वीज पडून होणारी जीवितहानी टाळण्यासाठी ‘दामिनी’ ॲप वापरा

‘दामिनी’ हे ॲप जीपीएस लोकेशनने काम करीत असून, वीज पडण्याच्या १५ मिनिटांपूर्वी ॲपमध्ये स्थिती दर्शविण्यात येते. अशा वेळी सुरक्षित स्थळी जावे आणि झाडाचा आश्रय घेऊ नये.
Damini App
Damini AppAgrowon

हिंगोलीः मोसमी पावसाच्या (मॉन्सून) कालावधीत वीज पडून होणारी जीवितहानी टाळण्यासाठी भारत सरकारच्या हवामान विभागाने ‘दामिनी’ ॲप तयार केले आहे. हे ॲप गुगल प्ले स्टोरवर उपलब्ध आहे. हे अॅप डाउनलोड करून वापर सुरू करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.

हिंगोली जिल्ह्यात सुरक्षात्मक उपाययोजनंतर्गत सर्व तालुक्यांतील सर्व शासकीय यंत्रणा, अधिकारी, कर्मचारी, नागरिक, क्षेत्रीय अधिकारी, मंडळ अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, तलाठी, कृषी पर्यवेक्षक, सरपंच, ग्रामसेवक, पोलिस पाटील, कृषिसेवक, कोतवाल, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक, ग्रामपंचायत डाटा एंट्री ऑपरेटर यांना हे ॲप डाउनलोड करून वापर करण्याबाबत प्रवृत्त करावे.

‘दामिनी’ हे ॲप जीपीएस लोकेशनने काम करीत असून, वीज पडण्याच्या १५ मिनिटांपूर्वी ॲपमध्ये स्थिती दर्शविण्यात येते. अशा वेळी सुरक्षित स्थळी जावे आणि झाडाचा आश्रय घेऊ नये याबाबत सर्वांना निर्देशित करण्यात यावे. गावातील नागरिकांनी हा ॲप डाउनलोड करण्याबाबत सूचना निर्गमित कराव्यात. यासाठी विविध माध्यमांतून प्रसिद्धी द्यावी.

ग्रामस्तरावरील अधिकारी, कर्मचारी तसेच संबंधितांच्या बैठका घेणे, गावात दवंडी देणे आदी उपाययोजना करण्यात याव्यात आणि केलेल्या कार्यवाहीचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा. ग्रामस्तरावरील शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्यामार्फत या ॲपमध्ये प्राप्त होणाऱ्या विजेच्या अलर्ट नुसार आवश्यक पूर्वसूचना गावातील सर्व नागरिकांना पोहोचविण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करण्याबाबत संबंधितांना निर्देशित करावेत अशा सूचना सर्व संबंधित यंत्रणेला जिल्हाधिकारी पापळकर यांनी केल्या आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com