बीबीएफ यंत्राव्दारे काटेकोर पेरणीसाठी ट्रॅक्टर चालकांची भूमिका महत्वाची

रुंद वरंबा सरी (बीबीएफ) तंत्रज्ञानाने सोयाबीनची पेरणी केल्यास उत्पादकता वाढ, मूलस्थानी जलंसधारणासह अनेक फायदे होतात. मजुरी, बियाण्यावरील खर्च कमी होण्यास मदत होते.
BBF Machine
BBF MachineAgrowon

परभणीः रुंद वरंबा सरी (बीबीएफ) तंत्रज्ञानाने सोयाबीनची पेरणी केल्यास उत्पादकता वाढ, मूलस्थानी जलंसधारणासह अनेक फायदे होतात. मजुरी, बियाण्यावरील खर्च कमी होण्यास मदत होते. परंतु बीबीएफ यंत्राव्दारे काटेकोर पेरणी होणे आवश्यक असून, त्यासाठी ट्रॅक्टरचालकांची भूमिका महत्त्वाची आहे असे प्रतिपादन कृषीमध्ये बैल शक्तीचा योग्य वापर प्रकल्पाच्या संशोधक अभियंता डॉ. स्मिता सोलंकी यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी क्षेत्रात पशू शक्तीचा योग्य वापर योजना आणि कृषी विभाग यांच्यातर्फे शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी बीबीएफ (रुंद वरंबा सरी) पेरणी यंत्रजोडणी तंत्रज्ञानाची माहिती व्हावी या उद्देशाने ट्रॅक्टर चालक- मालकांसाठी प्रशिक्षण शनिवारी (ता.४) आयोजित करण्यात आले होते. या वेळी सोलंकी बोलत होत्या.

डॉ. राहुल रामटेके अध्यक्षस्थानी होते. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय लोखंडे, उपविभागीय कृषी अधिकारी बी. एस. कच्छवे, कृषी सहसंचालक कार्यालयातील अधिकारी आर. बी. हरणे, संदेश देशमुख, कृषी अधिकारी दीपक सामाले, पांडुरंग गोरे, प्रगतिशील शेतकरी नरेश शिंदे, ज्ञानोबा पारधे, सचिन देशमुख, पंडित थोरात आदींची उपस्थिती होती.

लोखंडे म्हणाले, की मजुरांच्या समस्येवर मात करण्यासाठी कृषी यांत्रिकीकरणावर भर देण्याची गरज आहे. शासनाच्या विविध योजनांतर्गत खरेदी केलेल्या अवजारांसाठी लाभार्थींना अनुदान दिले जाते. कच्छवे म्हणाले की, सोयाबीन मूल्यसाखळी विकसित करण्यासाठी निवडलेल्या गावातील शेतकऱ्यांनी बीबीएफ तंत्रज्ञानाने पेरणी केल्यास त्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे.

कृषी विद्यापीठातील पशुशक्तीचा योग्य वापर योजनेच्या प्रक्षेत्रावर सुधारित अवजारे प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत ट्रॅक्टरचलित बीबीएफ (रुंद वरंबा व सरी), रासणी, फवारणी यंत्र (४ इन १) या यंत्राचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण, बीबीएफ यंत्रासाठी आवश्यक जोडणी, मांडणी, पेरणी, सरी पाडणे, रासणी व उपलब्ध बीबीएफ मध्ये थोडा बदल करून यांत्रिक पद्धतीने जोडओळ पेरणीकरिता तंत्रज्ञान आदी बाबीवर तांत्रिक माहिती देण्यात आली. शेतकरी, कृषी सहायक, ट्रॅक्टरचालक प्रशिक्षणास उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com