इफ्फकोचं ५ कोटी नॅनो युरिया बाटल्यांच्या उत्पादनाचं लक्ष्य

चालू आर्थिक वर्षात इफ्फकोने पाच कोटी नॅनो युरिया बाटल्यांचे उत्पादन करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
IFFCO Nano Urea Production
IFFCO Nano Urea Production Agrowon

चालू आर्थिक वर्षात इफ्फकोने पाच कोटी नॅनो युरिया बाटल्यांचे उत्पादन (Five Crore Nano Urea Bottle Production) करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये लिक्विड स्वरुपातील नॅनो युरिया लाँच केल्यानंतर याचा सुमारे ८० टक्के वापराची नोंद झाली आहे. बिझनेस लाईनने बातमी दिली आहे.

IFFCO Nano Urea Production
fertilizer news: युरिया उत्पादन वाढीसाठी सरकारचा पुढाकार

याबाबत माहिती देताना इफ्फोचे व्यवस्थापकीय संचालक यु. एस. अवस्थी (U.S. Awasthy) म्हणाले की, गेल्या वर्षात आम्ही नॅनो युरियाच्या (Nano Urea) २.९ कोटी बाटल्यांचे उत्पादन करू शकलो. ज्या ४५ किलो बॅगमध्ये उपल्बध असलेल्या पारंपरिक युरियाच्या (Traditional Urea) १३.०५ लाख टन समप्रमाणात आहेत. नॅनो युरियाचे पूर्ण क्षमतेने उत्पादन (Nano Urea Production) केले आणि शेतकऱ्यांनी याचा पूर्ण क्षमतेने वापर केला, तर देशाच्या एकूण युरिया आयातीमध्ये (Import Of Urea) २२.५ लाख टनांची बचत करता येणे शक्य आहे, असेही अवस्थी म्हणाले.

IFFCO Nano Urea Production
अन्नद्रव्य व्यवस्थापनासाठी नॅनो युरिया

भारताने २०२०-२१ मध्ये ९८.३ लाख टन युरियाची आयात केली होती. गेल्या आर्थिक वर्षात एप्रिल ते फेब्रूवारी दरम्यान ८१ लाख टनांची आयात झाल्याचे उद्योगातील सुत्रांनी सांगितले आहे. तर गेल्या वर्षात देशात नॅनो युरिया वगळता एकूण वापर ३४२ लाख टन होता.

पुढील दोन वर्षात सातही प्रकल्प सुरळीतपणे सुरू होतील, तेव्हा प्रतिवर्षी नॅनो युरियाचे उत्पादन ४४ कोटी बाटल्यांपर्यंत वाढविण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. ज्याचे प्रमाण पारंपारिक युरियाच्या तुलनेत १९८ लाख टन इतके आहे. याचा वापर स्प्रेयरच्या सहाय्याने करता येत असल्याने हे मातीच्या आरोग्यासाठीही चांगले आहे. सुदैवाने ड्रोन तंत्रज्ञान येत असल्याने शेतकऱ्यांकडून याचा वापर वाढण्याची शक्यता आहे. परंतु याच्या परिणामाबाबत अनेक शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता असल्याने ते एक हंगाम वाट पाहण्याची शक्यता आहे, असे माजी कृषी आयुक्तांनी सांगितले.

दरम्यान, गेल्या वर्षाच नॅनो युरियाचे उत्पादन २.९ कोटी बाटल्या असले तरी, ऑगस्ट ते मार्च (२०२१-२२) या कालावधित इफ्फकोने केवळ २.१५ कोटी बाटल्यांची विक्री केली आहे. गेल्या वर्षी इफ्फकोने ४३.६१ लाख टन युरिया, २६.८७ लाख टन डीएपी आणि ४३.४२ लाख टन संयुक्त खतांचे उत्पादन केले होते.

उपलब्धता वाढवण्यासाठी येत्या दोन वर्षात देशभरात पाच अतिरिक्त निर्मिती केंद्र उभारण्याचा इफ्फकोचा मानस आहे. याशिवाय नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड (National Fertilizers Limited) (एनएफएल) आणि राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स (National Chemicals And Fertilizers) (आरसीएफ) यांनी त्यांचे नॅनो युरिया प्रकल्प जुलै २०२४ पर्यंत कार्यान्वित करण्याची योजना आखली आहे. जगात पहिल्यांदा इफ्फकोने नॅनो युरिया विकसित केल्यानंतर सरकारने फेब्रुवारी २०२१ मध्ये त्याचा वापराला परवानगी दिली होती.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com