कसे आहे बारामतीतील सायन्स सेंटर?

माळेगाव खुर्द (ता. बारामती) येथे नव्याने उभारण्यात आलेल्या ‘सायन्स अँड इनोव्हेशन अँक्टिव्हिटी सेंटर’चे उद्‍घाटन काकोडकर यांच्या हस्ते झाले.
कसे आहे बारामतीतील सायन्स सेंटर?
Science And Innovation Activity Center Agrowon

माळेगाव ः ‘‘बारामतीत साकारले ‘सायन्स अँड इनोव्हेशन अॅक्टिव्हिटी सेंटर’ (Science And Innovation Activity Center) हे विद्यार्थ्यांना अधिकाधिक चिकित्सक दृष्टिकोन देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल. आजचे इनोव्हेशनचे जग आहे. त्यामुळे विज्ञान-तंत्रज्ञानाच्या जोरावर आपल्याला प्रगती करायची झाल्यास या सेंटरची व्याप्ती राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात वाढली पाहिजे,’’ अशी अपेक्षा आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञ अनिल काकोडकर (Anil Kakodakar) यांनी व्यक्त केली. ‘‘वैद्यानिक दृष्टिकोन व चिकित्सा या मुद्यांशी मैत्री करणे, हाच संकल्प विद्यार्थ्यांमध्ये असायला हवा,’’ अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

माळेगाव खुर्द (ता. बारामती) येथे नव्याने उभारण्यात आलेल्या ‘सायन्स अँड इनोव्हेशन अँक्टिव्हिटी सेंटर’चे उद्‍घाटन काकोडकर यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार (Sharad Pawar) होते. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), उद्योजक गौतम अदानी (Gautam Adani), खासदार सुप्रिया सुळे, अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार, रयत शिक्षण संस्थेचे प्रमुख अनिल पाटील आदी उपस्थित होते.

काकोडकर म्हणाले, ‘‘शाळा-कॉलेजमधील मिळालेली सर्टिफिकेट्स आपल्याला रोजगार उपलब्ध करून देतीलच असे नाही. त्यासाठी आपली कल्पकता वापरून उद्योग व्यवसायात उतरण्यासाठी युवकांनी पुढे आले पाहिजे. विज्ञान ही विचारपद्धती आहे, हे समजून घेतले तर रोजच्या जगण्यातले अनेक आव्हानात्मक मुद्दे निकाली निघतात.’’

शरद पवार म्हणाले, ‘‘देशात अलीकडच्या काळात आपल्यापुढे कितीतरी आव्हाने आहेत. परंतु वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रगतीच्या आधारेच या आव्हानांचा सामना करणे शक्य होते. या जाणिवेने त्या काळातल्या समाजधुरिणांनी वैज्ञानिक दृष्टी ठेवून विज्ञान-तंत्रज्ञानविषयक शिक्षण आणि संशोधन संस्थांची उभारणी केली. अर्थात, त्याच कार्याला अधिक बळकटी देण्यासाठी सध्या प्रयत्न होताना पाहून आनंद होतो. हे सायन्स सेंटर हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. विद्यार्थ्यांमध्ये नवकल्पना विकसित करणे व त्यांच्यात संशोधनात्मक मानसिकता तयार करण्यासाठी हे सेंटर उपयोगी ठरेल.’’

‘प्रत्येक जिल्ह्यात असे सेंटर होणार’

अजित पवार म्हणाले, ‘‘यंदाचा अर्थसंकल्प सादर करताना राज्याच्या सहा विभागांमध्ये सायन्स अॅक्टिव्हिटी सेंटर करण्यासाठी निधी दिला आहे. पुढील अर्थसंकल्पात मात्र महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात हे सायन्स सेंटर सुरू होण्यासाठी भरीव आर्थिक तरतूद करणार आहे.’’

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com