SRT Technology : विविध पिकांत विस्तारतेय ‘एसआरटी’ तंत्र

औरंगाबाद राज्यातील पहिला जिल्हा; खरीप, रब्बी पिकांत होतोय वापर
SRT Technique
SRT TechniqueAgrowon

औरंगाबाद : कोकण, विदर्भातील भात शेतीत (Paddy Cultivation) वापरले जाणारे 'सगुणा राइस तंत्र' (एसआरटी) (SRT Technique) आता औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकरी भाताव्यतिरिक्‍त इतर पिकासाठीदेखील वापरत आहेत. यंदाच्या खरीप हंगामात (Kharif Season) जिल्ह्यात या तंत्रज्ञानाचा वापर सुमारे एक हजार एकरावर पोहोचला आहे. जिल्ह्यातील शेतकरी खरिपात कापूस (Cotton), मका, तूर, सोयाबीन (Soybean), भुईमूग आणि रब्बी हंगामात हरभरा, गहू, ज्वारी, सूर्यफूल आदी पिकासाठी ‘सगुणा राइस तंत्रा’चा वापर करीत आहेत. भात वगळता इतर पिकात हे तंत्र स्वीकारणारा औरंगाबाद राज्यातील पहिला जिल्हा ठरला आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या ‘पोकरा‘ प्रकल्पातील तंत्रज्ञान समन्वयक सुरेश बेडवाल यांनी दिली. (Agriculture Technology)

औरंगाबाद जिल्ह्यात २०१९ मध्ये प्रायोगिक तत्त्वावर एक एकर क्षेत्रावर कापूस पिकासाठी एसआरटी तंत्रज्ञानाचा वापर झाला. २०२० मध्ये जिल्ह्यातील ३२ शेतकऱ्यांनी ५० एकरावर आणि २०२१ मध्ये ३०८ एकरावर एसआरटी तंत्र वापराचे क्षेत्र विस्तारले. यंदाच्या खरिपात (२०२२) एसआरटी पद्धतीने लागवडीचे क्षेत्र सुमारे एक हजार एकरांवर पोहोचले आहे. फुलंब्री, कन्नड, सिल्लोड, औरंगाबाद आणि सोयगाव तालुक्‍यातील शेतकरी कपाशी, सोयाबीन, मका, हरभरा, गहू, झेंडू आदी पिकांमध्ये एसआरटी तंत्राचा वापर करीत आहेत. याचबरोबरीने परभणी, लातूर,धुळे, वर्धा, वाशीम, अकोला, नागपूर आदी जिल्ह्यातही भाताव्यतिरीक्‍त इतर पिकात एसआरटी तंत्रज्ञानाचा वापर वाढू लागला आहे, अशी माहिती सुरेश बेडवाल यांनी दिली.

SRT Technique
भातशेतीसह मत्स्यशेती तंत्रज्ञान

मालेगाव-नेरळ(ता. कर्जत,जि.रायगड) येथील प्रयोगशील शेतकरी चंद्रशेखर भडसावळे यांनी त्यांच्या सगुणा बागेत भात पिकासाठी एसआरटी तंत्रज्ञान विकसित केले. बदलत्या हवामानाला जुळवून घेण्याची ही शेतीपद्धती आहे. दरवर्षी नांगरणी न करणे, जमिनीची धूप थांबविणे, गादीवाफ्यामध्येच सेंद्रिय घटक कुजवून गांडूळ निर्मितीस चालना देणे, तणनाशकाचा योग्य वापर, खत, बियाणे बचत आणि स्थिरीकरणाद्वारे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढवून उत्पादन खर्च कमी करणे हे या तंत्राची काही प्रमुख वैशिष्टे आहेत. २०१९ मध्ये भडसावळे यांच्या सगुणा बागेत आयोजित प्रशिक्षणामध्ये सुरेश बेडवाल आणि टापरगाव (ता. कन्नड) येथील अतुल रावसाहेब मोहिते सहभागी झाले होते. तेथे हे तंत्रज्ञान समजाऊन घेत पुढे औरंगाबाद जिल्ह्यात पोकरा अंतर्गत कपाशी पिकामध्ये याचा प्रसार सुरू झाला.

SRT Technique
जनावरांतील माज संकलन तंत्रज्ञान म्हणजे काय?

एसआरटी तंत्रज्ञानात महत्त्वाचे...

- गादीवाफे तयार करण्यासाठी सुरवातीला एकदाच नांगरणी.त्यानंतर एकदा रोटाव्हेटरने ढेकळे फोडणे.

- त्यानंतर साडे चार फूट रुंद आणि अर्धा फूट उंच आणि १०० सेंमी माथा असलेल्या गादीवाफ्याची निर्मिती.

- गादीवाफ्यावर शेणखत आणि माती परिक्षणानुसार रासायनिक खताची मात्रा मिसळून देणे.

- चांगला पाऊस झाला की, गादीवाफ्यावर टोकण पद्धतीने कपाशीच्या दोन रोपात दीड फूट लागवड. मक्‍याची दोन ओळीत दोन रोपात एक फूट अंतर ठेवून लागवड.

- ठिबक सिंचनाची सोय असल्यास गादीवाफ्यावर हरभरा,गहू, झेंडू,भाजीपाला लागवड.

- निंदणीऐवजी शिफारशीनुसार तणनाशकाच्या दोन ते तीन फवारण्या.

- पीक उपटून न घेता जमिनीपासून चार बोटे अंतर ठेवून कापणी.

- एका पिकानंतर दुसरे पीक घेण्यासाठी गादीवाफ्यावर शिफारशीनुसार तणनाशकाची फवारणीकरून आधीच्या पिकाचे कोंब मारले जातात. त्यानंतर दोन दिवसात पुढील पिकाच्या बियाणांची टोकणणी. यामुळे १० ते १५ दिवसांची बचत.

तंत्र वापरामुळे वाचणारा खर्च ः

- एकदा तयार केलेला गादीवाफा कायम स्वरूपी रहातो.

- गादीवाफा निर्मितीवेळी एकदाच शेणखताचा वापर.

- दरवर्षी नांगरणी,मोगडणी, रोटाव्हेटर वापराची गरज नाही.

- शिफारशीत तणनाशकाच्या वापरामुळे निंदणी, कोळपणी

खर्चामध्ये बचत.

- गादीवाफा किमान १५ ते २० वर्ष कायम रहातो.

- बैलजोडीने अंतर मशागतीची गरज नाही.

.......

एसआरटी तंत्र वापराचे अनुभव

- गादीवाफ्यामुळे वाफसा स्थिती कायम टिकते.

- जमीन कडक होत नाही.हवा खेळती राहत असल्याने बोंड सडचे प्रमाण होते कमी.

- पीक तसेच तणाचे अवशेष जमिनीतच कुजत असल्याने सेंद्रिय कर्ब वाढण्यास मदत.

- कापलेले पीक आणि तणांची मुळे जमिनीत कुजल्याने निर्माण होणाऱ्या पोकळीत हवा खेळती राहाते.

- गादीवाफ्यात जसजसे सेंद्रिय घटक वाढतील,त्या प्रमाणात गांडुळांची संख्या वाढते.

- मातीच्या धुपेवर नियंत्रण. ‘तण देई धन'याची प्रचिती.

- पहिल्या हंगामापासूनच पीक उत्पादनात दीड पट वाढ शक्य. पुढे उत्पादन वाढीत सातत्य.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com