शेतकऱ्यांपर्यंत फलोत्पादनाचे तंत्रज्ञान पोहोचवा ः डॉ. प्रसाद

पारंपरिक फळे, भाजीपाला शेतीला प्रभावी पर्याय फुलशेती ठरावी, यासाठी फुलांच्या विविध वाणांच्या संशोधनाबरोबरच प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी पुष्पसंशोधन संचालनालय प्रयत्नशील आहे.
शेतकऱ्यांपर्यंत फलोत्पादनाचे तंत्रज्ञान पोहोचवा ः डॉ. प्रसाद
Horticulture technologyAgrowon

पुणे ः ‘‘पारंपरिक फळे, भाजीपाला (Vegetable) शेतीला प्रभावी पर्याय फुलशेती (Flower Farming) ठरावी, यासाठी फुलांच्या विविध वाणांच्या संशोधनाबरोबरच प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी पुष्पसंशोधन संचालनालय प्रयत्नशील आहे. कृषी आणि फलोत्पादन (Horticulture) शाखेच्या विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण घेऊन शेतकऱ्यांपर्यंत फुलांवरील प्रक्रिया तंत्रज्ञान (Horticulture technology) पोहोचवावे,’’ असे आवाहन संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. के. व्ही. प्रसाद यांनी केले.

पुष्पसंशोधन संचालनालयातर्फे कृषी महाविद्यालयातील कृषी आणि फलोत्पादन शाखेच्या पदव्युत्तर वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम झाला. त्याच्या समारोपात डॉ. प्रसाद यांनी मार्गदर्शन केले. या वेळी संशोधक शास्त्रज्ञ डॉ. नरेंद्र गजभिये, डॉ. गणेश कदम, तारकनाथ सहा, गिरीश के. एस. संजय कड उपस्थित होते.

डॉ. प्रसाद म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी ‘आझादी का अमृत महोत्सव’ अभियानांतर्गत फुलांच्या प्रक्रियेतून मूल्यवर्धनासाठी प्रशिक्षण दिले जात आहे. याद्वारे शेतकऱ्यांना पारंपरिक फळे आणि भाजीपाला शेतीला फुलशेती प्रभावी पर्याय ठरत आहे. यासाठी पुष्पसंशोधन संचालनालयाद्वारे विविध सुंगधी आणि रंगाचे विविध वाण विकसित करण्यात येत आहेत. सुंगधी वाणापासून सुंगधी द्रव्यांना चांगली मागणी वाढत आहे. यामुळे शेतकऱ्यांना शेतावरच प्रक्रियेद्वारे मूल्यवर्धन करणे शक्य होत आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावे.’’

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com