बटेरपालन पालनातील तंत्र....

बटेरच्या दोन पिढ्यांतील अंतर अतिशय कमी असल्याने वर्षाकाठी ३ ते ४ वेळा उत्पादन मिळते. पक्षांची वाढ लवकर होत असल्याने मादी सरासरी ४५ ते ५० व्या दिवशी अंडी घालायला सुरवात करते.
बटेरपालन पालनातील तंत्र....
Quail Agrowon

भारतात पुष्कळशा भागात बटेर(लावा) पालनास व्यापारी स्वरूप प्राप्त झाले आहे. बटेरच्या दोन पिढ्यांतील अंतर अतिशय कमी असल्याने वर्षाकाठी ३ ते ४ वेळा उत्पादन मिळते. पक्षांची वाढ लवकर होत असल्याने मादी सरासरी ४५ ते ५० व्या दिवशी अंडी घालायला सुरवात करते. उच्चतम उत्पादन ६० ते ७० व्या दिवशी मिळते.

अनुकूल हवामानात वर्षाकाठी सरासरी २५० ते २७० अंडी मिळतात.शारीरिक वाढ झपाट्याने होत असल्याने मांसासाठी पाचव्या आठवड्यात विकता येतात.संगोपनाचा खर्च अत्यंत कमी असतो.जागा आणि खाद्य कमी लागते, हाताळण्यास सुलभ असतात.तुलनात्मकदृष्ट्या सुदृढ असल्याने रोगांना बळी पडत नाहीत.

पिलांचे संगोपन

१) अंड्यातून बाहेर पडलेली पिले अतिशय नाजूक असतात.त्यांना ऊब आवश्यक असते.त्यांच्या वातावरणातील तापमान ९५डिग्री फॅरानाईटच्या खाली घसरल्यास मृत्यू ओढवतात.यामुळे बटेरच्या एकदिवसीय पिलांची वाहतूक करता येत नाही.पिलांचे वजन ५ ते ७ ग्रॅम असते.पंखांची वाढ होईपर्यंत पिलांना उष्मा आवश्यक असतो.पिलांच्या पहिल्या दिवसांपासून ते दोन आठवड्यापर्यंतच्या संगोपनास ब्रुडिंगचा कालावधी म्हणतात.

बटेरपालनाच्या पद्धती

१) गादी पद्धत

२) पिंजरा पद्धत : या पद्धतीचे तीन प्रकार आहेत.

अ) बॅटरी ब्रुडर – २ आठवडे (४ ते ५ आठवडेपर्यंत वाढविता येईल )

ब) रीअरींग केजेस - ३ ते ५ आठवडे

क) लेयर केजेस – ६ आठवड्यापासून विक्रीपर्यंत

संगोपनाच्या पद्धतीची निवड ही वैयक्तिक इच्छेवर अवलंबून राहील. ब्रुडींगच्या काळात म्हणजेच ० ते २ आठवड्यापर्यंत पिल्लांना २४ तास दररोज प्रकाश पुरवावा आणि हळूहळू १२ तासापर्यंत तिसऱ्या आठवड्याच्या शेवटी स्थिर करावे.

ब्रुडरचे आवश्यक तापमान

१ ला आठवडा---३५ ते ३७.८ अंश सेल्सिअस

२ रा आठवडा---३२.२ ते ३५.० अंश सेल्सिअस

३ रा आठवडा---२६.७ ते ३२. अंश सेल्सिअस

४ था आठवडा---२१.१. ते २६.७ अंश सेल्सिअस

खाद्याची गरज :

वयाच्या पाचव्या आठवड्यापर्यंत एका पक्षास साधारणत: ४०० ग्रॅम खाद्य लागते.त्यानंतर दररोज २० ते २५ ग्रॅम खाद्याची आवश्यकता असते.वर्षाकाठी एका पक्षामागे ८ किलो खाद्य लागते.खाद्याचे रूपांतर करण्याचे गुणोत्तर प्रमाण अंड्यातून बाहेर पडल्यापासून ते ५ आठवडेपर्यंत ३ ते ३.२ ग्रॅम खाद्य असते.

आवश्यक तापमान , आद्रता व जागा

स्टाटर ----ग्रोअर----लेयर

०-३ आठवडे ---४-५ आठवडे---७ आठवडे

तापमान---३७ ते ३८ अंश सेल्सिअस---२१ ते २२ अंश सेल्सिअस---२१ ते २२ अंश सेल्सिअस

आद्रता %---६० ते ६५---५५ ते ६०---५५ ते ६०

जागा सेंमी२---७.५---११.०---१५.०

भरण जागा से.मी.२---२.०---२.५---३.०

पिण्याच्या पाण्यासाठी से.मी.२---१.०---१.५---२.०

टीप :

१) ० ते २ आठवडे २४ तास प्रकाशयोजना आवश्यक आहे.

२) पाण्याच्या भांड्यात पिले बुडून मरू नयेत म्हणून पाण्याच्या भांड्यांना गारगोटीच्या आकारमानाची जाळी लावावी.

३) वयाच्या तिसऱ्या आठवड्यात नर आणि मादी वेगळे काढता येतात.नराच्या मानेच्या खालील बाजूस तपकिरी-लाल रंगाचे पंख असतात.मादीच्या पंखांचा रंग पिवळट- तपकिरी असून पंखावर काळ्या रंगाचे ठिपके असतात.

४) लेयर केजेसमध्ये पक्षांचे स्थलांतर करतेवेळी चोच कापावी.

५) सध्याच्या परिस्थितीत बटेरपालनात लसीकरण किंवा जंतनाशकांचा वापर सुचविलेला नाही. फक्त ० ते ३ दिवस अणूजीवनाशक औषधे आणि ० ते १५ दिवस औषधांचे नियोजन आवश्यक आहे.

६)पक्षांचा आकार लहान आणि वजन कमी असल्याने खाद्य व जागेची गरज देखील अल्प असते. यामुळेच व्यवसायातील सुरवातीची गुंतवणूक देखील कमी असते.सेन्ट्रल एव्हीअन रीसर्च इन्स्टिट्यूट, इजतनगर,उत्तर प्रदेश येथे बटेर पक्षी उपलब्ध आहेत.

संपर्क ः

डॉ.कल्याणी सरप,

(विषय विशेषज्ञ (पशुसंवर्धन),कृषी विज्ञान केंद्र,हिवरा-गोंदिया)

डॉ. कविता कडू ९०९६८७०५५०

(वरिष्ठ संशोधन सहायक, कृषी महाविद्यालय,नागपूर)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com