शाश्वत शेतीसाठी युपीएलचा कृषी विद्यापीठाशी सांमजस्य करार

युपीएल विद्यापीठासोबत मिळून ड्रोन तंत्रज्ञान विकसित करणार आहे, त्यासाठी कंपनीकडून विद्यापीठातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.
शाश्वत शेतीसाठी युपीएलचा कृषी विद्यापीठाशी सांमजस्य करार
Memorandum of UnderstandingAgrowon

शाश्वत शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी युपीएल लिमिटेडने जी.बी. पंत युनिव्हर्सिटी ऑफ ॲग्रीकल्चर अँड टेक्नॉलॉजीसोबत भागीदारी केली आहे. या दोन्ही संस्थांमध्ये शुक्रवारी (तारीख १० जून) सांमजस्य करार (Memorandum of Understanding) करण्यात आला.

या करारानुसार सहमतीच्या क्षेत्रातील संशोधन आणि विकासासोबतच उत्पादनांच्या सुरक्षित वापरासाठी संयुक्तपणे प्रशिक्षण कार्यक्रम राबवले जाणार आहेत. जी.बी. पंत युनिव्हर्सिटी ऑफ ॲग्रीकल्चर अँड टेक्नॉलॉजीचे प्रभारी कुलगुरू आर. एस. चौहान, संशोधन संचालक एस. एस. नयन, युपीएलचे व्यवसाय प्रमुख राहुल पांडे, विभागीय प्रमुख रवी हेगडे, व्यवस्थापक शिखा जोशी यावेळी हजर होते.

युपीएल विद्यापीठासोबत मिळून ड्रोन तंत्रज्ञान (Drone Technology) विकसित करणार आहे, त्यासाठी कंपनीकडून विद्यापीठातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. विद्यापीठाने जैविक क्षेत्रात महत्वपूर्ण काम केले आहे. युपीएल विद्यापिठाच्या सहकार्याने हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

पिकांवरील बायोटिक आणि अबायोटिक ताणामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होते. युपीएल आणि विद्यापीठातर्फे हा ताण कमी करण्यासाठी आवश्यक बायो सोल्युशन्स क्षेत्रात संशोधन केले जाणार आहे.

शेतकऱ्यांना आवश्यक उत्पादने पुरवणारी कंपनी म्हणून आम्ही शेतकऱ्यांशी जोडल्या गेलो आहोत. विद्यापीठासोबतच्या सांमजस्य करारामुळे आम्हाला शेतकऱ्यांना शाश्वत उत्पादने आणि काळानुरूप तंत्रज्ञान उपलब्ध करून देता येणार आहे, ज्यामुळे त्यांच्या उत्पादनात आणि आर्थिक उत्पन्नात वाढ होणार असल्याचा विश्वास युपीएलने व्यक्त केला आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com