नियमित देखभालीतून वाढवा ट्रॅक्टरची कार्यक्षमता

कृषी यांत्रिकीकरणामध्ये ट्रॅक्टर अत्यंत मोलाची भूमिका बजावतो. मशागतीपासून काढणीपर्यंतची कामे त्यावर करता येतात.
Agriculture Tractor
Agriculture TractorAgrowon

कृषी यांत्रिकीकरणामध्ये (Agriculture Technology) ट्रॅक्टर अत्यंत मोलाची भूमिका बजावतो. मशागतीपासून काढणीपर्यंतची (Cultivation To Harvesting) कामे त्यावर करता येतात. मोठे भांडवल गुंतवून घेतलेल्या ट्रॅक्टरची देखभालही (Tractor Maintenance) व्यवस्थित आणि वेळच्या वेळी करण्याची गरज असते. त्यासाठी ट्रॅक्टरसोबत मिळालेल्या माहितीपत्रक (मॅन्युअल) उपयोगी ठरते. यातून ट्रॅक्टरची कार्यक्षमता आणि आयुष्य वाढते. (Agriculture Tractor)

दररोजची देखभाल किंवा दर १० तासानंतरची देखभाल ः

१. ऑइल पंपामधील ऑइल लेव्हल तपासणे.

२. एअर क्लिनरमधील ऑइल तपासणे.

३. रेडीएटर मधील पाण्याची लेव्हल चेकर करणे.

४. एअर क्लिनरचे प्रीक्लिनर साफ करणे.

५. डिझेल टँकमधील डिझेलची लेव्हल तपासणे.

६. बॅटरीमधील इलेक्ट्रोलाईटची लेव्हल तपासणे.

७. टायरमधील हवा तपासणे.

८. फॅन बेल्टचा तणाव तपासणे.

साप्ताहिक देखभाल किंवा दर ५० तासानंतरची देखभाल ः

१. दर १० तासानंतरची देखभाल पूर्ण करणे.

२. क्लच पॅडलचा फ्री प्ले तपासणे.

३. सेडीमेंड बाउल तपासणे.

४. फ्युएल फिल्टर बाउल ड्रेन करणे.

५. ट्रान्समिशन व हायड्रोलीकचे ऑइल तपासणे.

६. एअर क्लिनरचे ऑइल बदलणे.

७. बॅटरी टर्मिनल्स तपासणे.

८. सर्व नट बोल्ट टाईट करणे.

९. सर्व ग्रीस पॉइंटना ग्रीस करणे.

मासिक देखभाल किंवा दर १५० तासानंतरची देखभाल ः

१. दर ५० तासानंतरची देखभाल पूर्ण करणे.

२. इंजिन ऑइल व ऑइल फिल्टर बदलणे.

३. डायनॅमो मध्ये ८ ते १० थेंब ऑइल टाकणे.

४. बॅटरी टर्मिनल्सना पेट्रोलियम जेली लावणे.

त्रैमासिक देखभाल किंवा ३०० तासानंतरची देखभाल ः

१. दर १५० तासानंतरची देखभाल पूर्ण करणे.

२. स्टिअरिंग शाफ्ट अॅन्ड प्ले तपासणे.

३. पुढील चाकाचे टो इन तपासणे व अॅडजस्ट करणे.

४. समोरच्या चाकाचे प्री लोडिंग तपासणे.

५. टॅपेट क्लिअरन्स सेट करणे.

सहा महिन्यांनी देखभाल किंवा ६०० तासानंतरची देखभाल ः

१. दर ३०० तासानंतरची देखभाल पूर्ण करणे.

२. प्रायमरी डिझेल फिल्टर एलिमेंट बदलणे.

३. कुलिंग सिस्टीम फ्लश करणे.

४. समोरचे टायर अदला बदल करणे.

५. इंजेक्शन प्रेशर तपासणे.

६. डिझेल टँक साफ करणे.

नऊ महिन्यानंतरची देखभाल किंवा ९०० तासानंतरची देखभाल ः

१. दर ६०० तासानंतरची देखभाल पूर्ण करणे.

२. स्टिअरिंग गियर बॉक्स ऑइल बदलणे.

३. सेकंडरी डिझेल फिल्टर एलिमेंट बदलणे.

एक वर्षानंतरची देखभाल किंवा १००० तासानंतरची देखभाल ः

१. सर्व प्रकारचे ऑइल बदलणे. उदा. इंजिन ऑइल, गिअर बॉक्स, हायड्रोलिक, एअर क्लीनर आणि स्टिअरिंग इत्यादी.

२. फ्युएल इंजेक्शन पंप तपासणे.

३. कॉम्प्रेशन प्रेशर तपासणे. आवश्यक असेल तर इंजिन ओव्हरहॉलिंग करणे.

४. ब्रेक लायनिंग तपासणे.

ट्रॅक विड्थ अॅडजस्टमेंट :

क्र. --- ट्रॅक विड्थ --- बोल्ट ४ इंच --- रिम ८ इंच --- डिस्क १६ इंच

०१ --- ४८ --- मध्ये --- मध्ये --- सरळ

०२ --- ५२ --- बाहेर --- मध्ये --- सरळ०३ --- ५६ --- मध्ये --- बाहेर --- सरळ

०४ --- ६० --- बाहेर --- बाहेर --- सरळ

०५ --- ६४ --- मध्ये --- मध्ये --- उलटी

०६ --- ६८ --- बाहेर --- मध्ये --- उलटी

०७ --- ७२ --- मध्ये --- बाहेर --- उलटी

०८ --- ७६ --- बाहेर --- बाहेर --- उलटी

ट्रॅक्टर दुरुस्ती

वरील नियोजनाप्रमाणे ट्रॅक्टरची सर्व निगा व देखभाल केल्यास हंगामामध्ये ट्रॅक्टर विनातक्रार काम करू शकतो. मात्र ट्रॅक्टरचा सातत्याने होणारा वापर आणि वेगेवेगळ्या भागांची होणारी झीज यामुळे सिलींडर लायनर, कनेक्टिंग रॉड बेअरिंग्ज, मेन बेअरींग्ज व पिस्टन रिंग इ. बदलावे लागू शकतात. क्रँक शाफ्ट ग्रायंडींग करून घ्यावा लागतो. तसेच व्हॉल्व व हॉल्व सीटसुद्धा बदलावे लागतात. ट्रॅक्टरचा कोणता भाग कधी बदलायचा यासाठी काही ठोस असा नियम नाही. हे सर्व होणाऱ्या घर्षण आणि कामांवर अवलंबून असू शकते.

१) सर्वसामान्य ट्रॅक्टरच्या कार्याचा विचार करता एकूण ४००० तास काम केल्यानंतर इंजिनच्या कॉम्प्रेशनमध्ये घसारा येतो. पूर्ण शक्ती तयार करण्यामध्ये इंजिन अपयशी ठरते. तसेच सिलिंडर लायनर व पिस्टन रिंग्ज बदलाव्या लागतात, व्हॉल्व व हॉल्व सीट रीफेस करून घ्यावे लागते. याशिवाय ऑइल सील, रेडीएटर होस पाइप तसेच बुशिंगसुद्धा गरजेप्रमाणे बदलावे लागतात. तसेच कोटिंग रॉडच्या बेरींगमधील क्लिअरन्स (फट) तपासून ठिक करावी लागते.

२) साधारणतः: ट्रॅक्टरच्या कामाचे ८००० तास पूर्ण झाल्यानंतर क्रँकशाफ्ट व कॅमशाफ्ट ग्राईंड करावे लागतात. त्या वेळी कमी मापाचे बेअरिंग वापरावे लागतात. शक्यतो दुसऱ्या ओव्हरहॉलिंगच्या वेळी पिस्टन व सिलिंडर लायनर बदलावेत. इंजिन ओव्हरहॉल्व करताना पिस्टनच्या डोक्यावरील, रिंगवरील, खाचामधील तसेच व्हॉल्व व व्हॉल्व दांडीवरील कार्बन व काळी चिकट तेलकट घाण स्वच्छ करावी. सर्व भाग केरोसीनमध्ये स्वच्छ धुवून काढावेत. इंजिन हेड जोडताना नवीन गॅस्केटचा वापर करावा. सिलिंडर गॅस्केटमध्ये गळती राहिल्यास तयार होणाऱ्या शक्तीचा अपव्यय होतो. किंवा सिलिंडरमध्ये पाणी घुसण्याची किंवा दोन्हींची शक्यता वाढते.

३) बहुतांश वेळी ट्रॅक्टरची दुरुस्ती ही अचानक होणाऱ्या मोडतोडीमुळे करावी लागते. कामांच्या धांदलीमध्ये होणारी मोडतोड थांबविण्यासाठी हंगामाला सुरुवात होण्यापूर्वीच्या रिकाम्या काळात ट्रॅक्टरची दुरुस्ती करावी. एखादा भाग प्रमाणाबाहेर खराब होईपर्यंत दुरुस्ती लांबविल्यास खर्चात अधिक वाढ होते. हंगामापूर्वीच महत्त्वाच्या सुट्या भागांची उपलब्धता आहे की नाही, याची चाचपणी करावी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com