सोयाबीनसाठी आधुनिक कृषी अवजारे, यंत्रे

अलीकडे सोयाबीन पिकाखालील लागवड वेगाने वाढली असून, ते प्रमुख पिकांपैकी एक झाले आहे. या पिकामध्ये यांत्रिकीकरणाच्या मोठ्या संधी असून, त्याबाबत सातत्याने काम केले जात आहे. या पिकामध्ये वापरण्यासाठी यंत्रे, अवजारे यांची माहिती घेऊ.
Agriculture Technology
Agriculture TechnologyAgrowon

बहुतांश सर्व पिकांच्या मशागतीसाठी विविध प्रकारचे आधुनिक नांगर, तव्याचे नांगर, कल्टिव्हेटर, डिस्क हॅरो, रोटरी टिलर वापरता येतात. पल्टी नांगराचे प्रकार (मेकॅनिकल पल्टी, हायड्रोलिक पल्टी, ऑटोमॅटिक पल्टी), स्पेड नांगर, तव्यांचा नांगर, हायड्रॉलिक पल्टी तव्यांचा नांगर, कल्टीव्हेटर, डिस्क हॅरो, रोटरी टिलर (रोटाव्हेटर), पॉवर हॅरो अशा ट्रॅक्टरचलित यंत्रांची माहिती या पूर्वीच्या कपाशी पिकासंदर्भातील लेखामध्ये घेतली आहे.

Agriculture Technology
Agriculture TechnologyAgrowon

बैलचलित टोकण यंत्र

-हे यंत्र एक बैलजोडीच्या साह्याने चालणारे आहे.

-या यंत्राची कार्यक्षमता २.३३ हे प्रति दिवस इतकी आहे.

Agriculture Technology
Agriculture TechnologyAgrowon

ट्रॅक्टरचलित टोकण यंत्र

-४५ व त्यापेक्षा जास्त अश्‍वशक्तीच्या ट्रॅक्टरने चालवता येते.

-या यंत्राद्वारे भुईमूग, सूर्यफूल, करडई, सोयाबीन, ज्वारी, मका, गहू, तूर इ. पिकांची टोकण पद्धतीने पेरणी करता येते.

-दाणेदार खतांची मात्रा शिफारशीनुसार बियाण्याच्या बाजूला देता येते.

Agriculture Technology
Agriculture TechnologyAgrowon

ट्रॅक्टरचलित रुंद वरंबा सरी टोकण यंत्र (BBF)

-४५ व त्यापेक्षा जास्त अश्‍वशक्तीच्या ट्रॅक्टरने चालवता येते.

-या यंत्राद्वारे भुईमूग, सूर्यफूल, करडई, सोयाबीन, ज्वारी, मका, गहू, तूर इ. पिकांची टोकण पद्धतीने पेरणी करता येते.

-दाणेदार खतांची मात्रा शिफारशीनुसार बियाण्याच्या बाजूला देता येते.

-गरजेनुसार कमी जास्त खोलीवर बियांची टोकण करता येते.

-या यंत्राच्या साह्याने २.८ कि. मी. प्रति तास वेगाने ०.४६ क्षेत्रावर एका तासात सरी वरंबा तयार करून बियांचे टोकण करता येते.

Agriculture Technology
Agriculture TechnologyAgrowon

ट्रॅक्टरचलित न्यूमॅटिक टोकण यंत्र

-४५ व त्यापेक्षा जास्त अश्‍वशक्तीच्या ट्रॅक्टरने चालवता येते.

-हवेच्या दाबावर कार्य करत असल्यामुळे बियाण्यांची बचत होते.

-या यंत्राद्वारे भुईमूग, सूर्यफूल, करडई, सोयाबीन, ज्वारी, मका, गहू, तूर इ. पिकांची पेरणी करता येते.

-एका दिवसात ३.५० ते ४ हेक्टर क्षेत्रावर टोकण करता येते.

-पेरणीच्या अचूकतेमुळे उत्पादनात १० ते १५ टक्के वाढ होते.

-पेरणीची खोली एक समान असल्यामुळे चांगले उत्पादन येते.

-पेरणीच्या प्रक्रियेदरम्यान कोणतेही नुकसान होत नाही.

Agriculture Technology
Agriculture TechnologyAgrowon

सायकल कोळपे

-यामध्ये तीन छोटे फण माती व तणाची मुळे ढिले करण्यासाठी बसविलेले असतात.

-हे यंत्र खुरपणी व आंतरमशागत, दोन ओळींतील निंदणी करण्यासाठी वापरण्यात येते.

-एका दिवसात होणारे क्षेत्र ०.१५ ते ०.२० हेक्टर.

Agriculture Technology
Agriculture TechnologyAgrowon

मिनी पॉवर विडर

-हे यंत्र खुरपणी व आंतरमशागत, दोन ओळींतील निंदणी करण्यासाठी वापरण्यात येते.

-एका दिवसात होणारे क्षेत्र ०.२० ते ०.४० हेक्टर.

Agriculture Technology
Agriculture TechnologyAgrowon

ट्रॅक्टरचलित खुरपणी यंत्र

-हे यंत्र खुरपणी व आंतरमशागत, दोन ओळींतील निंदणी करण्यासाठी वापरण्यात येते.

-एका दिवसात होणारे क्षेत्र ०.४० ते ०.६० हेक्टर.

Agriculture Technology
Agriculture TechnologyAgrowon

नॅपसॅक मिस्ट ब्लोअर कम डस्टर

-पिकांवरील कीटक व रोग नियंत्रणासाठी पाणि मिश्रित औषध फवारणीसाठी उपयोग केला जातो.

-हे यंत्र हाताळण्यास सोईस्कर आहे.

-हे यंत्र पेट्रोल इंजिनद्वारे चालणारे आहे.

-पाण्याचे द्रावण आणि भुकटीच्या स्वरूपात कीटकनाशकांचा वापर करता येतो.

-फवारणीसाठी लागणाऱ्या वेळेत व खर्चात बचत.

-टाकीची क्षमता ११.५ लिटर.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com