Agriculture Technology : विद्यापीठाचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा

कृषी विज्ञान केंद्रांतर्फे आयोजित विविध प्रयोग, चाचणी व प्रात्यक्षिके याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा.
Agriculture Technology
Agriculture TechnologyAgrowon

जळगाव ः कृषी विज्ञान केंद्रांतर्फे (Krishi Vidnyan Kendra) आयोजित विविध प्रयोग, चाचणी व प्रात्यक्षिके याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. कृषी विषयक (Agriculture Business) व्यवसाय उभारावा. विद्यापीठाचे सुधारित तंत्रज्ञान (Agriculture University Technology) शेतकऱ्यांमध्ये प्रसारित करावे.

कृषी विज्ञान केंद्राच्या सर्व शास्रज्ञांनी विद्यापीठाचे नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवताना विविध प्रसार माध्यमे, सोशल मीडियाचा वापर करावा, अशा सूचना डॉ. टी. के. नरुटे यांनी जळगाव येथील कृषी संशोधन केंद्रात आोयोजित बैठकीत दिल्या.

Agriculture Technology
Agriculture Technology : शेतीमालाच्या मूल्यवर्धनाची आवश्यकता

जिल्ह्यातील कृषी विज्ञान केंद्राची आठवी शास्त्रीय सल्लागार समितीची बैठक महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. टी. के. नरुटे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी नरुटे यांनी मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे अटारी (पुणे) येथील शास्त्रज्ञ डॉ. राजेश टी. पुणे, जळगाव येथील केळी संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. चंद्रशेखर पुजारी, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, ‘आत्मा’चे उपसंचालक कुर्बान तडवी, कृषी तंत्र विद्यालयाचे प्राचार्य डॉ मधुकर बेडीस, वरिष्ठ शास्रज्ञ डॉ. बी. डी. जडे, ‘नाबार्ड’चे जिल्हा व्यवस्थापक श्रीकांत झांबरे होते.

Agriculture Technology
Bioflock Technology : मत्स्यपालनासाठी बायोफ्लॉक तंत्रज्ञानातील महत्त्वाच्या बाबी

या वेळी पाल (ता. रावेर) येथील कृषी विज्ञान केंद्राचे प्रभारी प्रमुख महेश महाजन, पशुसंवर्धन विभागाचे डॉ. पी. पी. पाटील, कडधान्य पैदासकार, डॉ. सुमेरसिंग राजपूत, कापूस पैदासकार डॉ जी. बी. चौधरी, डॉ. जी. पी. देशमुख, शेतकरी नरेंद्र पाटील, समाधान पाटील, शरद पाटील, हर्षला, सुरेश धनगर, संदीप पाटील, दीपक पाटील, मनोज चौधरी, सुभाष पाटील, रोहिदास पाटील, वंदना पाटील उपस्थित होते.

शास्त्रज्ञ डॉ. राजेश टी. म्हणाले, की अधिकाधिक शेतकऱ्यांची कृषी सारथी पोर्टलवर नोंदणी करून सल्ला पुरवावा. प्रक्षेत्रावर नैसर्गिक शेती प्रात्यक्षिके घ्यावीत, अशी सूचना केली. कृषी उपसंचालक भोकरे यांनी रेशीम शेती, क्रॉप कव्हर तंत्रज्ञान, न्यूट्री सीरिअल गार्डन व मल्चिंग तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त प्रसार कृषी विज्ञान केंद्र व कृषी विभाग यांच्यातर्फे होत आहे, असे सांगितले.

कार्यक्रम समन्वयक डॉ. हेमंत बाहेती यांनी कार्यवाही अहवाल व पुढील वर्षातील कामांचे नियोजन सादर केले. प्रक्षेत्र भेटींचा कार्यक्रमही झाला. या दरम्यान विविध सूचना व मार्गदर्शन वरिष्ठांनी केले. सूत्रसंचालन ममुराबाद (ता. जळगाव) येथील कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ किरण जाधव यांनी केले. आभार किरण मांडवडे यांनी मानले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com