शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयाचे कांदा काढणी यंत्र देशात तिसरे

जॉन डिअर इंडिया प्रा. लि. आणि सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनिअर्स इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी ही स्पर्धा राष्ट्रीय पातळीवर (National Level)आयोजित केली जाते.
Onion harvester
Onion harvesterAgrowon

कांचनवाडी ः येथील छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था संचलित छत्रपती शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विकसित केलेल्या कांदा काढणी यंत्राला (Onion harvester) ‘टेक्नॉलॉजी इनोव्हेशन फोरम फॉर ॲग्रिकल्चर नर्चरिंग’ (तिफन २०२२) या राष्ट्रीय स्पर्धेत देशात तिसरा क्रमांक मिळाला.

जॉन डिअर इंडिया प्रा. लि. आणि सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनिअर्स इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी ही स्पर्धा राष्ट्रीय पातळीवर (National Level)आयोजित केली जाते. या स्पर्धेत कृषी संबंधित वेगवेगळी कामे कमीत कमी मनुष्यबळ वापरून सुलभरीत्या करण्यासाठी विविध उपकरणे तयार करून त्याचे प्रात्यक्षिक सादर करावे लागते.

या वर्षी कांदा काढणी यंत्र (Onion harvester) हा विषय होता. कोविड-१९ महामारीच्या पार्श्वभूमीमुळे त्या त्या महाविद्यालयामध्ये व दोन टप्प्यात घेण्यात आली. संपूर्ण देशभरातून विविध अभियांत्रिकी महाविद्यालयांनी भाग घेतला.

कांचनवाडी येथील छत्रपती शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेले कांदा काढणी यंत्र दोन तासात एक एकरपेक्षा अधिक कांदा काढणी कमी इंधनामध्ये करू शकते. या यंत्राने पहिल्या फेरीत भारतात पहिला क्रमांक पटकावला होता. त्यानंतरच्या अंतिम फेरीत त्यांना तिसरा क्रमांक मिळाला असून, रोख ७५ हजार रुपयांचा पुरस्कार मिळाला.

या टीममध्ये रवींद्र घाटे, वैभव जाधव (पॉवर स्टिअरिंग), शेख दानियाल, अमिताभ अवस्थी (कांदा काढणी यंत्रणा), योगेश पाटील, ऋत्विक कलंत्रे (ब्रेक सिस्टिम), राणी राठोड, महेश दंडे, उमेश टोपे, महेश देवडे (पॉवर ट्रेन), अनिकेत विसपुते, प्रथमेश चव्हाण (डिझाईन), जय पटेल, हरिओम काबरा, अनिकेत गाडे (मॅनुफॅक्चरींग), प्रज्वल कानडे, भाग्यश्री पाटील, श्वेता दहिवाल (ऑटोमेशन), निकिता राठोड, प्रदीप डोंगरे, शुभम तनपुरे (हायड्रॉलिक), महेश लघाणे, मानसी इंगळे (इलेक्ट्रिक), भाग्येश देशमुख (स्टोक मॅनेजमेंट), दीपक गायकवाड (कॅप्टन) होते.

या विद्यार्थांना प्रा. सचिन लहाने , प्रा. युवराज नरवडे, योगेश लांडे (मार्गदर्शक, जॉन डिअर), मेकॅनिकल विभाग प्रमुख डॉ. आर. पी. चोपडे, टीपीओ प्रा. दीपक पवार, अंकिता ॲग्रो इंजिनिअरिंगचे संचालक एस. एन. पाटील, विष्णू खडप, सुनील जाधव, दीपक पवार व शेती अभ्यासक जनार्दन कांबळे या मान्यवरांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

या यशाबद्दल छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था अध्यक्ष रणजित मुळे, सचिव पद्माकरराव मुळे, प्रशासकीय अधिकारी डॉ. श्रीकांत देशमुख, प्राचार्य डॉ. उल्हास शिंदे यांनी अभिनंदन केले आहे.पुढील ‘तिफन-२०२३’ साठी ‘स्वयंचलित पालेभाजी लागवड यंत्र’ हा विषय जाहीर करण्यात आला असून, त्याचे समन्वयक संजय देसाई (जी. एम. प्रॉडक्ट मॅनेजमेंट, महिंद्रा आणि महिंद्रा) हे आहेत.

Onion harvester
MSP panel: हमीभाव समितीत पंजाबला स्थान देण्याची मागणी

या बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी अमित अग्रवाल (डीआयआर, टेक्निकल एनसिस इंडिया), वेंकी कुट्टी (इंजिनिअर, एस. ए. इ. ), अमित बोरा ( डेप्युटी जनरल मॅनेजर, जॉन डिअर), विजय पाटील (मॅनेजर, महिंद्रा अँड महिंद्रा), संजय देसाई (प्रॉडक्ट मॅनेजमेंट, महिंद्रा अँड महिंद्रा), पुनगुन्द्रन गणपती (जगन) (मॅनेजर ॲडव्हायसर, जॉन डिअर इंडिया प्रा. ली.), संजय निबंधे (एस. ए. इ.), संदीप राजपूत (टेक्निकल लीड, जॉन डिअर) इ. मान्यवर उपस्थित होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com