Nutmeg Product
Nutmeg ProductAgrowon

Food Processing : जायफळाच्या सालीपासून सरबत, मुरंबा, कॅण्डी, लोणचे

वाया जाणाऱ्या जायफळाच्या सालीपासून सरबत, मुरंबा, कॅण्डी आणि लोणचे निर्मितीचा प्रयोग फळसंशोधन वेंगुर्ला केंद्राने यशस्वी केला आहे. या प्रयोगामुळे जायफळ उत्पादक शेतकऱ्यांना वाया जाणाऱ्या सालीपासून उत्पन्न मिळणार असून, जायफळ लागवडीला देखील चालना मिळणार आहे.

सिंधुदुर्गनगरी ः वाया जाणाऱ्या जायफळाच्या सालीपासून (Nutmeg Peel) सरबत, मुरंबा, कॅण्डी (Nutmeg Candy) आणि लोणचे निर्मितीचा (Pickle Production) प्रयोग फळसंशोधन वेंगुर्ला केंद्राने (Fruit Research Center) यशस्वी केला आहे. या प्रयोगामुळे जायफळ उत्पादक (Nutmeg Producer Farmer) शेतकऱ्यांना वाया जाणाऱ्या सालीपासून उत्पन्न मिळणार असून, जायफळ लागवडीला (Nutmeg Cultivation) देखील चालना मिळणार आहे.

Nutmeg Product
Food Technology : अन्नतंत्र महाविद्यालयात ‘इनक्युबेशन सेंटर’चे काम सुरू

कोकणात आंबा, काजू, कोकम, सुपारी, नारळ, जांभूळ, करवंदे, फणस यांसह विविध फळपिकांचे उत्पादन घेतले जाते. यातील सर्व फळांवर प्रकिया करून विविध प्रकारची शेकडो उत्पादनांची निर्मिती केली जाते. यातील अनेक प्रयोग हे फळसंशोधन केंद्राच्या प्रकिया विभागाने यशस्वी केलेले आहेत. वाया जाणाऱ्या काजू बोंडूपासून सरबत, कॅण्डी, पावडर, चिप्स अशा पदार्थाची यशस्वी निर्मिती केली होती. हा प्रयोग ताजा असतानाचा आता संशोधन केंद्रातील काढणीपश्‍चात व्यवस्थापन व प्रशिक्षण प्रयोग शाळा विभागाने जायफळांच्या सालीपासून मुरंबा, कॅण्डी, सरबत आणि लोणचे अशा उत्पादनांची निर्मिती केली आहे.

Nutmeg Product
Food Security : आव्हान जागतिक अन्नसुरक्षेचे!

गेले दोन, तीन वर्षे या उत्पादनांचे निर्मितीचे प्रयोग सुरू होते. त्यामध्ये प्रकिया विभागाला यश आले आहे. त्यामुळे आतापर्यंत वाया जाणाऱ्या सालीचे मूल्यवर्धन होणार आहे. आतापर्यंत जायफळाच्या पातीला प्रतिकिलो २ हजार २०० बी प्रतिकिलो ६०० रुपये इतका दर मिळतो. परंतु आता वाया सालीला देखील प्रतिकिलो १० ते २० रुपये दर मिळणार आहे. या यशस्वी प्रयोगामुळे कोकणात जायफळ लागवडीला चालना मिळणार आहे.

डॉ. बाळासाहेब सावंत विद्यापीठाच्या माध्यमातून आम्ही कोकणातील फळावर प्रकिया प्रयोग केले जातात. जायफळांपासून आम्ही विविध उत्पादनांची निर्मिती केली आहे. त्यामुळे आतापर्यंत वाया जाणाऱ्या सालीपासून शेतकऱ्यांना उत्पन्न मिळणार आहे. ही सर्व उत्पादने औषधी गुणधर्म आणि आरोग्याला पोषक आहेत. ज्यांना प्रकियेचे प्रशिक्षण घ्यायचे आहे त्यांनी फळसंशोधन केंद्रांतील प्रकिया विभागाशी संपर्क साधावा.

- डॉ. मंगल कदम, उद्यानविद्यावेता, काढणी पश्यात व्यवस्थापन व प्रशिक्षण प्रयोग शाळा, वेंगुर्ले

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com