असा रोखता येईल किडींचा प्रादुर्भाव !

कृषी उत्पादनातील वाढीसाठी तसेच शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढीसाठी कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या अंगिकाराचा आग्रह धरला जातोय. शेतीच्या यांत्रिकीकरणावरही भर दिला जातोय. यादृष्टीनंच एनईसी लॅब्रॉटरीजने (NEC Laboratories) तामिळनाडू कृषी विद्यापीठाशी (TNAU) सहकार्य करार केला आहे.
To Detect Crop Diseases using AI,Machine Learning
To Detect Crop Diseases using AI,Machine Learning Agrowon

एनईसी कार्पोरेशन इंडियाच्या (NEC Corporation India) अखत्यारीत कार्यरत एनईसी लॅब्रॉटरीजने तामिळनाडूच्या कृषी विद्यापीठाशी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (Artificial Intelligence) आणि मशीन लर्निंग (Machine Learning) या दोन्ही विषयात सहकार्य करार केलाय. या कराराद्वारे या दोन्ही संस्था या दोन तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष शेतीकामात कसा वापर केला जाईल? यावर काम करणार आहेत.

एनईसी आर्टीफिशियल इंटेलिजन्सचे (Artificial Intelligence) एक मोबाईल अप्लिकेशन विकसित करणार आहे. कृषी विद्यापीठ या तंत्रज्ञानाच्या मदतीने पिकांवरील संभाव्य किडींची माहिती संकलित करण्यावर भर देणार आहे. या दोन्ही संस्थांच्या मदतीने शेतकऱ्यांना आपल्या पिकांवरील संभाव्य किडींची पूर्वसूचना मिळू शकणार आहे. त्यामुळे त्यांना वेळीच किडीचा प्रादुर्भाव रोखणे शक्य होणार आहे.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या अन्न व कृषी संघटनेच्या माहितीनुसार जगभरातील ४० टक्के शेतकरी पिकांवरील किडींच्या प्रादुर्भावाने त्रस्त असतात. विशेषतः भारतात तर वेगवेगळ्या आजारांमुळे उत्पादनात घट होण्याचे प्रमाण मोठे आहे. वेगवेगळ्या किडीमुळे भारतातील कृषी उत्पादनाच्या नुकसानीचे प्रमाण ४० ते ६० टक्के एवढे आहे.

पिकांवरील संभाव्य रोगांचा अंदाज शेतकऱ्यांना आला तर ते वेळीच प्रादुर्भाव रोखून उत्पादनातील मोठे नुकसान टाळू शकतील. त्यामुळेच आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग या तंत्राचा वापर करून शेतकऱ्यांचे उद्दिष्ट साध्य करता येणे शक्य होणार आहे.

एनईसी लॅब्रॉटरीज इंडियाचे वरिष्ठ उपाध्यक्ष केजी यमदा यांनी सहकार्य करारावर स्वाक्षरी केली तर तामिळनाडू कृषी विद्यापीठाचे कुलगुरू एस. एस. कृष्णमूर्ती यांनी या करारावर स्वाक्षरी केलीय. प्रत्यक्ष पिकांवरील संभाव्य किडींचा प्रादुर्भाव ओळखता येणे आणि त्यावर वेळीच उपाय करण्यामुळे शेतकरी आपले आर्थिक नुकसान टाळू शकणार असल्याचा विश्वास यमदा यांनी यावेळी व्यक्त केलाय.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com