शेतकरी पीक नियोजन : संत्रा

मी संत्रा झाडांची लागवड केल्यानंतर सुरुवातीला रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वापरावर अधिक भर दिला होता.
Orange
Orange Agrowon

शेतकरी ः शिरीष प्रमोदराव महाले

गाव : शिवपूर, पो. बोर्डी, ता. अकोट, जि. अकोला

एकूण क्षेत्र : ६० एकर

संत्रा लागवड : सात एकर (८०२ झाडे)

-----------------------------------

आमची एकत्रित कुटुंबाची ६० एकर शेती आहे. त्यातील ७ एकरांवर संत्रा लागवड असून, उर्वरित क्षेत्रामध्ये हरभरा, मका, गहू, ज्वारी, पपई आणि टरबूज या पिकांची लागवड आहे. संत्रा बागेत सुमारे ८०२ झाडे आहेत. त्यात आठ वर्षांच्या ५१२ झाडांची १८ बाय २० फूट, तर बारा वर्षांच्या २९० झाडांची २० बाय २० फूट अंतरावर लागवड केली आहे. सध्या दोन्ही बागांतील झाडे ताणावर आहेत.

- मी संत्रा झाडांची लागवड केल्यानंतर सुरुवातीला रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वापरावर अधिक भर दिला होता. मात्र मागील काही दिवसांत रासायनिक निविष्ठांच्या दरात सातत्याने वाढ झाली. त्यामुळे व्यवस्थापन पद्धतीत बदल करत ५० टक्के सेंद्रिय आणि ५० टक्के रासायनिक पद्धतीने बागेचे व्यवस्थापन करत आहे.

- बागेत पीएसबी आणि ॲझॅटोबॅक्टर या जिवाणू संवर्धकांच्या वापर अधिक भर दिला आहे. रासायनिक निविष्ठांचा वापर कमी करून सेंद्रिय पद्धतीने व्यवस्थापन करण्यास सुरुवात केल्यापासून फळांची गुणवत्ता देखील चांगली मिळत आहे.

- बागेत शेणखताचा थेट वापर केला जात नाही. त्याऐवजी जागेवरच शेणखत पावसाळ्यात पूर्णपणे कुजू दिले जाते. त्यानंतर चांगले कुजलेले शेणखत प्रति झाड ३ ते ४ किलो प्रमाणे दिले जाते.

मागील कामकाज ः

- साधारण मार्च महिन्यात झाडांची योग्य पद्धतीने छाटणी करून घेतली. झाडांची सल काढल्यानंतर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यासाठी कीटकनाशके आणि बुरशीनाशकांची प्रतिबंधात्मक फवारणी घेतली.

- एप्रिलच्या सुरुवातीला बागेतील प्रत्येक झाडाच्या खोडाला बोर्डो पेस्ट लावून घेतली.

- त्यानंतर झाडांच्या बाजूने रिंग पद्धतीने एप्रिलच्या रासायनिक आणि जैविक खतांच्या मात्रा दिल्या.

- सध्या दोन्ही बागा ताणांवर आहेत. २९० झाडांची बाग २४ एप्रिलपासून, तर ५१२ झाडांची बाग १ मेपासून ताणावर आहे.

- ताणावर सोडल्यानंतर झाडाच्या वरील भागातील शेंडे छाटून घेतले.

- त्यानंतर चांगले कुजलेले शेणखत प्रति झाड ३ ते ४ किलो याप्रमाणे मात्रा दिली.

आगामी नियोजन ः

- सध्या बाग ताणावर असून साधारण जून महिन्यात ताण तोडला जाईल.

- ताण मॉन्सूनचा पहिला पाऊस पडल्यानंतर जमिनीत साधारण ३ ते ४ इंच ओलावा निर्माण झाल्यानंतर आपोआपच झाडांचा ताण तुटतो. मात्र गेल्या काही वर्षांतील पावसाच्या असमान वितरणाचा फटका मृग बहरातील बागांवर होत आहे. त्यामुळे पाटपाणी पद्धतीने पाणी देऊन ताण तोडला जातो.

- हलक्या जमिनीतील ५१२ झाडे लहान असल्याने त्यांना जास्त ताण सहन होत नाही. त्यामुळे मॉन्सूनच्या पावसानंतर अपेक्षित ओलावा निर्माण न झाल्यास पाटपाणी पद्धतीने पाणी देऊन ताण तोडला जाईल. तर २९० झाडांची लागवड भारी जमिनीत असल्याने या झाडांना जास्त ताण असला तरी सहन होतो.

- फळधारणेस सुरुवात झाल्यानंतर फळगळ टाळण्यासाठी आणि फळांचा दर्जा सुधारण्यासाठी संजीवकांची फवारणी घेतली जाईल.

- तसेच कीड-रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आवश्यकतेनुसार कीटकनाशके आणि बुरशीनाशकांच्या प्रतिबंधात्मक फवारण्या घेतल्या जातील.

- दर १५ ते २० दिवसांनी १२ः६१ः०, १३ः१४ः१३, ०५२ः३४ यांची मात्रा दिली जाईल. तसेच सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी केली जाईल.

-------------------------

- शिरीष महाले, ९५७९६५९५०४

(शब्दांकन : विनोद इंगोले)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com