Sugarcane Implements : या यंत्राने करा उसातील आंतरमशागत

ऊस पिकातील आंतरमशागतीसाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने ट्रॅक्टरचलित फुले ऊस आंतरमशागत यंत्र विकसित केले आहे. या यंत्रामुळे मजुरीवर होणाऱ्या खर्चात बचत होते.
Tractor driven Phule sugarcane intercropping machine
Tractor driven Phule sugarcane intercropping machineAgrowon

ऊस पिकामध्ये (Sugarcne Crop) बाळबांधणी, खते देणे, तणनियंत्रण तसेच मातीची भर देणे इ. आंतरमशागतीची कामे केली जातात. त्यामुळे मजुरीवर मोठ्या प्रमाणात खर्च होतो. ऊस पिकातील आंतरमशागतीसाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने ट्रॅक्टरचलित फुले ऊस आंतरमशागत यंत्र (Tractor driven Phule sugarcane intercropping machine) विकसित केले आहे. या यंत्रामुळे मजुरीवर होणाऱ्या खर्चात बचत होते. या यंत्राची १२० ते १५० सेंमी अंतरावरील उसाला भर देणे आणि दाणेदार खत पेरणीसाठी शिफारस करण्यात आली आहे.

Tractor driven Phule sugarcane intercropping machine
Sugarcane : सुधारित तंत्र व अभ्यासातून ऊस शेतीत हातखंडा

यंत्राची वैशिष्ट्ये काय आहेत?

१८ आश्वशक्तीच्या वरील ट्रॅक्टरचलित फुले ऊस आंतरमशागत हे यंत्र २०१२ साली विकसित करण्यात आले आहे.

हे यंत्र १८ .५ आश्वशक्ती पेक्षा जास्त अश्वशक्तीच्या ट्रॅक्टरच्या सहाय्याने ओढता येते.

या यंत्राने मातीचा वरचा थर फोडणे, उसाला मातीची भर देणे आणि खत पेरणी अशी कामे एकाच वेळी केली जातात.

खत पेरणी उसाच्या मुळाशी झाल्यामुळे पिकाची जोमदार वाढ होते. खताचा अपव्यय होत नाही.

उसाची बाळ बांधणी आणि मुख्य बांधणी पिकाचे नुकसान न करता करता येते.

१२० सेंमी पेक्षा जास्त अंतरावरील उसामध्ये हे यंत्र वापरता येते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com