बारामती सायन्स अँड इनोव्हेशन ॲक्टिव्हिटी सेंटरचे उद्या उद्घाटन

‘‘विद्यार्थ्यांमधील नवकल्पना विकसित करणे व त्यांच्यात संशोधनात्मक मानसिकता तयार करण्यासाठी अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती या संस्थेने ‘सायन्स अॅन्ड इनोव्हेशन अॅक्टिव्हिटी सेंटर’ची नव्याने उभारणी केली.
बारामती सायन्स अँड इनोव्हेशन ॲक्टिव्हिटी सेंटरचे उद्या उद्घाटन
BaramatiAgrowon

माळेगाव ः ‘‘विद्यार्थ्यांमधील नवकल्पना विकसित करणे व त्यांच्यात संशोधनात्मक मानसिकता तयार करण्यासाठी अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती या संस्थेने ‘सायन्स अॅन्ड इनोव्हेशन अॅक्टिव्हिटी सेंटर’ची नव्याने उभारणी केली. हा महत्वकांक्षी प्रकल्प उभारण्यासाठी राजीव गांधी सायन्स टेक्नॉलॉजी कमिशन (महाराष्ट्र शासन ) आणि टाटा ट्रस्टने मोलाचे सहकार्य केले. त्यानुसार उद्या (ता.१६) या प्रकल्पाचे उद्घाटन शास्त्रज्ञ अनिल काकोडकर, प्रसिद्ध उद्योजक गौतम अदानी यांच्या हस्ते होईल. ट्रस्टचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे आदी या वेळी उपस्थित राहतील,’’ अशी माहिती अॅग्रिकल्चरल ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार यांनी दिली.

पवार म्हणाले, ‘‘राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाचेही आयोजन केले आहे. शारदानगर येथे आयोजित विज्ञान प्रदर्शन १५ ते १७ जून दरम्यान घेण्यात येईल.’’

‘‘मागील ३ वर्षांपासून राज्य व राष्ट्रीय स्तरावरील इन्स्पायर ॲवॉर्डसाठी निवड झालेले प्रकल्प, यावर्षी जिल्हा स्तरावर निवड झालेले प्रकल्प, कोठेही निवड न झालेले मात्र नवीन क्रिएटिव्ह मॉडेल तयार आहेत, अशा राज्यातील शाळांतील सर्व प्रकारच्या माध्यमाच्या शाळांमधील इयत्ता पाचवी ते १२ वीचे विद्यार्थी प्रदर्शनात सहभागी होतील. इयत्ता ५ वी ते ८ वी आणि इयत्ता ९ वी ते १२ वी असे तीन गट करण्यात आले आहेत. आजवर अडीचशे पेक्षा अधिक प्रकल्पांची नोंदणी झाली आहे.

या शिवाय तज्ज्ञ व्यक्तींचे ‘फन सायन्स शो’, जादूचे प्रयोग, विज्ञान कार्यशाळा, स्टॅंड अप कॉमेडी अशा विविध कार्यक्रमांची रेलचेल मुलांना पहावयास मिळेल,’’ अशी अशी माहिती ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश नलावडे, सायन्स सेंटरच्या व्यवस्थापक हीना भाटिया यांनी दिली.

सायन्स सेंटरला नामांकित संस्थांचे सहकार्य
‘सायन्स अॅन्ड इनोव्हेशन अॅक्टिव्हिटी सेंटरला राज्यात विज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक नामवंत संस्था आणि तज्ञांनी मार्गदर्शन केले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने नेहरू सायन्स सेंटर (मुंबर्ई), होमी भाभा विज्ञान केंद्र (मुंबई), अगस्त्या इंटरनॅशनल-कुप्पम, मुक्तांगण एक्सप्लोरेटरी (पुणे), कॅडमॅक्स-नाशिक आदी संस्थांचा समावेश आहे.

आधुनिक तंत्रज्ञान अनुभवण्यास मिळणार
सायन्स सेंटरमध्ये उपलब्ध ‘फन सायन्स गॅलरी, अॅग्रिकल्चर गॅलरी, ३ डी थिएटर, इनोव्हेशन हब, व्हर्चुअल रियालिटी, ऑगमेंटेड रियालिटी यासारखे तंत्रज्ञान पळायला व अनुभवायला मिळेल. जपान, कोरिया, चीन या देशांमध्ये स्वदेशी तंत्रज्ञानाधिष्टीत शिक्षण व्यवस्था आहे. त्यामुळे तेथील तरुण संशोधक अॅटोमोबाईल, टेलिकॉम, होम अॅप्लायन्सेस या क्षेत्रात उत्तरोत्तर भरीव प्रगती करीत आहेत. याच विचारातून कोडिंग, डेटा सायन्स, डिजिटल मार्केटिंग, डिझाईन थिंकिंग या तंत्रज्ञानाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण बारामती सायन्स सेंटरमध्ये मिळेल.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com