Digital Agriculture : ‘वनामकृवि’सोबत कन्‍सस स्टेट युनिव्हर्सिटीत सामंजस्य करार

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि अमेरिकेतील नामांकित कन्‍सस स्टेट युनिव्हर्सिटी यांच्‍यात शुक्रवारी (ता. १०) सामंजस्य करार झाला.
Agriculture Technology
Agriculture TechnologyAgrowon

Agriculture Digital Technology परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ (VNMKV Parbhani) आणि अमेरिकेतील नामांकित कन्‍सस स्टेट युनिव्हर्सिटी (Kansans State University) यांच्‍यात शुक्रवारी (ता. १०) सामंजस्य करार झाला.

या माध्‍यमातून दोन्‍ही संस्थांतर्फे कृषी विद्यापीठातील संशोधक, प्राध्‍यापक आणि विद्यार्थी याकरिता डिजिटल शेती तंत्रज्ञान (Digital Agriculture Technology) क्षेत्रात कौशल्‍य विकासासाठी प्रशिक्षण आयोजित करण्‍यास मदत होईल. तसेच विद्यार्थ्यांना अमेरिकेतील डिजिटल शेतीचे ज्ञान अवगत होईल.

परभणी कृषी विद्यापीठातील जागतिक बॅंक आणि भारतीय कृषी संशोधन परिषद पुरस्‍कृत राष्‍ट्रीय कृषी उच्‍च शिक्षण प्रकल्‍पांतर्गत (नाहेप) डिजिटल शेतीवर आधारित प्रकल्‍प राबविण्‍यात येत आहे.

या अंतर्गत डिजिटल शेतीसंबंधित शैक्षणिक आणि संशोधनासाठी राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय पातळीवरील विविध नामांकित संस्‍थांसोबत परस्‍पर सहकार्य प्रस्‍थापित करणे अपेक्षित आहे.

या प्रकल्‍पांतर्गत शुक्रवारी (ता.१०) कन्‍सस स्टेट युनिव्हर्सिटी येथे आयोजित कार्यक्रमात या करारावर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी आणि कन्‍सस स्टेट युनिव्हर्सिटीचे संशोधन उपाध्‍यक्ष डॉ. डेव्हिड व्ही. रोसोव्स्की यांनी स्‍वाक्षरी केली.

Agriculture Technology
Agricultural Technology : कृषी क्षेत्रातील तंत्रज्ञान वापराचे संक्रमण

या करारामुळे दोन्‍हीही विद्यापीठातील शिक्षण व संशोधन क्षेत्रातील ज्ञान व तंत्रज्ञानाची देवाणघेवाण होईल. राज्‍यातील व देशातील शेतीत डिजिटलसाठी मनुष्‍यबळ निर्मिती करणे आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्‍त डिजिटल तंत्रज्ञान विकसित करण्‍यास मदत होईल.

डॉ. मणी म्‍हणाले, ‘‘परभणी कृषी विद्यापीठाच्‍या दृष्‍टीने हा करार हा ऐतिहासिक क्षण आहे. भविष्‍यात याचा मोठा फायदा देशातील शेती विकासास होईल.’’

Agriculture Technology
Agricultural Technology : शेतकऱ्यांच्या गरजांनुसार 35 हून अधिक यंत्रांची निर्मिती

कन्‍सस स्टेट युनिव्‍हर्सिटीतील शास्‍त्रज्ञ डॉ. वारा प्रसाद, डॉ. एमेस्ट मिंटन, डॉ. जॅन मिडेनडॉर्फ, डॉ.नाझा लिलजा, डॉ. ग्रँट चॅपमन, डॉ. राज खोसला, केएसयूचे डॉ. कालीरामेश सिलिवेरू आदी उपस्थित होते.

कुलगुरू डॉ. इंद्र मणी हे अमेरिकेतील नामांकित इतर विद्यापीठे नेब्रास्का विद्यापीठ, युनिव्‍हर्सिटी ऑफ फ्लोरिडा, वॉशिंग्टन स्टेट युनिव्हर्सिटी यांच्‍याशी डि‍जिटल शेती संशोधन व शिक्षण क्षेत्रात परस्‍पर सहकार्यासाठी सामंजस्‍य करार करण्यासाठी प्रयत्नशील ‍आहेत.

परभणी : ‘वनामकृवि’ आणि अमेरिकेतील कन्‍सस स्टेट युनिव्हर्सिटी यांच्‍यातील सामंजस्य करारावर कुलगुरू डॉ. इंद्र मणी आणि युनिव्हर्सिटीचे संशोधन उपाध्‍यक्ष डॉ. डेव्हिड व्ही. रोसोव्स्की यांनी स्‍वाक्षरी केली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com