Agricultural Mechanization : शेतीमध्ये यांत्रिकीकरण काळाची गरज

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर यांनी कृषी विषयक योजनांविषयी उपस्थित शेतकरी बांधवांना माहिती दिली.
Farm Mechanization
Farm MechanizationAgrowon

Yavtmal News : कृषी विज्ञान केंद्रांतर्गत (Agricultural Science Center) उपलब्ध असलेले आधुनिक यांत्रिकीकरणाचा (Agriculture Mechanization) वापर शेतकऱ्यांनी शेतीमध्ये करावा.

तसेच विद्यापीठाच्या शिफारशीत तंत्रज्ञानाची माहिती शेतकरी शास्रज्ञ मंचाद्वारे जिल्ह्यातील शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याचे काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे (Amol Yedge) यांनी केले.

कृषी विद्यापीठामार्फत शेतकरी शास्त्रज्ञ मंच सुरू करण्यात आला असून, याची दुसरी सभा जगदीश चव्हाण यांच्या प्रक्षेत्रावर घेण्यात आली. ‘शेतकरी शास्त्रज्ञ मंच’च्या माध्यमातून आधुनिक शेतीमध्ये यांत्रिकीकरणाचा प्रचार आणि प्रसार करण्यात येणार आहे.

Farm Mechanization
Poultry Farming : कुक्कुटपालन व्यवसाय फायदेशीर ः जिल्हाधिकारी अरोरा

यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी मार्गदर्शन केले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा केंद्र प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, डॉ. सुरेश नेमाडे, जिल्हा रेशीम अधिकारी विलास शिंदे, महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक अशोकराव ठाकरे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक अमर गजभिये, दारव्हा तालुका कृषी अधिकारी एम. जे. थोरात, शेतकरी शास्त्रज्ञ मंचचे अध्यक्ष अशोक वानखडे, जगदीश चव्हाण, शेतकरी मनीष जाधव, प्रगतिशील शेतकरी, वागद-इजारा अमृतराव देशमुख उपस्थित होते.

शेतकऱ्यांना आधुनिक शेतीची माहिती मिळावी यासाठी शेतकरी शास्त्रज्ञ मंच सुरू केल्याची माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली. डॉ. सुरेश नेमाडे, शेतकरी शास्त्रज्ञ मंचाचे उद्देश व महत्त्व विशद केले.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर यांनी कृषी विषयक योजनांविषयी उपस्थित शेतकरी बांधवांना माहिती दिली. जिल्हा रेशीम अधिकारी विलास शिंदे रेशीम उत्पादनाविषयी सखोल मार्गदर्शन केले.

Farm Mechanization
Crop Loan : धुळे जिल्हा बँक देणार एप्रिलपासून नवीन पीककर्ज

अशोकराव ठाकरे, जिल्हा व्यवस्थापक, महाबीज यांनी बीजोत्पादन मार्गदर्शन केले. तालुका कृषी अधिकारी एम. जे. थोरात यांनी पूरक प्रक्रिया उद्योग या विषयी सखोल माहिती दिली.

या प्रसंगी कृषी विज्ञान केंद्रातील डॉ. प्रमोद मगर, शास्त्रज्ञ, कीटकशास्त्र, गणेश काळुसे, शास्त्रज्ञ पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र राधेश्याम देशमुख, तांत्रिक सहायक भरतसिंग सुलाणे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गाजीपूर येथील शेतकरी शास्त्रज्ञ मंचाचे सर्व सदस्यांनी प्रयत्न केले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com