वर्डेशियन लाइफ सायन्सेसची दर्जेदार उत्पादने

वर्डेशियन लाइफ सायन्सेस ही अग्रगण्य कंपनी आहे. पेटंटेड जैविक, पोषक खतांची कार्यक्षमता वाढवणे, बीज प्रक्रिया तसेच इनोक्युलंट टेक्नॉलॉजीज आधारित उत्पादनामध्ये कंपनी कार्यरत आहे. कंपनी अमेरिकेमध्ये कॅरी, नॉर्थ कॅरोलिना येथे कार्यरत असून, पाचशेहून अधिक पेटंट कंपनीने नोंदविलेली आहेत.
Verdesian Life Science
Verdesian Life ScienceAgrowon

वर्डेशियन लाइफ सायन्सेस (Verdesian Life Sciences) ही अग्रगण्य कंपनी आहे. पेटंटेड जैविक, पोषक खतांची (Fertilizer) कार्यक्षमता वाढवणे, बीज प्रक्रिया (Seed Treatment) तसेच इनोक्युलंट टेक्नॉलॉजीज आधारित उत्पादनामध्ये कंपनी कार्यरत आहे. कंपनी अमेरिकेमध्ये कॅरी, नॉर्थ कॅरोलिना येथे कार्यरत असून, पाचशेहून अधिक पेटंट कंपनीने नोंदविलेली आहेत.

Verdesian Life Science
Cotton : जागतिक बाजारात कापूस तेजीत राहणार

वर्डेशियन लाइफ सायन्सेस कंपनी २०१२ पासून कार्यरत आहोत. कंपनी पोषक तत्त्वांच्या कार्यक्षमतेत वाढ करून शाश्‍वत शेतीची हमी देते. कंपनीने जैविक, पोषक खतांची कार्यक्षमता वाढवणे, बीज प्रक्रिया तसेच इनोक्युलंट टेक्नॉलॉजी आधारित उत्पादन बाजारामध्ये उपलब्ध करून दिले आहे. याच्या वापरामुळे उच्चमूल्य आधारित पिके आणि विशेष पिके तसेच टर्फ, शोभेच्या वनस्पती इत्यादी पिकांच्या कार्यक्षमतेमध्ये आमूलाग्र बदल दिसून आला आहे. ४R न्यूट्रियंट स्टीवर्डशिप पार्टनर म्हणून वर्डेशियन कंपनी पर्यावरणीय पूरक आणि आर्थिकदृष्ट्या सातत्य असणाऱ्या उत्पादनांचे संशोधन आणि विकास करण्यामध्ये तत्पर आहे.

Verdesian Life Science
Soybean : सोयाबीन, हळद, कापसाच्या किमतींत घट

कंपनी सध्या सत्तरहून अधिक देशांमध्ये कार्यरत असून चारशेहून अधिक उत्पादनांची निर्मिती करते. जागतिक कृषी बाजारपेठेतील सतत बदलत असलेल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी कंपनीतर्फे अनेक नवीन संकल्पनांचा विकास केला जात आहे. सायटोझाइम लॅबोरेटरीज,Inc. ही आता वर्डेशियन लाइफ सायन्सेसचा भाग आहे. कंपनी प्रामुख्याने नावीन्यपूर्ण उत्पादनांचा अग्रगण्य पुरवठादार तसेच कृषी उत्पादन दर्जेदार करण्यासाठी पोषण संकल्पना आधारित उत्पादने पुरवते. सायटोझाइम ही संशोधन आधारित उत्पादन विकसित करते. तसेच प्रामुख्याने दर्जेदार उत्पादन निर्मितीसाठी संशोधन करते. अन्नद्रव्यांच्या योग्य वापर हे कंपनीचे धोरण आहे.

वर्डेशियन कंपनी आपल्या उत्पादनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नावीन्यपूर्ण उपाय आणि सर्वोत्तम तंत्रज्ञानाद्वारे शाश्‍वत उत्पन्न देण्याची हमी देते. जैविक, पीक आरोग्य आणि पीक अन्नद्रव्यांच्या तंत्रज्ञानामध्ये कंपनी आघाडीवर आहे. कंपनीच्या आधुनिक NUE आणि MAC तंत्रज्ञानाची तुलना करणे अशक्य आहे. कंपनी जास्त उत्पादनाचे आश्‍वासन देत नाही, मात्र त्याची हमी देते. वर्डेशियन संदर्भात अधिक माहितीसाठी www.vlsci.com या संकेत स्थळास भेट द्यावी.

- प्रसाद पाटील, ९४२३५८६९२०

(बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर, वर्डेशियन लाइफ सायन्सेस, पुणे)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com