Digital Agriculture : विद्यार्थी डिजिटल शेतीचे धडे गिरवण्यास थायलंडला
Agriculture Study परभणी ः ‘‘जागतिक बँक (World Bank) आणि भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) (आयसीएआर) पुरस्कृत राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्पाअंतर्गत (नाहेप) वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाचे ११ विद्यार्थी डिजिटल शेती (Digital Agriculture) प्रशिक्षणासाठी शुक्रवारी (ता.२४) थायलंडला रवाना झाले. विद्यापीठाच्या इतिहासात प्रथमच विद्यार्थी विदेशात प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले,’’ असे कुलगुरू डॉ. इंद्र मणी म्हणाले.
थायलंड येथील एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या नामांकित संस्थेत विद्यापीठांतर्गत ‘या डिजिटल तंत्रज्ञान व त्याचा वापर’ यावर रविवार (ता.२६) ते २६ मार्च या कालावधीत प्रशिक्षण होईल.
विद्यार्थ्यांचे पदव्युत्तर संशोधन हे डिजिटल तंत्रज्ञान व यांत्रिकीकरण यावर आधारित आहे. या प्रकल्पांतर्गत डिजिटल शेतीसंबंधित शैक्षणिक आणि संशोधन उपक्रम राबविण्यात येत आहेत. प्रकल्पाअंतर्गत विद्यापीठातील प्राध्यापक, संशोधक व विद्यार्थ्यांमध्ये डिजिटल शेती संबंधित कौशल्य निर्मिती करणे हा मुख्य उद्देश आहे.
विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना डॉ. मणी म्हणाले, ‘‘विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील अद्ययावत तंत्रज्ञान अवगत करण्याची संधी प्राप्त होणार आहे. भविष्यात हे विद्यार्थी डिजिटल शेतीसाठी कुशल मनुष्यबळ म्हणून मोलाचे योगदान देतील.
नुकतेच अमेरिकेतील चार नामांकित विद्यापीठांशी परभणी कृषी विद्यापीठाने सामंजस्य करार केले आहेत. दोन संशोधक प्राध्यापक अमेरिकेत प्रशिक्षण पूर्ण करून आले आहेत. लवकरच काही विद्यापीठ प्राध्यापक व संशोधक यांनाही पाठविण्यात येईल. विद्यार्थ्यांची दुसरा गट थायलंड, मलेशिया, स्पेन येथील नामांकित शैक्षणिक संस्थेत पाठविण्यात येतील.’’
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.