २०२१ च्या तुलनेत देशांतर्गत ट्रॅक्टर विक्रीच्या तुलनेत आताचे प्रमाण जास्त आहे. अंतर्गत विक्रीत घट झाली असली तरी मासिक आणि वार्षिक आकडेवारीनुसार ट्रॅक्टर निर्यातीत वाढ दिसून आली आहे.

ट्रॅक्टर अँड मेकॅनायझेशन असोसिएशनच्या आकडेवारीनुसार, मे २०२२ मध्ये देशभरात ८१९४० ट्रॅक्टर्स विकल्या गेले आहेत. एप्रिल २०२२ मध्ये ८९,२०१ ट्रॅक्टर्स विकल्या गेले होते. मे २०२१ मध्ये देशभरात ५५६०९ ट्रॅक्टर्स विकल्या गेले होते.

मे २०२२ मधील ट्रॅक्टर (Tractor) उद्योगाची वाटचाल अपेक्षेपेक्षा समाधानकारक राहिल्याचे सांगताना बाजार विश्लेषकांनी ट्रॅक्टरची विक्री घटल्याचे नमूद केले आहे. गहू निर्यातबंदीच्या निर्णयानेही विक्रीवर परिणाम झाला.

समाधानकारक उत्पादन, सरासरी मान्सून आदींमुळे एप्रिल २०२२ मध्ये ट्रॅक्टरची चांगली विक्री झाल्याचे या क्षेत्रातील जाणकारांनी म्हटले आहे. मात्र ट्रॅक्टरची दरवाढ,सततच्या महागाईमुळे आणि बँकांच्या व्याजदरात वाढ झाल्याने मे महिन्यात विक्रीत घट झाली. असे असले तरी एप्रिल-मे २०२१ च्या तुलनेत एप्रिल-मे २०२२ मध्ये ट्रॅक्टर विक्रीत १९ ते २० टक्क्यांची वाढ असल्याचे क्रिसिल रेटिंग्जचे ज्येष्ठ संचालक अनुज सेठी म्हणालेत.

Tractor
चालू आर्थिक वर्षात भारताची गहू निर्यात ७० लाख टनांवर: एफएओ

आजमितीस ट्रॅक्टर उद्योगातील वाढीचा दर १ टक्क्यांवर जाईल, अशी अपेक्षा आहे. आर्थिक वर्षाच्या उर्वरित काळात वाढीचा दर मध्यम असेल, कारण ट्रॅक्टर अधिक महाग होतील, याशिवाय बँकांचे कर्ज महाग होईल. थोडक्यात २०२३ मधील ट्रॅक्टर विक्रीचे प्रमाण २०२२ पेक्षा जास्त असेल. मात्र २०२१ मध्ये ट्रॅक्टर (Tractor) विक्रीने जो उच्चांक गाठला, तेवढी विक्री होणार नसल्याचे सेठी म्हणालेत.

मे २०२२ मध्ये ११,५८२ ट्रॅक्टर्सची निर्यात करण्यात आली. एप्रिल २०२२ मध्ये १०७१५ ट्रॅक्टर्स निर्यात करण्यात आले. मे २०२१ मध्ये ७७०४ ट्रॅक्टर्स निर्यात करण्यात आले होते. अमेरिका, युरोप आणि आशियात भारताकडून ट्रॅक्टर (Tractor Export) निर्यात केली जाते. भारत हा छोट्या ट्रॅक्टरच्या (३० ते ७५ हॉर्स पॉवर) निर्यातीचे केंद्र बनला. येत्या काळातील कृषी क्षेत्राच्या शाश्वत विकासाचा विचार करत काही कंपन्या ९० ते १२० एचपी क्षमतेची ट्रॅक्टर्स बाजारात आणण्याची तयारी करत असल्याचेही या क्षेत्रातील जाणकारांनी म्हटले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com