Food Adulteration : ओळखा अन्नपदार्थांतील भेसळ

अन्नपदार्थांमध्ये भेसळीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. विविध सण, समारंभावेळी मोठ्या प्रमाणात खाद्यपदार्थांमध्ये अखाद्य घटकांची भेसळ केली जाते. घरगुती स्तरावर छोट्या चाचण्याद्वारे अन्नपदार्थांतील भेसळ ओळखणे शक्य आहे.
Food Adulteration
Food AdulterationAgrowon

दैनंदिन वापरातील अन्नपदार्थांमध्ये विविध घटकांचा वापर करून भेसळ (Food Adulteration) केली जाते. भेसळ करण्यासाठी अपायकारक पदार्थांचा वापर केला जातो. त्यामुळे अन्नपदार्थांचा दर्जा खालावतो. भेसळ करण्यासाठी सामान्यतः खडू भुकटी, कृत्रिम रंग, लहान-मोठे दगड, लाकडाचा भुस्सा इत्यादी घटकांचा वापर केला जातो. असे भेसळयुक्त पदार्थ खाण्यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होतात. त्यामुळे अन्नपदार्थांतील भेसळ ओळखणे (How To Identify Food Adulteration) अत्यंत आवश्यक आहे.

Food Adulteration
Milk Adulteration : दूध भेसळ कधी थांबणार?

भेसळ ओळखण्याच्या पद्धती

मीठ

 मिठामध्ये भेसळ करण्यासाठी प्रामुख्याने खडूची भुकटी वापरली जाते.

पद्धत

एका पाण्याने भरलेल्या ग्लासमध्ये एक चमचा मीठ मिसळून घ्यावे. जर मिठामध्ये खडूची भुकटी वापरली असेल तर ते द्रावण पांढऱ्या रंगाचे होते. तसेच भेसळीसाठी वापरलेले इतर पदार्थ ग्लासमधील पाण्याच्या तळाला जमा होतात.

Food Adulteration
Milk Adulteration : कशी ओळखली जाते दुधातील भेसळ ?

आयोडीनयुक्त मीठ

आयोडीनयुक्त मिठामध्ये साधे मीठ मिसळून भेसळ केली जाते.

पद्धत

 एका बटाट्याचे काप करावेत. या कापांवर थोडे आयोडीनयुक्त मीठ चोळावे आणि लिंबू रस २ थेंब टाकावा. भेसळ असेल तर बटाट्याच्या कापाला निळा रंग आलेला दिसतो. भेसळ नसल्यास कोणताही रंग दिसत नाही.

Food Adulteration
Dairy Adulteration : भेसळीचा भस्मासुर

कॉफी

कॉफीमध्ये चिकोरीच्या बियांची भेसळ केली जाते.

पद्धत

 पाण्याने भरलेल्या ग्लासमध्ये थोडीशी कॉफी मिसळून घ्यावी. कॉफीमध्ये चिकोरीच्या बियांची भेसळ असेल तर त्या बिया ग्लासमधील पाण्याच्या तळाशी जमा होतात. आणि कॉफी पाण्यावर तशीच तरंगेल पाण्यामध्ये मिसळणार नाही.

चहापत्ती

यामध्ये प्रामुख्याने भेसळ म्हणून वापरलेल्या चहाची पाने वापरली जातात.

पद्धत

 एका सुती कापडावर चहापत्ती पसरून ठेवावी आणि त्यावर थोडे पाणी शिंपडा. भेसळ असेल तर सुती कापडावर कोळशासारखा डांबरट रंग दिसून येईल. डाग पडलेले कापड पाण्याने धुतल्यानंतर त्यावरील डाग प्रकाशाच्या झोतामध्ये पाहता येतात.

एका काचेच्या पसरट ताटामध्ये किंवा पोर्सलीनच्या फरशीवर थोडे चुन्याचे पाणी शिंपडून त्यावर थोडीशी चहाची भुकटी शिंपडा. भुकटी शिंपडल्यावर नारंगी, लाल किंवा इतर कोणत्या रंगाच्या छटा आढळल्या तर चहापत्तीमध्ये कोळसा भुकटीची भेसळ आहे असे समजावे. जर चहापत्तीमध्ये कोणतीही भेसळ नसेल तर पोर्सलीनच्या फरशीवर शिंपडल्यानंतर हिरवा रंग दिसेल. जो क्लोरोफील या हरितद्रव्यामुळे प्राप्त झालेला असतो.

बऱ्याच वेळा चहापावडरमध्ये लोहाचे किंवा लोखंडाचे बारीक तुकडे आढळून येतात. अशा भेसळयुक्त चहापावडरवर लोहचुंबक फिरवल्यास लोखंडाचे तुकडे त्याकडे आकर्षित होतील. ते वेगळे करावेत.

पानसुपारी मसाला

 पानसुपारी मसाल्यामध्ये सॅकरीन हा एक कृत्रिम गोडवा आणणारा पदार्थ आहे. हा पदार्थ साखरेपेक्षा साधारण ५५० पट गोड असतो. या पदार्थाची भेसळ पानसुपारी मसाल्यात केली असल्यास पानसुपारीची मसाल्याची चव खूप प्रकर्षाने जाणवते. काही वेळा थोडी रेंगाळल्यासारखी वाटून शेवटी कडवट चव लागते.

पानसुपारी मसाल्यामुळे रंगाचा वापर केला जातो. भेसळ ओळखण्यासाठी पाण्यामध्ये पानसुपारी मसाला टाकून घ्यावा.

पाण्यामध्ये मिसळल्यानंतर तो रंग पाण्यामध्ये विरघळून त्याच्या छटा दिसून येतात.

व्हिनेगार

व्हिनेगारमध्ये मिनरल ॲसिडची भेसळ केली जाते.

पद्धत

भेसळ ओळखण्यासाठी मिथॅनील यलो इंडिकेटर पेपरचा वापर करावा. व्हिनेगारचे थेंब टाकल्यानंतर पेपरचा रंग पिवळा ते गुलाबी झाल्यास त्यात भेसळ आहे असे समजावे.

जिरे

जिऱ्यामध्ये कोळशाने रंगविलेल्या गवतबियांची भेसळ केली जाते.

पद्धत

 तळहातावर थोडेसे जिरे घेऊन चोळावे. जर हाताला काळा रंग हाताला लागल्यास असे जिरे भेसळयुक्त असते.

हिरव्या भाज्या (हिरवे ओले

वाटाणे किंवा हिरवी मिरची)

हिरव्या भाज्या जसे हिरवे ओले वाटाणे किंवा हिरवी मिरची यांना हिरवागार रंग येण्यासाठी हिरव्या रंगाचा वापर केला जातो.

पद्धत

 एका पाण्याने भरलेल्या ग्लासमध्ये हिरवे ओले वाटाणे टाकून ते अर्धा तास ठेवून द्यावे. जर वाटाण्याला रंग लावला असेल तर तो पूर्णपणे वेगळा झालेला दिसेल.

 हिरव्या मिरचीचा वरील भाग एका सुती कापडाने पुसून घ्यावा. जर कापडावर हिरवा रंग आढळल्यास त्या मिरच्या भेसळयुक्त आहेत, असे समजावे.

- करिश्‍मा कांबळे, ८४५९३७४६८४,

(अन्न तंत्रज्ञान विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com