
पिकाच्या काढणीनंतर शिल्लक राहणारे अवशेष (Crop Residue) शेतातच कुजवण्यापेक्षा बरेच शेतकरी ते जाळून टाकतात. त्यामुळे मातीची सुपीकता (Soil Fertility) तर कमी होतेच शिवाय पिकांसाठी सहज उपलब्ध होऊ शकणारी अन्नद्रव्ये सेंद्रिय अवशेष जाळल्यामुळे वाया जातात.
भारतात पंजाब, हरियानातील बरेच शेतकरी पीक अवशेष जाळतात त्यामुळे दिल्लीसह अन्य भागांमध्ये धुरक्याची समस्या निर्माण होत आहे.
पिकाच्या काढणीनंतर शिल्लक राहणारे अवशेष जमिनीत गाडण्यासाठी काही यंत्रे विकसीत करण्यात आाली आहेत. त्यापैकी ट्रॅक्टरचलित फुले कुट्टी यंत्र (Tractor-driven crop residue management machine) हे यंत्र इतर पारंपारिक पद्धतीपेक्षा फायदेशीर आहे.
२. ट्रॅक्टरचलित फुले कुट्टी यंत्र
हे यंत्र ३५ व त्यापेक्षा अधिक अश्वशक्तीच्या ट्रॅक्टरने चालविता येतं.
फळबागेतील छाटणीनंतर पडणाऱ्या अवशेषांची कुट्टी करून बेडवर दोन्ही बाजूस समांतर टाकण्याकरिता उपयुक्त. उदा. द्राक्ष.
अवशेषांची कुट्टी करण्याकरिता ट्रॅक्टरच्या पीटीओ शक्तीचा वापर केला आहे, तर कुट्टी केलेले अवशेष बेडवर दोन्ही बाजूस समांतर टाकण्याकरिता हायड्रोलिक शक्तीचा वापर केलेला आहे.
प्रक्षेत्रीय क्षमता ७८ टक्के असून एका तासात ०.४७ हेक्टर क्षेत्रावर अवशेषांची कुट्टी होते.
पारंपारिक पद्धतीपेक्षा खर्चामध्ये ७२ टक्क्यांपर्यंत बचत होते.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.