पेट्रोल, इथेनॉलवर चालणारी दुचाकी ब्राझीलच्या बाजारपेठेत

यामाहा कंपनीने पेट्रोल आणि इथेनॉल या इंधनांवर चालणारी (फ्लेक्स फ्यूएल इंजिन) मोटरसायकल ब्राझीलच्या बाजारपेठेत नुकतीच सादर केली.
Petrol. Ethanol Bike
Petrol. Ethanol BikeAgrowon

राजकुमार चौगुले : ॲग्रोवन वृत्तसेवा

कोल्हापूर : यामाहा कंपनीने पेट्रोल आणि इथेनॉल या इंधनांवर चालणारी (फ्लेक्स फ्यूएल इंजिन) मोटरसायकल ब्राझीलच्या बाजारपेठेत नुकतीच सादर केली. ‘यामाहा फझर एफझेड १५’ या नावाने ही मोटरसायकल ब्राझीलच्या बाजारपेठेत विकली जाईल. भारतात ही मोटरसायकल कधी येईल याबाबतची निश्‍चित माहिती नसली तरी येत्या काही दिवसांत भारतीय बाजारपेठेत ‘एफझेड व्ही ३’ या नावाने ती दाखल होईल, असा अंदाज आहे.

Petrol. Ethanol Bike
Ethanol Production : इथेनॉल निर्मितीसाठी गुऱ्हाळघरांना परवानगी द्या

ही मोटरसायकल २०२३ मध्ये कदाचित भारतीय बाजारपेठेत दाखल होऊ शकते. भारतातील सध्याच्या प्रचलित मोटरसायकलचा अभ्यास करून त्यात आवश्यक बदल करून ही मोटरसायकल भारतीय बाजारपेठेत आणण्याचे कंपनीचे नियोजन आहे. १४९ सीसीचे इंजिन पेट्रोल किंवा इथेनॉलवर चालेल. भारतीय चलनात याची किंमत २.६९ लाख इतकी असेल. इंजिनसह अन्य काही बाह्यरूपामध्येही कंपनीने बदल केले आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून केंद्र सरकारने पेट्रोल व इथेनॉल या दोन्ही इंधनांवर चालणारी वाहने तयार करण्याला प्रोत्साहन दिले आहे. जगभरातील कंपन्यांनीही फ्लेक्स इंजिन तयार करण्याला प्राधान्य दिले आहे. अजूनही बहुतांश कंपन्यांकडून इंजिनची प्रयोगिक तत्त्वावर निर्मिती सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर ब्राझीलच्या बाजारपेठेत ही मोटरसायकल दाखल झाल्याने इतर कंपन्याही फ्लेक्स फ्यूएल इंजिनच्या निर्मितीत गती आणतील, अशी शक्यता आहे. मारुती सुझुकी कंपनीनेही इंजिनच्या निर्मितीला प्राधान्य दिले आहे. एप्रिल २०२३ पर्यंत इंजिन तयार होण्याची शक्यता आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com