Cotton : ‘माफसू’ने विकसित केले पऱ्हाटीपासून पोषक पशुखाद्य निर्मितीचे तंत्र

बहुतांश शेतकऱ्यांचा कल कापूस वेचणीनंतर (Cotton Harvesting) शिल्लक राहिलेल्या पऱ्हाटी (Cotton Stalk) जाळण्याकडे असतो. या पऱ्हाटीपासून आता पोषक पशुखाद्य (Animal Feed From Cotton Stalk) तयार करण्याचे तंत्र महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाने (माफसू) विकसित केले आहे. या पऱ्हाटीमध्ये पोषक खुराकाचे मिश्रण करून यंत्राद्वारे कांडीखाद्यामध्ये रूपांतर केले जाते. त्यामुळे व्यावसायिक पशूपालनातील खर्चात मोठी बचत होऊ शकेल.
Cotton
Cotton Agrowon

स्वच्छतेसाठी आग्रही असलेल्या शेळ्या (Goat) माती व शेण लागलेले खाद्य कधीही खात नाही. घाणीमध्ये पडलेला चाराही त्या खात नाहीत. त्याऐवजी झाडावरील ताजी हिरवीगार पाने खाणे त्यांना आवडते. काही विशिष्ट प्रकारच्या झाडांचा पाल्याला शेळ्या प्राधान्य देतात. उदा. बाभळी इ. अलीकडे गाव परिसरातील गायराने, चराऊ कुरणे कमी होत चालली आहेत. परिणामी, शेळ्यांसाठी पारंपरिक खाद्याची उपलब्धताही कमी होत आहे. त्याचा परिणाम त्यांच्या वजन वाढीवर परिणाम होतो. तसेच शेळीपालन (Goat Farming) व्यवसायातील उत्पादन खर्चात वाढ होत आहे. त्यासाठी महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाने शेळ्यांसाठी कपाशी पऱ्हाटीच्या माध्यमातून स्वस्त आणि पोषक अशा खाद्यान्नाचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. (Animal Feed From Cotton Stalk)

त्यात कपाशीची झाडे (पऱ्हाटी) मध्ये ढेप, मका, चुनी, चोकर, खनिज मिश्रण यांचा समावेशयुक्त पोषक मिश्रण एकत्र केले जाते. त्यापासून संयंत्राच्या वापरातून कांडी खाद्य तयार केली जाते. हे कांडीखाद्य शेळ्या अत्यंत चवीने खात असल्याचे पुढे आले आहे. तसेच हा पर्याय शेळ्यांसाठी पोषकही ठरत असून, गावरान शेळ्यांचे वजन ९ महिन्यात ३० किलोपर्यंत वाढत असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.

Cotton
Azolla : जनावरांसाठी पूरक पशुखाद्य : ॲझोला

पऱ्हाटीवर ओझोन प्रक्रिया

कपाशीच्या झाडांमध्ये लिग्निनचे प्रमाण अधिक असून, त्याची पाचकता कमी असते. तसेच त्यातील पचनीय असे घटकही सेल्युलोज फायबरने बद्ध होऊन जातात. हे लिग्निनचे कठीण असे बंध तोडून, पचनीयता वाढविण्याच्या उद्देशाने भारतीय प्राद्योगिकी संस्थान, पवई (मुंबई) (आय.आय.टी., मुंबई) यांच्या सहकार्याने माफसू अंतर्गत नागपूर येथील पशुवैद्यक महाविद्यालयातील पशुपोषण आहार शास्त्र विभागामध्ये पऱ्हाटीवर ओझोन प्रक्रियेचे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. या प्रक्रियेसाठी हवेतील ऑक्सिजनचे रूपांतर ओझोनमध्ये करण्यासाठी ओझोन जनरेटरचा वापर केला जातो अथवा ओझोन सिलिंडरचा वापर केला जातो.

Cotton
Cotton : कापूस वेचणी यंत्राची चाचणी अंतिम टप्प्यात

हा ओझोन वायू भिजवलेल्या पऱ्हाटीमध्ये किमान तीन तास सोडला जातो. या प्रक्रियेसाठी प्रति किलो ५० पैसे इतका अल्प खर्च येतो. ग्रामीण पातळीवर पऱ्हाटी निःशुल्क किंवा अत्यंत अल्प दरात उपलब्ध होऊ शकते. अशा प्रकारे पचनीय बनवलेल्या पऱ्हाटीमध्ये अन्य पोषक खुराक मिसळला जातो. या मिश्रणापासून यंत्राद्वारे कांडी खाद्य तयार केले जाते.

संपूर्ण कांडी खाद्याचे फायदे -

-१०० किलो कांडी खाद्य तयार करण्यासाठी शेतातील पऱ्हाटी ६० किलो घेऊन, त्यात ४० किलो पोषक मिश्रण यंत्राच्या साह्याने चांगले मिसळून घेतले जाते. या मिश्रणाचे संयंत्राच्या साह्याने कांडी खाद्य तयार करता येते.

-या खाद्यावर होणारा खर्च प्रचलित खाद्याच्या तुलनेत किलोमागे किमान तीन ते चार रुपये कमी राहू शकतो.

- कांडीखाद्यामुळे चारा व खाद्य वाया जात नाही.

- दीर्घ काळ टिकवून ठेवता येत असल्यामुळे दीर्घकाळ वापर करणे शक्य.

- खाद्याची वाहतूकही सोयीची होईल.

-हे कांडी खाद्य अन्य दुधाळ जनावरांसाठी (उदा. गाई म्हशी इ.) वापर करून दूध उत्पादन किफायतशीर करता येईल.

हंगामाअखेर पुढील पिकांच्या लागवडीसाठी गडबड असल्यामुळे पऱ्हाटी जाळून टाकण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो. मात्र यामुळे सेंद्रिय पदार्थ मोठ्या प्रमाणात नष्ट होऊन, मातीच्या सुपीकतेवर परिणाम होतो. मात्र या पऱ्हाटीपासून पोषक कांडी खाद्य तयार केल्यास व्यावसायिक शेळी व पशुपालकांना त्याचा नक्कीच फायदा होणार आहे.
डॉ. अतुल ढोक, ९८२३१७६३५२ (संशोधक, महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com