शेतीस नवी दिशा देणारे ‘आयसीएल’चे तंत्रज्ञान

‘आयसी लीफ’ या प्रणालीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसोबत अतूट नाते तयार करून अन्नद्रव्य व्यवस्थापनाच्या माध्यमातून एकत्र येण्याचा आमचा निर्धार आहे. आयसी लीफ आणि पीक सल्लागार शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरणारे तंत्रज्ञान आहे.
ICL
ICLAgrowon

पिकांचे अन्नद्रव्य व्यवस्थापन (Crop Nutrition Management) हा महत्त्वाचा भाग आहे. विविध अन्नद्रव्यांची कार्यक्षमता आणि मिळणारे पीक उत्पादन (Crop Production) यामध्ये मोठी तफावत आढळून येत आहे. पिकांच्या संवेदनशील अवस्थेमध्ये योग्य त्या खतांच्या (Fertilizer) वापरामधून अन्नद्रव्यांची कार्यक्षमता वाढवता येते. यातून उत्पादनाची गुणवत्ता तसेच पीक उत्पादन वाढवणे आवश्यक आहे. ‘आयसी लीफ’ या प्रणालीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसोबत अतूट नाते तयार करून अन्नद्रव्य व्यवस्थापनाच्या माध्यमातून एकत्र येण्याचा आमचा निर्धार आहे. आयसी लीफ आणि पीक सल्लागार शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरणारे तंत्रज्ञान आहे.

आयसी लीफ प्रणाली ः

पानांचे परीक्षण, शिफारस आणि तांत्रिक मार्गदर्शन या त्रिसूत्रीवर आधारित अन्नद्रव्य व्यवस्थापनासाठी अद्ययावत नावीन्यपूर्ण मार्गदर्शन प्रणाली आहे. इस्राईल केमिकल्स लिमिटेड (आयसीएल) कंपनीतर्फे माती, पाणी, पाने आणि खत परीक्षण प्रयोगशाळेच्या माध्यमातून हा नावीन्यपूर्ण अद्ययावत उपक्रम शेतकऱ्यांच्या सेवेत दाखल झाला आहे.

प्रणालीचे फायदे ः

१) अचूक वेळेस मार्गदर्शन.

२) अचूक तपासणी पद्धती.

३) अचूक अन्नद्रव्य व्यवस्थापन शिफारशी.

४) कायमस्वरूपी सतत तांत्रिक मार्गदर्शन.

ICL
BBF Technology : जादा पावसातही बीबीएफवरील लागवडीची पिके जोमदार

कार्यपद्धती ः

१) ‘आयसीएल’च्या तांत्रिक प्रतिनिधीद्वारे तपासणीसाठी आवश्यक शास्त्रीय पद्धतीनुसार पानांचे नमुने प्रत्यक्ष शेतावर जाऊन घेतले जातात.

२) ‘आयसीएल’च्या अद्ययावत प्रयोगशाळेत अद्ययावत तंत्रज्ञानाद्वारे पानांच्या नमुन्यांची तपासणी केली जाते.

३) पानांच्या नमुन्याचा तांत्रिक अहवाल तयार केला जातो.

४) ‘आयसीएल’च्या तांत्रिक प्रतिनिधीद्वारे या अहवालावर आधारित शेतकऱ्यांना पीकवार अन्नद्रव्य व्यवस्थापनासाठी सल्ला दिला जातो.

तंत्रज्ञानाचे फायदे ः

१) एकाच ठिकाणी सर्व सेवांचा लाभ.

२) नावीन्यपूर्ण प्रणाली. अचूक निदान.

३) तत्काळ सेवा, अचूक सल्ला.

४) अद्ययावत तांत्रिक माहिती तसेच तांत्रिक मार्गदर्शन.

ICL
Fisheries Technology : नव्या मत्स्यपालन तंत्रज्ञानामुळे वाढले उत्पन्न

पीक सल्लागार ः पीक अन्नद्रव्य व्यवस्थापनासाठी संगणकीय तंत्रज्ञान

इस्राईल केमिकल्स लिमिटेड कंपनीने अग्मॅटिक्स (‘क्रॉप ॲडव्हाझर/पीक सल्लागार’) अन्नद्रव्य व्यवस्थापनेच्या दृष्टीने एक अद्ययावत माहिती पुरवणारी प्रणाली विकसित केली आहे.

१) या तंत्रज्ञानाची सुरुवात २०२० मध्ये आयसीएल (इस्राईल केमिकल्स लिमिटेड)द्वारा करण्यात आली.

२) हे कृषी तंत्रज्ञानावर आधारित अद्ययावत माहिती पुरवणारी डिजिटल प्रणाली आहे. ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’ तंत्रावर आधारित ही प्रणाली जगभरातील अद्ययावत तंत्रज्ञानाचा उपयोग करून शास्त्रज्ञ आणि शेतकऱ्यांना प्रयोगशील शेती तंत्राबद्दल माहिती पुरवते.

३) जगभरातील वेगवेगळ्या संशोधनाचा समन्वय आणि उपलब्ध तांत्रिक माहितीचा वापर करून शाश्‍वत शेती तंत्रज्ञानाबाबत माहिती पुरवली जाते.

४) पीक, हवामान, माती, पाणी आणि पाने देठ परीक्षण यावर आधारित कृषी तंत्रज्ञानाबाबत माहिती दिली जाते.

५) सद्यःस्थितीत दहा पिकांतील अन्नद्रव्य व्यवस्थापनाबाबत

‘अग्मॅटिक्स टूल’च्या माध्यमातून माहिती दिली जाते.

‘पीक सल्लागार’चा वापर ः

१) ही वेब आधारित संगणकीय प्रणाली आहे. ही प्रणाली गुगल क्रोम या माध्यमाचा वापर करून उत्तम प्रकारे हाताळता येते.

२) कंपनी प्रतिनिधी/सल्लागार व्यक्ती शेतकऱ्याची माहिती यामध्ये समाविष्ट करून घेऊ शकते. तसेच त्यांचे खातेदेखील तयार करून देऊ शकते.

३) जमिनीचा आराखडा, जमिनीचा प्रकार, माती परीक्षणाचा अहवाल आणि पाणी परीक्षणाचा अहवाल या सर्व बाबींची नोंद केली जाते.

४) हे तंत्रज्ञान शेती/कृषिविषयक उपलब्ध असलेल्या माहितीचे डिजिटल माध्यमाद्वारे योग्य प्रकारे जतन आणि वापर करण्यास मदत करते.

५) शेतकरी, पीक, उत्पादनाचे उद्दिष्ट, माती, पाणी आणि पानांच्या विश्‍लेषणाचा अहवाल समाविष्ट करून त्यावर आधारित अन्नद्रव्यांची गरज पीकवाढीच्या अवस्थेनुसार दिली जाते.

६) ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’चा वापर करून शेतीविषयक अद्ययावत माहिती आपण परिणामकारकरीत्या वापरात आणून कृषी व्यवस्थापनातील व्यक्तींना निर्णयक्षम कार्य करण्यास उपयोगी ठरते.

‘पीक सल्लागार’चे फायदे ः

१) तंत्रज्ञानाच्या माध्यमातून माती, पीक आणि पाणी यांचा अभ्यास करून पिकांचे निर्धारित उत्पन्न आणि उत्पादकता मिळवण्यासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापनाच्या दृष्टीने एक अद्ययावत माहिती उपलब्ध होते.

२) पीकवाढीच्या संवेदनशील अवस्थेनुसार अन्नद्रव्यांची गरज भागवण्यासाठी खतांची निवड करण्यास उपयुक्त तंत्रज्ञान.

३) भौगोलिक माहिती प्रणाली पद्धतीने सूचित केलेल्या क्षेत्रफळामध्ये दीर्घकालीन अन्नद्रव्य व्यवस्थापनासाठी मदत. तसेच पीक उत्पादन व उत्पादकता वाढवण्यास मदत.

४) भविष्यामध्ये अचूक अन्नद्रव्य व्यवस्थापनाच्या माध्यमातून पीक उत्पादन, गुणवत्ता व उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने उपयुक्त. जमिनीचे आरोग्य अबाधित ठेवून उत्पादनक्षम जमीन आणि शाश्वत उत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाचे माध्यम.

५) पिकास हवे तेवढेच द्या, जास्त ही नाही, की कमी ही नाही या संकल्पनेचा अवलंब.

------------------

टोल फ्री क्रमांक ः १८००२१०३०३१

व्हॉट्‍सॲप क्रमांक ः ८८०६१८५१९५

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com