Mini Tractor : वर्ध्याच्या योगेश लिचडे यांनी छोट्या शेतकऱ्यांसाठी बनवला मिनी ट्रॅक्टर, पॉवर वीडर

वर्धा जिल्ह्यातील कासारखेड (आर्वी) येथील शेतकऱ्यांच्या समस्यांची जाण असलेल्या योगेश लिचडे यांनी अनेक छोटीमोठी यंत्रे विकसित केली आहेत. त्यातून शेतकऱ्यांचे श्रम, पैसा आणि वेळेची बचत होत आहे.
Mini Tractor
Mini TractorAgrowon

Indian Agriculture : शेती कामांसाठी मजुरांची उपलब्धता ही मोठी समस्या झाली आहे. त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न आपापल्या पातळीवर शेतकरी करत आहेत. त्यात त्यांना यंत्रे, अवजारे उपयोगी ठरत असली तरी त्यांच्या किमतीमुळे अनेकवेळा ती लहान शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेरही राहत आहेत.

त्याच्या उलट परदेशामध्ये विविध कामांसाठी अधिक क्षमतेची यंत्रे (machines) वापरली जातात. त्यासाठी अधिक इंधन लागत असले तरी वेगाने काम होत असल्याने मोठे अनेक शेतकरी त्याकडे वळत आहेत.

हाच धागा पकडत कासारखेड (आर्वी) येथील योगेश लिचडे यांनी कमी- अधिक क्षमतेची शेतीपयोगी यंत्रे विकसित करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

आंतरमशागतीसाठी मिनी ट्रॅक्‍टर

योगेश यांनी लहान शेतकऱ्यांसाठी खास मिनी ट्रॅक्टर (Mini Tractor) विकसित केला आहे. त्यात चार फॉरवर्ड आणि एक रिव्हर्स गिअर वापरला आहे. सामान्यतः गिअर हे इंजिनशी जोडलेले असल्यामुळे आवश्यक ती ताकद मिळवण्यामध्ये अडचणी येतात.

शेतकऱ्यांची ही अडचण दूर करण्यासाठी योगेश यांनी इंजिन आणि गिअर विभाग स्वतंत्र ठेवले असून, चेनव्हिलद्वारे जोडले आहे.

केवळ या एकाच बदलामुळे ट्रॅक्टर चार्जिग मोटार, पेट्रोल किंवा डिझेल इंजिन या पैकी काहीही जोडून चालवता येत असल्याचा त्यांचा दावा आहे. त्यासाठी केवळ इंजिनचा विभाग बदलण्याची आवश्यकता भासते.

Mini Tractor
Mini Tractor : दावणीचे बैल गेले, ट्रॅक्टर आलं; पण नंद्या-मोत्याच्या आठवणीचं काय?

-सध्या त्यांनी विकसित केलेल्या मिनी ट्रॅक्‍टरची क्षमता पाच हॉर्सपावर आहे. यामध्ये गिअर बॉक्‍स, डिप्रेन्शियल, क्‍लचप्लेट, प्रेशरप्लेट, अप आणि डाऊन करण्यासाठी मॅन्युअली हायड्रोलीक यंत्रणा दिली आहे.

- हा मिनी ट्रॅक्टर तीन लिटर डिझेलमध्ये सहा तास काम करू शकतो.

- त्याला कल्टीवेटर, वखरपास जोडून कामे करता येतात.

- तीन बाय पाच फूट आकाराची छोटी ट्रॉली जोडून, पाच क्‍विंटलपर्यंत भार वाहून नेता येतो. ही ट्रॉली १९ हजारापर्यंत पडते.

- या पाच एचपी डिझेल इंजिनसह असलेल्या मिनी ट्रॅक्‍टरची किंमत ७५ हजार रुपये इतकी आहे. कोणत्याही इंजिनशिवाय मिनी ट्रॅक्टर ५५ हजार रुपये मिळू शकतो. त्यावर पेट्रोल इंजिन किंवा बॅटरी लावणे शक्य होते.

Mini Tractor
Agriculture Mechanization : सोलापुरातील १५६३ शेतात पोहोचले ट्रॅक्टर

पावर विडर

आंतरमशागत आणि तण नियंत्रणासाठी पॉवर वीडर तयार केले असून, त्यातही इंजिनचा विभाग गरजेनुसार बदलता येतो. त्यामुळे पेट्रोल किंवा डिझेल अशा उपलब्ध किंवा स्वस्त इंधनाचा वापर करता येतो. तीन लिटरमध्ये ५.५ ते ६ तास काम करणे शक्य आहे.

कल्टीवेटर, वखरपास, रोटाव्हेटर अशी तीनही कामे करता येतात. याची किंमत ५० हजार रुपये आहे.

योगेश लिचडे, ८४१२९४४७९९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com