भुईमुगाच्या टरफलातील पोषक घटकांच्या पुनर्वापरासाठी संशोधन

शेंगदाण्याचा वापर अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणात होतो. एकूण सुका मेव्यांपैकी शेंगदाण्याचे प्रमाण ६५ टक्के इतके आहे. प्रति व्यक्ती हे प्रमाण ४ किलो प्रति वर्ष इतके होते.
Grundnut
GrundnutAgrowon

शेंगदाण्याचा (Groundnut) वापर अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणात होतो. एकूण सुका मेव्यांपैकी शेंगदाण्याचे (Pea Nut) प्रमाण ६५ टक्के इतके आहे. प्रति व्यक्ती हे प्रमाण ४ किलो प्रति वर्ष इतके होते. तेल निर्मिती, भाजलेले, खारवलेले आणि वेगवेगळ्या प्रक्रिया केलेल्या शेंगदाण्याच्या निर्मितीमध्ये (Pea Nut Production) त्यावरील टरफल फेकून दिले जाते. फेकून दिल्या जाणाऱ्या टरफलाचे वजन २० ते ३५ दशलक्ष किलो इतके भरते.

Grundnut
Groundnut Rate :आषाढी एकादशीच्या तोंडावर, शेंगदाणे, साबुदाणा स्वस्त

या टरफलांचा वापर कशा प्रकारे करता येईल, यासाठी रॅलेईघ (उत्तर कॅरोलिना) येथील कृषी संशोधन सेवेतील रसायन तज्ज्ञ ओन्डुल्ला टूमर यांनी लक्ष केंद्रित केले आहे. त्यापासून प्रामुख्याने अधिक पोषक अशी पशुखाद्य निर्मितीसाठी प्रयत्न केले.

या भुईमूग टरफलांमध्ये असलेली प्रथिने, कर्बोदके, मेद, फायबर, खनिजे आणि जीवनसत्त्वे उपयोगी ठरू शकतात. या टरफलामध्ये जैवकार्यरत संयुगेही महत्त्वाची असून, पेशींना इजा पोचवणाऱ्या मुक्त कणांना उदासीन करण्याचे काम करतात. खरे पाहता, यातील अॅण्टिऑक्सिडेन्टची पातळी ही ग्रीन टी, द्राक्ष साल आणि अन्य स्रोताइतकी असते. पशुखाद्याच्या पातळीवर टूमर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भुईमुगाच्या टरफलातील पोषक घटकांचा वापर पोल्ट्री खाद्यामध्ये केला.

Grundnut
Groundnut : आंध प्रदेशात विस्तारणार भुईमूग लागवड क्षेत्र

समस्या व त्यावरील उपाय ः

१) भुईमूग टरफलात असलेल्या टॅनिनच्या अधिक प्रमाणामुळे प्रथिनांची पचनीयता कमी होते. त्यामुळे एकूण खाद्यामध्ये त्यांचा वापर कमीत कमी (चार टक्के) करून प्रयोग करण्यात आले.

२) काही लोकांना शेंगदाण्याची अॅलर्जी असते. त्यामुळे त्यातील अॅलर्जी कारक प्रथिन घटक पुढे कोंबडीचे मांस किंवा अंड्यामध्ये येते का, याचीही तपासणी करण्यात आली. मात्र असे अॅलर्जीकारक घटक पुढे उत्पादनामध्ये येत नसल्याचे दिसून आले.

फायदे

-शेंग टरफलातील प्रथिनांचा वापर केलेल्या कोंबड्यांमध्ये सॅलमोनेल्ला जिवाणूचा प्रादुर्भाव कमी राहत असल्याचे दिसून आले. हा जिवाणू माणसांमध्ये आरोग्यासाठी त्रासदायक ठरतो.

-शेंगाच्या टरफलांचे वेगवेगळे रंग दिसून येतात. लाल, तपकिरी, पांढरे, काळे किंवा रेषांयुक्त अशा शेंग टरफलांतील जैवकार्यरत संयुगांची तीव्रतेचे प्रमाणही तुलनात्मकदृष्ट्या मोजण्यात आले.

शेंगदाणा टरफलातील पोषकता रसायनशास्त्र आणि गुणधर्म शोधणे आणि त्याचा वेगवेगळ्या आहारामध्ये संभाव्य वापर वाढवणे यासाठी प्रयत्न केले जात आहेत.त्याच सोबत काकडी, रताळी, मिरची आणि कोबी पिकांतील शिल्लक राहणाऱ्या अवशेषातील पोषक घटकांचा कमाल पातळीपर्यंत वापर करण्यासाठी संशोधन केले जात असल्याचे टूमर यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com