Integrated Farming : ‘झूम’ शेतीऐवजी एकात्मिक शेती ठरतेय अधिक फायदेशीर

मिझोराम येथील आदिवासी शेतकरी लुसेई टेकड्यांच्या चढ-उताराच्या जमिनीमध्ये पारंपरिक झूम शेती करतात.
Indian Agricultural
Indian AgriculturalAgrowon

Agricultural : मिझोराम येथील लुसेई आदिवासींना पारंपरिक ‘झूम’ शेतीकडून (Zoom Farming) पर्यावरणपूरक एकात्मिक शेती (Eco-Friendly Farming) पद्धतीकडे वळविण्याचा प्रयत्न शासकीय पातळीवर केला जात आहे. त्यानिमित्त भात आधारित खास एकात्मिक शेती पद्धती (Integrated farming practices ) प्रारूप विकसित करण्यात आले आहे.

ते दोन स्थानिक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाच वर्षांसाठी प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात आले. त्यात चांगलेच आर्थिक यश मिळाल्यामुळे अन्य शेतकऱ्यांमध्ये प्रसाराचा मार्ग खुला झाला आहे.

मिझोराम येथील आदिवासी शेतकरी लुसेई टेकड्यांच्या चढ-उताराच्या जमिनीमध्ये पारंपरिक झूम शेती करतात. झूम शेतीमध्ये जंगलातील थोडीशी जमीन रिकामी करून त्यामध्ये एक किंवा दोन वर्षांसाठी शेती केली जाते. त्यानंतर पुढील वर्षी पुन्हा जागा बदलली जाते.

ही शेती पद्धती मिझोराम येथील ग्रामीण व शेतकऱ्यांच्या अर्थव्यवस्थेचा कणाच मानली जाते. मुळात पारंपरिक पद्धतीमध्ये झूम शेतांचा क्रम २५ वर्षातून एकदा असा होता. तो आता वाढलेली लोकसंख्येमुळे पाच ते सहा वर्षे इतका कमी झाला आहे.

त्यामुळे या जंगलातील झाडांच्या वाढीसाठी आवश्यक तितका कालावधी मिळेनासा झाला आहे. पर्यायाने पर्यावरण आणि जैवविविधतेचा मोठा ऱ्हास होत आहे. जमिनीची सुपीकता कमी होणे, नैसर्गिक स्रोतांचा ऱ्हास होणे आणि पिकांची उत्पादकता कमी होणे अशा समस्या उद्‍भवत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना या पद्धतीपासून दूर करण्यासाठी शासकीय पातळीवर प्रयत्न केले जात आहेत.

Indian Agricultural
Indian Agriculture : शेतकरी कीर्तन महोत्सवाच्या पंगतीसाठी गावोगावच्या भाकरी

मिझो शेतकऱ्यांमध्ये एकात्मिक शेती पद्धती (IFS) रुजविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्याचे भात पिकावर आधारित प्रारूप भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या कोलासीब (मिझोराम) येथील ईशान्य पर्वतीय प्रदेशासाठी संशोधन केंद्राने (ICAR Research Complex for NEH Region) तयार केले आहे.

त्यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. लालसंगखिमा आणि सौ. लालह्मिंगमवई या शेतकऱ्यांनी एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब केला. या पद्धतीमध्ये पशुपालनाचाही अंतर्भाव असतो. त्यानुसार या शेती पद्धतीचे प्रारूप आणि माहिती तक्ता १ मध्ये दिली आहे.

एकात्मिक शेती पद्धतीचे घटक आणि त्यासाठी वापरलेले क्षेत्र.

शेतकरी नाव --- स्थान --- ०० --- हंगामी पिकांचा क्रम (हेक्टरी क्षेत्रफळासह) --- ०० --- पशुपालन (हेक्टर) --- पिके/ वनशेती पद्धती (हेक्टर) --- मत्स्यपालन (हेक्टर) --- पीक अवशेषांचे पुनर्चक्रीकरण (हेक्टर)

श्री. लालसंगखिमा --- फाईफेंग, कोलासीब (काही सपाट जमिनीसह चढ उताराची प्रकार ३ ची शेती --- भेंडी ( अर्का अनामिका) ३.२ हे. --- भात (गोमती) ४.२ हे. --- वांगी (पुसा अनुपम), कोबी (रेअर बॉल), मोहरी पालेभाजीसाठी (पुसा साग१), ब्रोकोली (केटीएस १) १.८ हे. --- संकरित वराह (५ मादी, १ नर) आणि कोंबड्या (वनराजा) (६० नग) ०.१० हे. --- तेलताड हळद (आरसीटी १) आंतरपिकासह ३.४१ हे. --- कॉमन कार्प आणि ग्रास कार्प, १.२ हे --- एरोबिक कंपोस्टिंग ०.०१२ हे.

सौ. लालह्मिंगमवई --- क्वानपुई, कोलासीब (तीव्र उताराची जमीन प्रकार ४ --- स्वीट कॉर्न, १.८ हे. --- भात (गोमती) ३.५ हे --- विनामशागत तंत्रज्ञान पालेभाजीसाठी मोहरी (पुसा साग १), स्वीट कॉर्न अधिक फ्रेंच बीन, १.२ हे. --- होलस्टिन फ्रिजियन (पाच गायी, १ बैल), कोंबड्या (वनराजा) ५० पक्षी, ०.६० हे. --- सुपारी आणि केळी, ३.६० हे. --- कॉमन कार्प, ग्रास कार्प, २.१ हे. --- एरोबिक कंपोस्टिंग, ०.०१० हेक्टर, गांडूळ खत ०.०१ हे.)

-२०१६ पर्यंत हे दोन्ही शेतकरी कोरडवाहू झूम शेती पद्धतीसोबत हिवाळ्यामध्ये भाज्यांची काही प्रमाणात परसबाग करत असत.

-त्यांना २०१६-१७ ते २०२०-२१ या काळात दर काही टप्प्याने कॉमन कार्प, ग्रास कार्प माशांची बोटुकली पुरवण्यात आली.

- असलेल्या तळ्यांचे नूतनीकरण, नवे २० हजार लिटर क्षमतेचे जलकुंड या सोबतच सिंचनासाठी एचडीपीई पाइपलाइन व सिंचन सुविधा तयार करण्यात आल्या.

- उताराच्या जमिनीच्या स्थिरतेसाठी, मातीची धूप रोखण्यासाठी स्थानिक गवतांच्या प्रजाती उदा. ब्रुम ग्रास, कोंगो सिग्नल, हायब्रीड नेपिअर, गिन्नी गवत लावण्यात आल्या. त्यातून वर्षभर चाऱ्याची उपलब्धता होईल, याचे नियोजन केले.

- एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब केल्यानंतर शेतकऱ्यांच्या भात उत्पादनामध्ये वाढ झाली. श्री. लालसांगखिमा (४२४.४ टन/ हे विरुद्ध ५९.९ टन/ हे. पूर्वीचे) सौ. लालह्मिंगमवई (४३५.७ टन/हे विरुद्ध ७७.८ टन/हे पूर्वीचे).

- शेतीतील पिकांचे अवशेष आणि अन्य टाकाऊ घटकांचे एरोबीक पद्धतीने किंवा गांडूळ खत निर्मितीमधून पुनर्चक्रीकरण करण्यात आले. त्यामुळे उपलब्ध झालेल्या कंपोस्ट खत व गांडूळ खतांचा वापर (२५.९८ टक्के) प्रमाणात केला. त्यासोबत पूरक म्हणून रासायनिक खतांचा ७४.०२ टक्के) वापर केला.

- पशुपक्षिपालनासाठी पारंपरिकरीत्या शेतातच उपलब्ध होणाऱ्या घटकांचा प्राधान्याने वापर करण्यात आला. त्याला जोड म्हणून खनिज मिश्रण आणि अन्य पूरक पौष्टिक खाद्ये देण्यात आली.

- पाच वर्षे शास्त्रज्ञांच्या निरीक्षणाखाली एकात्मिक शेती पद्धतीचे एकत्रित नफा - खर्च गुणोत्तर काढण्यात आले. त्यानुसार लालसंगखिमा यांच्या नफा खर्च गुणोत्तर ०.९३ वरून ३.२० इतके वाढले. त्यांच्या शेतीमध्ये रोजगाराची उपलब्धता ३०४ मानवी दिवसापासून वाढून ३४०४ दिवस इतकी झाली.

सौ. लालह्मिंगमवई यांचे नफा ः खर्च गुणोत्तर १.२२ वरून ३.६५ इतके वाढले. त्यांच्या शेतीमध्ये रोजगाराची उपलब्धता ४५० मानवी दिवसापासून वाढून ३६०० मानवी दिवस इतके झाले.

- शेतीमध्ये पशू, पक्षिपालन (वराह, गाय, पोल्ट्री आणि फिशरी) यांचा समावेश केल्याने २०१७ ते २०२० या काळात शेतकऱ्यांच्या उत्पन्नांमध्ये लक्षणीय वाढ झाली.

- एकत्रित जमीन वापराचा निर्देशांक (Cumulative Land Utilization Index -CLUI) हा १.४ पटीने वाढला. कमी कालावधीची अधिक उत्पादनक्षम अशा पिकांच्या सुधारित जातींची मोठ्या प्रमाणात लागवड केल्यामुळे ही वाढ झाली. संरक्षित सिंचनासाठी तळे आणि जलकुंड अत्यंत उपयोगी ठरली.

Indian Agricultural
Indian Agriculture : आनंद भरला आपल्या घरी...

एकात्मिक शेती पद्धतीचे अर्थशास्त्र

निकष --- ०० --- श्री. लालसंगखिमा --- ०० --- सौ. लालह्मिंगमवई

०० --- आयएफएसपूर्वी --- आयएफएस नंतर --- आयएफएसपूर्वी --- आयएफएस नंतर

भात उत्पादन (टन प्रति हे.) --- ५९.९ --- ४२४.४ --- ७७.८ --- ४३५.७

उत्पादन खर्च (हजार रु. प्रति हे.) --- १२४.२४ --- ४०४.२६ --- १४०.२४ --- ३७४.९८

निव्वळ फायदा (हजार रुपये प्रति हेक्टर) --- ११५.३६ --- १२९३.३४ --- १७१.०८ --- १३६७.९२

नफा ः खर्चाचे गुणोत्तर --- ०.९३ --- ३.२० --- १.२२ --- ३.६५

रोजगार उपलब्धता (मानवी दिवस) --- ३०४ --- ३४०४ --- ४५० --- ३६००

CLUI (%) --- ३८.५१ --- ९४.५ --- ४१.०२ --- ९८.७

वाचलेल्या निविष्ठा (%) --- ० --- ६१.०३ --- ० --- ६९.०

परिणाम ः

१) सौ. लालह्मिंगमवई या पारंपरिक झूम पद्धतीच्या शेतीतून सुपारी आणि केळीसारख्या फळबागेमध्ये चांगल्या प्रकारे स्थिरावल्या आहेत. ईशान्य पर्वतीय प्रदेशासाठी संशोधन केंद्राने राबवलेल्या टीएसपी प्रकल्पामध्ये तीव्र उताराच्या जमिनीमध्ये टप्प्याटप्प्यांची शेती सिंचन व्यवस्थेसह विकसित केली आहे.

पूर्वी त्यांच्याकडे पिकांचे फारच मर्यादित पर्याय उपलब्ध असत. त्या तुलनेमध्ये आता फळबाग, हिवाळी भाजीपाला यांची लागवड वाढवली आहे. २०१६ पूर्वी त्यांच्या केवळ पावसावर अवलंबून अशी भाताची लागवड (१७० ते १८० दिवस) केली जाई. त्यानंतर भाताचे अवशेष जाळून पुढील लागवड करेपर्यंत डिसेंबर महिना उजाडलेला असे.

त्या नंतर स्थानिक पालेभाज्यांची लागवड केली जाई. नव्या लागवड पद्धतीमध्ये जुन्या अधिक कालावधीच्या भातजातीऐवजी नव्या जातींचा (गोमती, १३० दिवस कालावधी) समावेश करण्यात आला. त्यामुळे साधारण ऑक्टोबर अखेरपर्यंत शेत पुढील पिकांसाठी रिकामे होते.

पूर्वी त्यांचा हिवाळा बऱ्यापैकी खाली जायचा, त्या काळात त्यांच्याकडे भाजीपाला पिके होत आहेत. नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळामध्ये भाज्या घेतल्यानंतर उन्हाळ्यामध्ये संकरित स्वीट कॉर्न घेता येते.

२) एकात्मिक शेती पद्धतीमध्ये हिवाळ्यामध्ये क्रुसिफायर, टोमॅटो, वांगी अशा भाज्या घेता येतात. त्यानंतर उन्हाळ्यामध्ये चवळी किंवा भेंडी अशी पिके घेता येतात. यामुळे पूर्वीच्या तुलनेमध्ये ३०० टक्के अधिक पीक घनता उपलब्ध होते.

३) पशुपालनामध्येही सुधारित जातींचा उदा. हॅम्पशायर संकरित वराह जात, परसबागेतील कोंबडी जात वनराजा इ. अंतर्भाव करण्यात आला. त्यामुळे त्याची उत्पादकता स्थिरपणे वाढण्यास मदत झाली.

४) मिझोराम राज्यातील कोलासीब जिल्ह्यातील अन्य शेतकऱ्यांमध्ये या एकात्मिक शेती पद्धतीचा प्रसार केला जात आहे. या प्रसारामध्ये आदर्श शेतकरी म्हणून दोघेही अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. त्यांच्या उत्पन्नामध्ये झालेली वाढ ही इतकी सुस्पष्ट आहे, की अन्य लुसेई आदिवासी शेतकरीही या नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार वेगाने करू लागले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com