तंत्रज्ञानातील फायद्याच्या प्रक्रियेत अल्पभूधारक केंद्रस्थानी हवा

इंडो डच तंत्रज्ञानाद्वारे ४ राज्यांत ७ भाजीपाला गुणवत्ता केंद्रांना मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रात देशातील पहिले भाजीपाला गुणवत्ता केंद्र स्थापन झाले आहे.
Agriculture Technology
Agriculture TechnologyAgrowon

माळेगाव ः ‘‘इंडो डच तंत्रज्ञानाद्वारे ४ राज्यांत ७ भाजीपाला गुणवत्ता केंद्रांना मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रात देशातील पहिले भाजीपाला गुणवत्ता केंद्र स्थापन झाले आहे. या व्यतिरिक्त ४० इंडो इस्राईल गुणवत्ता केंद्रे आहेत. त्यात राबविण्यात येत असलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार आजूबाजूच्या गावांमध्ये झाला पाहिजे. त्या तंत्रज्ञानाद्वारे होणाऱ्या फायद्याच्या प्रक्रियेत अल्पभूधारक शेतकरी केंद्रस्थानी हवा,’’ असे आवाहन केंद्रीय कृषिमंत्रालयाचे (नवी दिल्ली) अतिरिक्त सचिव डॉ. अभिलक्ष लिखी यांनी केले.

माळेगाव खुर्द (ता. बारामती) येथील कृषी विज्ञान केंद्रामध्ये भाजीपाला गुणवत्ता केंद्राची (Vegetable Quality Center) पाहणी करण्यासाठी डॉ. लिखी (Dr. Abhilaksh Likhi) हे सोमवारी (ता. २९) आले होते. मुंबईचे उपकृषी पणन सल्लागार (विपणन व तपासणी संचालनालय) भावेश जोशी, विपणन अधिकारी अच्युत सुरवसे, राष्ट्रीय बागवानी बोर्ड पुणे उपसंचालक आर. के. अग्रवाल, फलोत्पादनचे संचालक (पुणे) डॉ. कैलास मोते, अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश नलावडे, प्रल्हाद वरे आदी उपस्थित होते.

Agriculture Technology
Technology: तंत्रज्ञान वापरात सर्वांचे हित

डॉ. लिखी म्हणाले, ‘‘देशात ३३४ लाख मेट्रिक टन फळे व भाजीपाला उत्पादन होते. प्रत्येक भाजीपाला गुणवत्ता केंद्रात उत्पादन व उत्पादकता कशी जास्त होईल, हे पाहणे गरजेचे आहे. हे तंत्रज्ञान संपूर्ण महाराष्ट्रात पाठवणे, तसेच आपल्या भागात हवामान बदलांच्या परिणामामुळे उत्पादन कसे येते, ते पाहून इतर केंद्राशी व शेतकरी कंपन्यांशी या तंत्रज्ञानाची देवाणघेवाण करायला हवी. इस्राईल व नेदरलँड येथील भाजीपाला गुणवत्ता केंद्राची तुलना बारामतीचे हे केंद्र करीत असल्याचा आनंद आहे.’’

Agriculture Technology
BBF Technology : जादा पावसातही बीबीएफवरील लागवडीची पिके जोमदार

‘‘येथील स्टार्टअपचे प्रोजेक्ट आमच्याकडे पाठवा. त्या संबंधी कार्यालयीन पाठपुरावा करून ते कमी कालावधीत मंजूर करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू,’’ असे आश्‍वासनही डॉ. लिखी यांनी दिले. दरम्यान, भाजीपाला गुणवत्ता केंद्रात असलेले डच तंत्रज्ञान आधारित टोमॅटो, खरबूज, हवेवरील व पाण्यावरील शेती विषयीची माहिती तुषार जाधव, यशवंत जगदाळे यांनी दिली. केंद्रप्रमुख डॉ. शिंदे यांनी आभार मानले.

जीएसटी कमी करण्याची मागणी

डॉ. लिखी यांनी माळेगाव केव्हीकेतील उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधला. आपण कशी शेती करता, त्यामध्ये आपण पूर्वी तंत्रज्ञान काय वापरले आणि आता काय वापरता, उत्पादित मालाची बाजारात विक्री कुठे करता, दर योग्य मिळतात का, तुम्हाला केव्हीकेची कशी मदत होते, पॉलिहाउस सबसिडी किती मिळाली, असे अनेक प्रश्‍न विचारत शेतकऱ्यांना बोलते केले. जळगावचे सुनील जगताप, माळेगावचे लक्ष्मण देवकाते, बाळासाहेब तावरे, निमगाव केतकीचे संतोष राऊत, कडबनवाडीचे तानाजी शिंगाडे, इंदापूरच्या अंकिता फरतडे, अरविंद निंबाळकर या शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्‍नांची त्यांनी उत्तरे दिली. दरम्यान, शेतकऱ्यांनी पॉलिहाउसचा खर्च वाढला आहे. सबसिडी वाढून मिळावी आणि जीएसटी कमी व्हावा, उत्पादित मालाला हमी दर मिळावा, अशी मागणी केली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com