
ट्रॅक्टरचलित कॉटन प्लान्टर ः
- ४५ व त्यापेक्षा जास्त अश्वशक्तीच्या ट्रॅक्टरद्वारे चालविता येते.
- या यंत्राद्वारे कापूस, भुईमूग, सोयाबीन, तूर, मका इत्यादी पिकांची पेरणी करता येते.
- एका दिवसात साडेतीन ते ४ हेक्टर क्षेत्रावर टोकण करता येते.
- पेरणीच्या अचूकतेमुळे उत्पादनात १० ते १५ टक्के वाढ होते.
सौरचलित बॅटरी फवारणी यंत्र ः
- फवारणीवेळी सौरऊर्जेवर बॅटरी चार्ज होते.
- या फवारणी यंत्रामध्ये सौरऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत केले जाते.
- या यंत्रासाठी सोलर पॅनल, १२ व्हॉल्टच्या बॅटरीची आवश्यकता असते.
- टाकीची क्षमता- १५ लिटर.
पॉवर विडर ः
- या यंत्राला स्वतंत्र्य रोटाव्हेटर आहे.
- कापूस पिकातील तण काढण्यासाठी उपयुक्त.
- चक्राकार गतीने फिरणारी पाती असल्यामुळे तण निर्मूलन प्रभावीरीत्या होते.
ट्रॅक्टरचलित थ्री-रो विडर ः
- ४५ व त्यापेक्षा जास्त अश्वशक्तीच्या ट्रॅक्टरद्वारे चालविता येते.
- या यंत्राला स्वतंत्र रोटाव्हेटर आहे.
- कापूस पिकातील तण काढण्यासाठी उपयुक्त.
- चक्राकार गतीने फिरणारी पाती असल्यामुळे तण निर्मूलन प्रभावीरीत्या करता येते.
ट्रॅक्टरचलित एअर बूम फवारणी यंत्र ः
- कापूस, सोयाबीन, वाटाणा इत्यादी पिकांमध्ये कीटकनाशक आणि तणनाशकांच्या फवारणीसाठी उपयुक्त.
- फवारणीसाठी लागणाऱ्या वेळ, श्रम आणि खर्चात बचत होते.
स्वयंचलित एअर बूम फवारणी यंत्र (हाय ग्राउंड क्लिअरन्स) ः
- कापूस, सोयाबीन, वाटाणा इत्यादी पिकांमध्ये कीटकनाशक आणि तणनाशकांच्या फवारणीसाठी उपयुक्त.
फवारणीच्या वेळ व खर्चात बचत होते.
- हे फवारणी यंत्र हाय ग्राउंड क्लिअरन्सचे असून वरच्या बाजूस बंद केबिन आहे.
ट्रॅक्टरचलित एअर बूम फवारणी यंत्र (हाय ग्राउंड क्लिअरन्स) ः
- कापूस, सोयाबीन, वाटाणा इत्यादी पिकांमध्ये कीटकनाशक आणि तणनाशकांच्या फवारणीसाठी उपयुक्त.
- फवारणीसाठी लागणाऱ्या वेळ, श्रम आणि खर्चात बचत होते.
- लांबी १५ फूट व ११ नोझल.
- टाकीची क्षमता- २०० लिटर.
नॅपसॅक मिस्ट ब्लोअर कम डस्टर ः
- कापूस पिकांवरील कीड व रोगांच्या नियंत्रणासाठी फवारणीसाठी उपयोग केला जातो.
- हे यंत्र हातळण्यास सोपस्कर असून पेट्रोल इंजिनद्वारे चालते.
- पाण्याच्या आणि भुकटीच्या स्वरूपात कीटकनाशकांचा वापर करता येतो.
- फवारणीसाठी लागणाऱ्या वेळेत व खर्चात बचत होते.
- टाकीची क्षमता - ११.५ लिटर
मनुष्यचलित सायकल फवारणी यंत्र ः
- पीक संरक्षणावेळी फवारणीसाठी वापर करता येतो.
- हे फवारणी यंत्र हाताळण्यास अत्यंत सोपे आहे.
- पाण्याच्या आणि भुकटीच्या स्वरूपात कीटकनाशकांचा वापर करता येतो.
- फवारणीसाठीच्या वेळ आणि खर्चात बचत होते.
- टाकीची क्षमता ११.५ लिटर
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.