Onion Cultivation : शेतकऱ्याने बनविले कांदे लागवड सोपी करणारे वाफा - खाचे यंत्र

कुसुंबा (ता. जि. धुळे) येथील युवा शेतकरी गणेश काशिनाथ चौधरी यांनी कांदा लागवड सोपी करणारे वाफा व खाचे यंत्र तयार केले आहे. या यंत्रामुळे शेतकऱ्यांचा वेळ, श्रम आणि मजुरीच्या खर्चात बचत होत आहे. विशेष म्हणजे घरगुती उपलब्ध अशा बाबींपासून त्यांनी यंत्र बनवले आहे.
 Onion Cultivation Machine
Onion Cultivation MachineAgrowon

कुसुंबा (ता. जि. धुळे) येथील युवा शेतकरी गणेश काशिनाथ चौधरी (Kashinath Chaudhari) यांनी कांदा लागवड (Onion Cultivation) सोपी करणारे वाफा व खाचे यंत्र तयार केले आहे. या यंत्रामुळे शेतकऱ्यांचा वेळ, श्रम आणि मजुरीच्या खर्चात बचत होत आहे. विशेष म्हणजे घरगुती उपलब्ध अशा बाबींपासून त्यांनी यंत्र बनवले आहे.

 Onion Cultivation Machine
Paddy Farming : भाताच्या विविध वाणांची लागवड करणारे गाव

धुळे जिल्ह्यात नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यामध्ये उन्हाळी कांद्यांची लागवड मोठ्या प्रमाणात होत असते. कांद्यासाठी शेत तयार करण्यामध्ये वेळ व कष्ट खूप असतात. पारंपरिक पद्धतीतील हे कष्ट कमी करण्याच्या उद्देशाने गणेश चौधरी यांनी घरगुती उपलब्ध लोखंडी वस्तूंपासून वाफा -खाचे यंत्र तयार केले आहे. ट्रॅक्टरचलित या यंत्राद्वारे वाफे तयार करणे, त्यात खाचे पाडणे आणि पाण्यासाठी सारंगी तयार करणे अशी तिन्ही कामे एकाच वेळी करता येतात. यामुळे बैल औत, शेत बांधण्यासाठी मजुरांची आवश्यकता कमी झाली असून, खर्चात बचत होत आहे. हे यंत्र कांदा उत्पादकांसाठी फायदेशीर ठरत आहे. सतत नवीन आणि वेगवेगळी यंत्रे, उपकरणे बनवत असल्यामुळे गणेश परिसरात ‘रॅन्चो’ (थ्री इडियट सिनेमातील एका पात्राचे नाव) म्हणून ओळखले जाते.

 Onion Cultivation Machine
पेंढा कापणी, गोळा करणारे ‘स्ट्रॉ कंबाइन’ यंत्र

खर्चात बचती सोबतच वाढला वेग

पारंपरिक पद्धतीमध्ये एक औत, त्यामागे एक माणूस यांचा खर्च साधारणपणे १८०० रुपये होतो. औत केल्यानंतर पुन्हा तीन ते चार माणसे लावून ते सरळ करून घेणे, नाके काढणे, धुरे व्यवस्थित करण्याचे काम करावे लागते. यातील धुरे हे केवळ ३ इंचाचे असल्याने ढेकळे असलेल्या जमिनीमध्ये पाणी देताना अडचणी येतात. इतक्या साऱ्या कामानंतर एक दिवसामध्ये एक एकर शेत कांदा लागवडीसाठी तयार होते. मात्र या यंत्रामुळे सारा पद्धतीला आधुनिकता प्रदान केली आहे. यात तयार होणारे धुरे पाच इंचाचे असतात. तसेच अधिक वजनाचा लोडर वापरलेला असल्यामुळे मातीतील ढेकळे फुटून व्यवस्थान खाचे पडत जातात. या खाच्यामुळे रोपे लावणे सोपे होते. तसेच पाणी दिल्यानंतर रोपे वाहून जात नाहीत. या यंत्राद्वारे एका तासामध्ये एक एकर क्षेत्रातील तिन्ही कामे पार पाडली जातात.

यंत्राचे फायदे

 एकाच वेळी तीन कामे होत असल्यामुळे खर्चात व वेळेमध्ये बचत होते.

 वाफा -खाचे यंत्रामुळे मजुरांना कांदे लागवड सोपी जाते. लागवड एकसमान होते.

 कांदे पिकाला सर्व बाजूंनी समान पाणी मिळते. खताचे व्यवस्थापन व फवारणी करणे सुलभ होते.

सध्या मजुराची कमतरता ही मोठी समस्या आहे. मजूर मिळत नसल्याने शेतकरी वैतागले आहेत. मी स्वतः शेतकरी असल्यामुळे त्यांना भेडसावणाऱ्या समस्यांवर मार्ग काढण्याचा माझा प्रयत्न असतो. घरगुती आणि भंगारमध्ये उपलब्ध असलेल्या घटकांपासून वाफा खाचे यंत्र तयार केले आहे. परिसरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ते उपयोगी ठरेल, अशी आशा आहे. या यंत्राच्या पेटंटसाठी अर्ज करण्याचे माझे नियोजन आहे.

- गणेश चौधरी, ७७४५८६७८०३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com