Drone : वसमत येथे ड्रोनव्दारे फवारणी प्रात्यक्षिक

पूर्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांच्या वसमत येथील शेतावरील सोयाबीन आणि ऊस या पिकांवर ड्रोनव्दारे फवारणीचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.
Agriculture Drone
Agriculture DroneAgrowon

हिंगोली ः जिल्ह्यातील पूर्णा सहकारी साखर कारखान्यातर्फे नवीन तंत्रज्ञान योजने अंतर्गंत वसमत येथे ड्रोनव्दारे फवारणी (Drone Spraying) प्रात्यक्षिक रविवारी (ता. १७) घेण्यात आले.

Agriculture Drone
Drone Technology : ड्रोन तंत्रज्ञानाच्या अंगिकाराचा आग्रह

पूर्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांच्या वसमत येथील शेतावरील सोयाबीन आणि ऊस या पिकांवर ड्रोनव्दारे फवारणीचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.

या वेळी उपस्थित शेतकऱ्यांना ड्रोन तंत्रज्ञानाची माहिती देण्यात आली. ड्रोनव्दारे मोठ्या क्षेत्रावरील पिकांवर कमी वेळेत फवारणी करता येते. आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घेण्यासाठी शेतकरी गटांना पुढाकार घ्यावा लागेल, असे दांडेगावकर यांनी सांगितले. या वेळी शेतकरी, कारखान्याचे सभासद, कर्मचारी उपस्थित होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com