पूरक शेतीद्वारेच शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ 

शेतकऱ्यांना पारंपरिक पद्धतीने अन्न व चारा पुरवण्यापेक्षा रोजगार आणि जास्तीत जास्त उत्पन्न या मागण्यांवर लक्ष केंद्रित करण्याची गरज शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठीच्या समितीचे अध्यक्ष अशोक दलवाई यांनी व्यक्त केली आहे.
Horticulture
Horticulture

शेतकऱ्यांसाठी परंपरेने चालत आलेली सरकारी धोरणाची चौकट मोडून या क्षेत्राच्या नव्या व परिणामकारक मागण्याची पूर्तता करायला हवी. शेतकऱ्यांना पारंपरिक पद्धतीने अन्न व चारा पुरवण्यापेक्षा रोजगार आणि जास्तीत जास्त उत्पन्न या मागण्यांवर लक्ष केंद्रित करण्याची गरज शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठीच्या समितीचे अध्यक्ष अशोक दलवाई यांनी व्यक्त केली आहे.   

प्रोग्रेस, हार्मोनी अँड डेव्हलपमेंट चेम्बर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजतर्फे आयोजित कार्यक्रमात दलवाई बोलत होते. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, वेब ऑफ थिंग्ज ,इंटरनेट ऑफ थिंग्ज, जिओ स्पॅटीएल टेक्नॉलॉजी यांसारख्या तंत्रज्ञानातील क्रांतीमुळे कृषी क्षेत्र कधी नव्हे एवढे अंतर्बाहय बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आजच्या कृषी क्षेत्राच्या गरजाही नव्या आणि परिणामकारक अशा आहेत त्यासाठी खाद्यान्न व चारा पुरवण्याचे पारंपरिक धोरण उपयोगाचे राहिलेले नाही. त्यांच्या रोजगारात, उत्पन्नात भर पडेल, अशा धोरणाची आज गरज आहे. याचबरोबरीने सरकारने पोषक अन्न पुरवायला हवे.       

येत्या काळात विकसित होत जाणारे तंत्रज्ञान शेतीसह सर्वच क्षेत्रांचा आयाम बदलण्यासाठी कारणीभूत ठरत आहे. उत्पादन आणि उत्पादनानानंतरच्या टप्प्यांतील नुकसानीचे प्रमाण कमी करण्यासाठी त्याचा अचूक अंदाज वर्तवण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर व्हायला हवा.याखेरीज शेती आणि बाजारपेठा जोडण्यातही या तंत्रज्ञानाचा वापर होईल. 

पुरक शेती - 

निव्वळ परंपरेने सुरु असलेल्या शेतीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडणार नाही. जोडशेती हा उत्पन्न वाढीसाठी चांगले माध्यम ठरू शकते. यात अन्न व बिगर अन्न प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती आणि आहे त्या उत्पन्नात भर पडू शकते. १८ जानेवारी रोजी जोडशेतीसाठी स्वतंत्र संचलनालय उभारणारे कर्नाटक हे पहिलेच राज्य ठरले आहे. गेल्या काही वर्षात शेती क्षेत्रातील वाढीपेक्षा फलोत्पादन क्षेत्राची वाढ वेगाने होत आहे. फळे, भाजीपाल्याच्या उत्पादनासह औषधी वनस्पतींनाही भविष्यात मोठी मागणी असल्याचे दलवाई यांनी नमूद केले आहे. 

औषधी वनस्पती लागवडीसाठी झालेल्या करार शेतीमधील काही कटू अनुभवामुळे शेतकरी त्याकडी दुर्लक्ष करता आहेत. मात्र करार शेतीशिवाय औषधी वनस्पतीच्या लागवडीचे प्रमाण वाढणार नाही. सरकारकडून सध्या नारळ लागवडीसाठी प्रोत्साहन देण्यात येत असल्याची माहिती फलोत्पादन विभागाचे माजी आयुक्त एच. पी. सिंग यांनी म्हटले आहे. २००४-२००५ साली भारताच्या फलोत्पादन क्षेत्रातील उत्पादन १६६.९४ मेट्रिक टन होते. त्यात ९८.३ टक्क्यांनी वाढ झाली असून २०२०-२०२१ मध्ये हे उत्पादन ३३१.०१ मेट्रिक टनांवर गेले आहे. जिथे कृषी उत्पादनाचे प्रमाण याच कालावधीत १९८.३६ मेट्रिक टनांवरून ३०८.६५ मेट्रिक टनांवर पोहचले आहे.       

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com