नॅनो युरियाने कृषी उत्पादन,शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ

पिकांमधील उत्पादकता आणि पोषक घटकांचा दर्जा उंचावण्यासाठी नॅनो युरिया उपयुक्त ठरल्याचे दिसून आले आहे. याशिवाय भूजल पातळी व पर्यावरण या दृष्टीने नॅनो युरिया सकारात्मक ठरत आहे.
Nano Urea Liquid
Nano Urea LiquidAgrowon

लिक्विड नॅनो युरियामधील पोषक घटकामुळे कृषी उत्पादनात आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही वाढ होणार असल्याचे इफ्कोतर्फे (Indian Farmers' Fertilizer Cooperative Limited) सांगण्यात आले आहे. शनिवारी (दिनांक २८ मे) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते इफ्कोच्या कलोल (गांधीनगर) येथील नॅनो युरिया निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले.

कृषी उत्पादकता वाढवून शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात भर घालण्यासाठी इफ्कोने १७५ कोटी रुपयांचा खर्च करून हा प्रकल्प उभारला आहे. नॅनो युरियातील पोषक घटकांमुळे माती,जल आणि वायू प्रदूषणात घट होते. याशिवाय हे लिक्विड वापरल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. नॅनो युरिया लिक्विडच्या वापरामुळे साठवणूक आणि वाहतूक खर्चातही बचत होणार असल्याचे इफ्कोतर्फे नमूद करण्यात आले आहे.

Nano Urea Liquid
मोदींनी केले नॅनो युरिया प्रकल्पाचे उद्घाटन

जमिनीतील युरियाच्या वापराला आळा घालण्यासाठी संशोधकांनी लिक्विड स्वरूपातील नॅनो युरिया विकसित केले आहे. द्रव स्वरूपातील हे खत ड्रोनच्या माध्यमातून पिकांवर फवारल्यानंतर उत्पादनात सुधारणा होणार असल्याचे इफ्कोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. यु. एस.अवस्थी (U. S. Awasthi) म्हणाले.

पिकांमधील उत्पादकता आणि पोषक घटकांचा दर्जा उंचावण्यासाठी नॅनो युरिया उपयुक्त ठरल्याचे दिसून आले आहे. याशिवाय भूजल पातळी व पर्यावरण या दृष्टीने नॅनो युरिया सकारात्मक ठरत असल्याचे अवस्थी म्हणाले आहेत. इफ्कोने बनवलेल्या ३ कोटी ६० लाख बाटल्यांपैकी २ कोटी ५० लाख बाटल्या यापूर्वीच विकल्या गेल्या असल्याचेही अवस्थी यांनी नमूद केले.

Nano Urea Liquid
ब्राझीलच्या शिष्टमंडळाची इफ्कोच्या नॅनो युरिया प्रकल्पाला भेट

शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे आणि संशोधनात आत्मनिर्भर होणे हे दोन्ही उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवत नॅनो युरिया लिक्विडची निर्मिती करण्यात आल्याचे इफ्कोचे अध्यक्ष दिलीप संघांनी यांनी म्हटले. इफ्कोच्या कलोल येथील नॅनो बायोटेक्नॉलॉजी रिसर्च सेंटरमध्ये (NBRC) विकसित स्वदेशी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नॅनो युरिया लिक्विडची निर्मिती करण्यात आल्याचे संघांनी म्हणाले. या प्रकल्पाच्या उभारणीसाठी १७५ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला. कलोल येथील प्रकल्पातून दिवसाला ५०० मिलिलिटरच्या १.५ लाख बाटल्या तयार केल्या जाऊ शकतात, असेही संघांनी यांनी नमूद केले.

दरम्यान नॅनो युरिया लिक्विड हा कृषी संशोधनातील एक नवा आविष्कार आहे. पिकांमधील पोषक घटकांच्या वाढीसाठी त्याचा वापर केला जातो. याशिवाय या नॅनो युरियाचा पर्यावरणावर दुष्परिणाम होत नाही. माती, पाणी आणि हवेचे प्रदूषण टाळून उत्पादनवाढीला चालना देणारे नॅनो युरिया हे एक सुरक्षित व शाश्वत खत आहे. इफ्कोने इंडियन कौन्सिल ऑफ ॲग्रीकल्चर रिसर्चच्या (ICAR) मदतीने नॅनो युरियाची देशभरातील १५ हजार ठिकाणी प्रात्यक्षिके घेतली आहेत. त्यानंतरच या नॅनो युरियाला केंद्रीय खते, रसायने मंत्रालयाकडून अंतिम संमती मिळालेली आली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com