Textile Production : केळीच्या खोडांपासून धाग्यांची निर्मिती; कापड, कागद उद्योगात वापर

केळी घड काढणीनंतर झाडाचे मोठ्या प्रमाणात अवशेष शिल्लक राहतात. केळी खोडापासून धागे तयार करता येतात. या धाग्यांचा वापर कागद निर्मिती, ऊर्जा निर्मिती, धागे निर्मिती तसेच जैवप्लास्टिक निर्मितीमध्ये करता येतो.
Paper production
Paper productionAgrowon

मनीषा जगदाळे, श्रीजा मजुमदार

केळीच्या खोडापासून चांगल्या प्रकारे धाग्यांची निर्मिती करता येते. केळी खोडापासून धागे तयार करण्यासाठी विविध पद्धती वापरतात. यामध्ये प्रामुख्याने खोड सडवून, रासायनिक प्रक्रियेचा अवलंब तसेच यंत्राचा वापर करून धागे काढता येतात.

खोड सडवून धागा काढणे आणि रासायनिक प्रक्रिया पद्धत वेळखाऊ आहे. यामध्ये उत्पादनाची गुणवत्ता फारशी चांगली राहात नाही. त्यापेक्षा धागे काढण्यासाठी यंत्राचा वापर केल्याने वेळ आणि खर्च वाचतो. धाग्याची गुणवत्ता, रंग आणि लांबी चांगली मिळते.

केळीच्या खोडापासून तयार केलेले धाग्यांचा वापर पारंपारिक हस्तकला आणि कापड तयार करण्यासाठी केला जातो. राष्ट्रीय नैसर्गिक धागे अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संस्थेने केळी खोडापासून धागा निर्मितीचे यंत्र विकसित केले आहे.

कापड निर्मिती :

केळीच्या धाग्यापासून कापड निर्मिती केली जाते. त्यासाठी संशोधन संस्थेने तंत्रज्ञान विकसित केले आहे.

केळी धाग्यापासून तयार केलेल्या कापडाची गुणवत्ता ही कापसापासून तयार केलेल्या कापडाइतकीच असते. केळी धाग्यापासून बनवलेल्या कापडाची लवचिक आणि कडकपणा थोडा जास्त असतो, परंतु सॉफ्टनर फिनिशिंग तंत्रज्ञानाचा वापर करून हा कडकपणा कमी करता येतो.

धाग्यांचा उपयोग :

केळी खोडापासून तयार केलेल्या धाग्यांचा वापर हस्तकला वस्तू, पिशव्या, उच्च-गुणवत्तेचे कापड, दोरी, पॉलिमर मॅट्रिक्समध्ये मजबुतीकरण साहित्य, बांधकाम साहित्य, माशांचे जाळे, कागदी पुठ्ठा, उशा, कुशन, गाद्या, पिशव्या, पाय पुसणी, योगा चटई, पडदे निर्मितीसाठी केला जातो.

Paper production
Banana Market : केळी दरात काहीशी नरमाई

केळी पानाच्या प्लेट :

१) अलीकडे पर्यावरणपूरक ( Environmentally friendly ) उपक्रमांच्या माध्यमातून केळी पानांचा वापर वाढत आहे.

२) आपल्याकडे परंपरेने केळीची पाने जेवण वाढण्यासाठी आणि वाफवलेले अन्न तयार करण्यासाठी करतात.

केळी पानाचे फायदे:

१) पानांमध्ये पॉलिफेनॉल, फ्लेव्होनॉइड्स आणि टॅनिन यांसारखी संयुगे असतात. यामध्ये अँटिऑक्सिडंट आणि दाहकता विरोधी गुणधर्म असतात. ही संयुगे रक्त शुद्ध करण्यास, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास आणि विविध आजारांपासून संरक्षण करण्यास उपयोगी आहेत.

२) केळी पानांमध्ये असलेले क्लोरोफिल हे पोट आणि आतड्यांवरील श्लेष्माच्या अस्तरासाठी उपयुक्त आहे. हे पचनास मदत करते. आतड्यांसंबंधी अल्सर टाळण्यासाठी उपयुक्त आहे.

३) जखमा, पुरळ आणि कीटक चावणे यासारख्या त्वचेच्या समस्यांवर उपचार करण्यासाठी केळीच्या पानांचा वापर करतात.

४) पानांमध्ये जंतुनाशक आणि दाहकविरोधी गुणधर्म असतात, जे त्वचा थंड ठेवतात.

५) केळीचे पान हे ते पॉलीफेनॉल, फ्लेव्होनॉइड्स, कार्बोहायड्रेट्ससह पोषक तत्त्वांचा समृद्ध स्रोत आहेत.

बिस्कीट निर्मिती :

१) केळी खोडाच्या गाभ्याचा वापर करून त्यापासून पावडर निर्मितीचे तंत्र विकसित झाले आहे. या पावडरपासून आरोग्यदायी बिस्किटांची निर्मिती करता येते.

२) केळी खोडाची साल काढून आतील गाभ्याचे बारीक तुकडे करावेत. हे तुकडे ड्रायरमध्ये ७० अंश सेल्सिअस तापमानामध्ये वाळवावेत. त्याची पावडर तयार करावी.

३) बिस्किटे तयार करण्यासाठी केळी गाभ्याची पावडर, मैदा, साखर आणि लोणी यांचा वापर केला जातो. बिस्कीट तयार करण्यासाठी मैदा पिठीसाखर सोबत चाळून ते चांगले मिसळावे. त्यामध्ये गाभ्याची पावडर, लोणी आणि बेकिंग पावडर यांचे मिश्रण तयार करावे.

या मिश्रणापासून योग्य आकाराची बिस्किटे तयार करावीत. बिस्किटे ओव्हनमध्ये १२० अंश सेल्सिअस तापमानात १५ ते २० मिनिटे ठेवावीत.त्यानंतर थंड करावीत.

Paper production
Banana Market : मृग बहर केळीखालील क्षेत्र खानदेशात स्थिर राहणार

पेपर आणि पेपर बोर्ड निर्मिती ः

१) केळीचे खोड हे सेल्युलोजचा (४० ते ४५ टक्के) चांगला स्रोत आहे. योग्य प्रक्रियाकरून केळीच्या विविध भागांचा वापर क्राफ्ट पेपर तयार करण्यासाठी करतात.

२) केळीच्या टाकाऊ गोष्टीपासून बनवलेला कागद आणि पेपरबोर्डची ताकद चांगली आहे. घर्षण प्रतिरोधक, ओलावा प्रतिरोधक आहे.

३) कागद आणि पेपरबोर्डचा टिकाऊपणा, मुद्रण क्षमता चांगली आहे.

४) कागद आणि पेपरबोर्ड अन्न पॅकेजिंगमध्ये उपयुक्त ठरू शकतात. कागदाच्या बोर्डचा वापर हा व्हाइट बोर्ड, सॉलिड बोर्ड, फायबर बोर्ड आणि चीप बोर्ड तयार करण्यासाठी होतो.

इमेल: manisha.jagadale.123@gmail.com, (राष्ट्रीय नैसर्गिक धागे अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संस्था, कोलकता)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com