पाच राज्यांकडून ड्रोनद्वारे फवारणीची पूर्वतयारी

एप्रिल महिन्यात केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय आणि सेंट्रल इन्सेक्टीसाईडस बोर्ड अँड रजिस्ट्रेशन कमिटीने (CIB&RC) ४७७ कीडनाशकांच्या ड्रोन फवारणीला मान्यता दिली आहे. या ४७७ नोंदणीकृत कीडनाशकांत कीटकनाशक, बुरशीनाशक आणि वनस्पती वाढ नियामकांचा समावेश आहे.
Agriculture Drone
Agriculture DroneAgrowon

कर्नाटक, हरियाणा, पंजाब, मध्य प्रदेश आणि तामिळनाडू सरकार येत्या २ ते ३ महिन्यांत फवारणीसाठी किसान ड्रोनच्या वापराची शक्यता आजमावत असून त्यासाठी संबंधित राज्यांत ड्रोन उत्पादक कंपन्या, शेतकरी उत्पादक संघटना आणि कृषी विद्यापीठांसोबत कामही सुरु करण्यात आले आहे.

येत्या दोन ते ३ महिन्यांत शेतकऱ्यांना किसान ड्रोनच्या माध्यमातून फवारणी करता यावी, यासाठी या पाच राज्यांतील सरकार प्रयत्नशील असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे.

किसान ड्रोन (Kisan Drone) खरेदीसाठी केंद्र सरकारकडून १०० टक्के अनुदान देण्यात येणार आहे. कर्नाटक, पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांनी केंद्र सरकारच्या या योजनेचा लाभ घेण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या २ ते ३ महिन्यांतच कृषी विद्यापीठे आणि शेतकरी उत्पादक संघटनांच्या (Farmer Producer Organisation) मदतीने राज्यातील फवारणीसाठी ड्रोनचा वापर करण्याची तयारीही या राज्यांनी केली आहे.

उत्तर प्रदेश, पंजाब आणि हरियाणा या राज्यांत फवारणीसाठी ड्रोनच्या वापराच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे या राज्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांनी (Farmer Producer Organisation) प्रत्यक्षातील ड्रोन वापराची पूर्वतयारी केली आहे. काही राज्यांत किसान ड्रोनचा वापर फवारणीसाठी कसा करायचा? याची प्रात्यक्षिकेही घेण्यात आली आहेत. त्यामुळे त्या राज्यातील शेतकऱ्यांनी शेतकरी उत्पादक कंपन्यांकडे (Farmer Producer Organisation) किसान ड्रोन खरेदीचे प्रस्ताव पाठवण्याचा आग्रह धरला आहे.

किसान ड्रोनची खरेदी राज्यातील कृषी विद्यापीठे अथवा भारतीय कृषी संशोधन परिषदेला (ICAR) करता येते. त्यानंतरच शेतकऱ्यांना त्यांचा सशुल्क वापर करता येणार आहे. शेतकऱ्यांना १० किलो वजन क्षमता असणारे ड्रोन भाड्याने घेता येणार आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांकडून एकरी ३५० ते ४५० रुपये भाडे आकारले जाणार आहे.

जानेवारी महिन्यात केंद्र सरकारने कृषी क्षेत्रातील ड्रोन खरेदीसाठी १०० टक्के अनुदान देण्याचा निर्णय जाहीर केला होता. एप्रिल महिन्यात केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय आणि सेंट्रल इन्सेक्टीसाईडस बोर्ड अँड रजिस्ट्रेशन कमिटीने (CIB&RC) ४७७ कीडनाशकांच्या ड्रोन फवारणीला मान्यता दिली आहे. या ४७७ नोंदणीकृत कीडनाशकांत कीटकनाशक, बुरशीनाशक आणि वनस्पती वाढ नियामकांचा समावेश आहे.

Agriculture Drone
मर्यादित स्वरूपातील नैसर्गिक शेतीमुळे खाद्यसुरक्षेला धोका नाही

ड्रोनद्वारे फवारणी केल्यास पाण्याची बचत होते. मानवी फवारणीसाठी १० लिटरच्या कीडनाशकांसाठी १०० ते १२० लिटर पाण्याची गरज लागते. ही फवारणी २ ते ३ तासांत केली जाते. याउलट ड्रोनद्वारे फवारणी करण्यासाठी ५ लिटर कीडनाशक १० ते १२ लिटर पाण्यात मिसळावे लागते. अवघ्या १५ मिनिटांत फवारणीचे काम पूर्ण होत असल्याचे ड्रोन फेडरेशन ऑफ इंडियाचे (DFI)अध्यक्ष स्मित शहा यांनी म्हटले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com