महात्मा फुले कृषी विद्यापीठाची आधुनिक अवजारे

मध्य, पश्‍चिम आणि उत्तर महाराष्ट्रातील शेतीसाठी आवश्यक त्या यंत्राचा विकास (Agriculture Machinery) महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये (Mahatma Phule Agriculture University) करण्यात येतो. येथील संशोधन प्रकल्पांतर्गत विकसित करण्यात आलेली यंत्रे व अवजारांची माहिती घेऊ.
Agriculture Machinery
Agriculture MachineryAgrowon

ट्रॅक्टरचलित फुले ऑटोमॅटिक पल्टी नांगर

-४५ व त्यापेक्षा जास्त अश्‍वशक्तीच्या ट्रॅक्टरने चालवता येते.

-ट्रॅक्टरच्या पोझिशन कंट्रोल लिव्हर ने आपोआप (ऑटोमॅटिक) पलटी करता येतो.

-या नांगरामध्ये पल्टी करण्याकरिता मेकॅनिकल लिव्हर, हायड्रोलिक सिलिंडरची आवश्यकता नाही.

-या नांगराची प्रक्षेत्रीय कार्यक्षमता ८०.४५ टक्के इतकी आहे.

-या नांगरासाठी हायड्रोलिक नांगरापेक्षा देखभाल व दुरुस्तीचा खर्च कमी येतो.

-हा नांगर हायड्रोलिक नांगराच्या किमतीपेक्षा जवळपास २० टक्क्यांनी स्वस्त आहे.

-या नांगराने जमिनीची नांगरणी योग्य त्या खोलीपर्यंत करता येते.

-हा नांगर हलक्या मध्यम व भारी जमिनीकरिता उपयुक्त आहे.

Agriculture Machinery
Agriculture Mechanization : यांत्रिकीकरण करूया गतिमान

ट्रॅक्टरचलित फुले हायड्रो - मेकॅनिक नियंत्रित फळबाग ऑफसेट व्यवस्थापन यंत्र

-३५ व त्यापेक्षा जास्त अश्‍वशक्तीच्या ट्रॅक्टरने चालविता येते.

-बागांमध्ये एकाच वेळी जुनी मुळे कापण्यासाठी व बेड तोडण्यासाठी उपयुक्त.

-पारंपारिक पद्धतीपेक्षा खर्चात ४८ टक्के बचत.

-क्षमता ०.१२७ हेक्टर प्रति तास.

ट्रॅक्टरचलित फुले कुट्टी यंत्र

-३५ व त्यापेक्षा जास्त अश्‍वशक्तीच्या ट्रॅक्टरने चालविता येते.

-फळबागेतील छाटणीनंतर पडणाऱ्या अवशेषांची कुट्टी करून बेडवर दोन्ही बाजूस समांतर टाकता येते. उदा. द्राक्षे

-अवशेषांची कुट्टी करण्याकरिता ट्रॅक्टरच्या पीटीओ शक्तीचा, कुट्टी केलेले अवशेष बेडवर दोन्ही बाजूंस समांतर टाकण्याकरिता हायड्रोलिक शक्तीचा वापर केलेला आहे.

-प्रक्षेत्रीय क्षमता ७८ टक्के.

-एका तासात ०.४७ हेक्टर क्षेत्रावर अवशेषांची कुट्टी करून टाकते.

-पारंपरिक पद्धतीपेक्षा खर्चामध्ये ७२ टक्के बचत.

Agriculture Machinery
Agriculture Mechanization : राज्यात अनुदानित अवजारे विक्रीला बंदी

ट्रॅक्टरचलित फुले हायड्रो - मेकॅनिक नियंत्रित तण काढणी यंत्र

-२५ व त्यापेक्षा जास्त अश्‍वशक्तीच्या ट्रॅक्टरने चालविता येते.

-फळ बागेतील झाडांच्या दोन ओळी तसेच दोन झाडांमधील जागेतील तणही काढता येते.

-या यंत्राचे रोटरी युनिट दोन झाडांमध्ये व बाहेर हायड्रो-मेकॅनिकल यंत्रणेद्वारे सहजपणे कार्य करते.

-प्रक्षेत्रीय कार्यक्षमता एका दिवसात सव्वा हेक्टर आहे.

ट्रॅक्टरचलित फुले ऊस रोपे पुनर्लागवड यंत्र

-४५ व त्यापेक्षा जास्त अश्‍वशक्तीच्या ट्रॅक्टरने चालविता येते.

- एका दिवसात २.७५ ते ३ हेक्टर क्षेत्रावर ऊस रोपांची पुनर्लागवड करता येते.

-पारंपारिक पद्धतीपेक्षा खर्चात ६० ते ७० टक्के बचत होते.

-पारंपरिक पद्धतीपेक्षा वेळेत ७० ते ८० टक्के बचत.

विद्युत मोटारचलित फुले ऊस बेणे तोडणी यंत्र

-एक अश्‍वशक्तीच्या व सिंगल फेज विद्युत मोटारचलित यंत्र.

-एका तासात ६५०० ऊस बेणे तयार करता येते.

-पारंपरिक पद्धतीपेक्षा खर्चामध्ये ८० ते ८५ टक्के बचत.

-पारंपरिक पद्धतीपेक्षा वेळेमध्ये ८५ ते ९५ टक्के बचत.

-ऊस रोपवाटिकेसाठी ४० ते ७० सें.मी. लांबीचे ऊस बेणे तयार करण्यासाठी उपयुक्त.

फुले शेवगा काढणी झेला

-एका तासात २५० ते २८० शेंगा काढता येतात.

-शेंगाला इजा होत नाही.

-उंच झाडावरील शेंगा काढण्यासाठी उपयुक्त.

विद्युत मोटारचलित औषधी वनस्पतीच्या फळांचे कवच फोडणी यंत्र

-या यंत्राद्वारे हिरडा व रिठा या औषधी वनस्पतींच्या फळांचे कवच फोडता येते.

-पारंपारिक पद्धतीपेक्षा खर्चामध्ये व वेळेमध्ये ५० ते ६० टक्के बचत.

-क्षमता - एका दिवसात ३०० किलो.

ट्रॅक्टरचलित फुले बंदिस्त वाफे तयार करणारे अवजार

-३५ व त्यापेक्षा जास्त अश्‍वशक्तीच्या ट्रॅक्टरने चालविता येते.

-एका दिवसात ४ ते ४.५ हेक्टर क्षेत्रावर बंदिस्त वाफे तयार करता येतात.

-रब्बी ज्वारीसाठी जमिनीत पावसाचे पाणी मुरविण्यासाठी बंदिस्त वाफे तयार करता येतात.

विद्युतचलित कडबा कुट्टी यंत्र

-लहान व मध्यम शेतकऱ्यांसाठी विद्युतचलित कडबा कुट्टी यंत्र.

-सिंगल फेज एक अश्‍वशक्ती विद्यूत मोटार चलित यंत्र.

-ओला तसेच कोरडा चारा कुट्टी करता येतो.

ट्रॅक्टरचलित फुले मोल नांगर

-मोल नांगराची किंमत सुमारे २५००० इतकी आहे.

-क्षाराचा निचरा करण्यासाठी हेक्टरी १५०० रुपये इतका खर्च येतो.

-मोल नांगर ६० ते ७२ एचपी ट्रॅक्टरद्वारे ओढता येतो.

-मोल नांगराचा उपयोग भारी काळ्या जमिनीतील अतिरिक्त पाण्याचा आणि क्षारांचा निचरा करण्यासाठी होतो.

-या यंत्राद्वारे दोन मोलमध्ये ४ मीटर अंतर ठेवल्यास प्रति तास ०.३ हेक्टर क्षेत्र पूर्ण होते.

मनुष्यचलित फुले ज्वारी काढणी यंत्र

-बागायती तसेच कोरडवाहू ज्वारी मुळासहित काढण्यासाठी उपयुक्त.

-हाताने ज्वारी मुळासह उपटणे कष्टदायक असते. तुलनेने कमी कष्टात ज्वारी काढता येते.

-वजनाला हलके (२.१ किलो) असल्याने उचलून नेणे सोपे व वापरासाठी सुलभ.

-----------------------

डॉ. तुळशीदास बास्टेवाड

(प्रमुख संशोधक, अखिल भारतीय समन्वित कृषी अवजारे व यंत्रे संशोधन प्रकल्प, डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, राहुरी.)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com