ऊस तोडणीसाठी यंत्रमानवाचा वापर ?

राज्यात एकीकडे ऊसाच्या क्षेत्रात वाढ होत असून दुसरीकडे ऊस तोड कामगार मिळत नाहीत, म्हणून शेतकरी आणि कारखानदार चिंता व्यक्त करत आहेत.
Sugarcan Cutter
Sugarcan CutterAgrowon

राज्यात एकीकडे ऊसाच्या क्षेत्रात (Sugarcane Area) वाढ होत असून दुसरीकडे ऊस तोड कामगार (Sugarcane Harvester) मिळत नाहीत, म्हणून शेतकरी आणि कारखानदार चिंता व्यक्त करत आहेत. त्यामुळे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला (Vasantdada Sugar Institute) राज्यातील ऊस कारखानदारांनी ऊस तोडणीसाठी यंत्रमानवावर (रोबोट) संशोधन करण्याची विनंती केली आहे.

"येणाऱ्या काळात उसाचे क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऊसतोडणीसाठी यांत्रिकीकरणाचा स्वीकार करावा लागेल. त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने एकत्र येऊन प्रयत्न केले पाहिजेत," असे मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे ऊसतोडीसाठी यांत्रिकीकरणाच्या मुद्द्यावर चर्चा सुरू आहे.

यंदा गाळप हंगाम संपला असला तरी राज्यातील काही भागांमध्ये विशेषतः मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना आणि बीड जिल्ह्यात ऊस शिल्लक क्षेत्र शिल्लक आहे. त्यामुळे कारखानदारांना राज्य सरकारने उसाचे गाळप झाल्याशिवाय कारखाने बंद करू नका, असे आदेश दिलेत.

त्याचबरोबर कारखान्यांना अनुदानही दिले आहे. भविष्यात वाढणाऱ्या उसाचे क्षेत्र आणि ऊसतोड कामगारांच्या कमतरतेमुळे कारखानदारांसमोर अडचणी निर्माण होतील, अशी शक्यता सांगितली जात आहे.

अलीकडेच वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये ऊस परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत राज्यातील वेगवेगळे मान्यवर सहभागी झाले होते. यावेळी नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज लिमिटेडचे ​ अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर म्हणाले, "ऊस तोड कामगारांची कमतरता येणाऱ्या काळात वाढणार आहे. त्यामुळे ऊस तोडणीसाठी यंत्रमानवाचा वापर करावा लागेल. त्यासाठी ऊसतोड यंत्रमानवासाठी संशोधन करण्याची गरज आहे."

राज्यातील ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून बीड जिल्ह्याला ओळखले जाते. ऊस तोडणीचा हंगाम सुरू झाला की, या ऊसतोड कामगारांचे बिऱ्हाड सर्वाधिक ऊस क्षेत्र असलेल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये स्थलांतर करते. मात्र मागच्या ५-६ वर्षात ऊसतोड कामगारांच्या पुढच्या पिढ्यांनी शिक्षणाचा पर्याय निवडल्यामुळे या क्षेत्राकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे ऊसतोड कामगारांच्या संख्येत घट झाल्याचे, जाणकार सांगतात. तर दुसरीकडे यांत्रिकीकरणामुळे ऊसतोड कामगारांचा रोजगार बुडेल अशी भीती व्यक्त केली जात आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com